चेहऱ्यावर नैसर्गिक चमक असावी असे सगळ्यांनाच वाटते. गोळ्या किंवा क्रिम्स लावून चेहऱ्याला कितीही ग्लो आला तरी देखील तो आतून आलेला नसतो. तुम्ही आतून त्वचा सुंदर असण्याबद्दल अनेकांकडून ऐकले असेल. त्वचा आतून चांगली होण्यासाठी तुमचा आहार हा देखील चांगला असावा लागतो. सगळ्यांचाच आहार आदर्श आणि चांगला कायम ठेवता येईल असे नाही. हल्ली आपली लाईफस्टाईल अशी आहे की, रोज आपण घरचे खातोच असे नाही. इतकेच नाही तर आपल्याला वेळेवर जेवण मिळते असेही नाही. ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी काही असे काही सेवन केले पाहिजे ज्यामुळे तुम्हाला नॅचरल ग्लो येण्यास मदत मिळेल. काकडी सलाद म्हणून आपण सगळेच खातो. पण त्यापासून एक असे पेय तयार करणार आहोत ज्यामुळे तुम्हाला उत्तम त्वचा मिळण्यास मदत मिळेल.
काकडी आणि त्वचा
काकडीमध्ये असलेले घटक हे ॲक्ने प्रोन त्वचेसाठी फारच चांगले असतात. त्वचेची जळजळ कमी कऱण्यासाठी काकडीचा पॅक हा खूपच चांगला असतो. त्वचेसाठी टोनर कोणते वापरु असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही काकडीचा टोनर देखील वापरु शकता. कारण या टोनरमुळे त्वचा चांगली होण्यास मदत मिळते. त्वचा तेलकट असेल तर अशावेळी त्वचेवरील तेलाचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. त्वचेला जळजळ जाणवत असेल तर काकडीमुळे थंडावा मिळण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही काकडीचा वापर तुमच्या स्किनकेअरमध्ये हमखास करायला हवा.
उत्तम त्वचेसाठी काकडी कुलर
काकडीपासून उत्तम असे काकडी कुलर बनवणे फार सोपे आहे. त्यासाठी तुम्हाला खूप अशा साहित्याची गरज लागत नाही. त्यामुळे तुमचे वजनही वाढत नाही.
साहित्य:
एक काकडी ( काकडी कोवळी असेल तितकी चांगली), पुदिन्याची काही पाने, काळे मीठ, साखर, लिंबाचा रस आवश्यक वाटल्यास
कृती:
- काकडी सोलून तिचे काप करा. मिक्सरच्या भांड्यामध्ये काकडीचे तुकडे, पुदिन्याची पाने, काळे मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालून सगळे चांगले एकजीव वाटून घ्या. यात पाणी घातले तर तुम्हाला नंतर पाणी घालण्याची गरज नसते.
- तयार रस न गाळता तुम्ही तसाच प्या. ( कोणत्याही फळाचा किंवा भाजीचा रस हा तुम्ही ठेवून मग पिता कामा नये. कारण त्यामुळे त्यात अनेक विषारी घटक निर्माण होऊ शकतात.)
- आता तयार कुलर तुम्ही प्या. तुम्हाला हे प्यायल्यानंतर चेहऱ्यावर झालेला फरक नक्की जाणवेल.
- दिवसातून एकदा तुम्ही हे कुलर प्या. जर तुम्हाला हा कुलर पिऊन त्रास होत असेल तर तो तुम्ही टाळलेला बरा.
आता त्वचा हवी असेल चांगली तर त्वचेला ग्लो मिळवण्यासाठी काकडीच्या रसाचे असे सेवन करायला हवे.