नेहा कक्करने आपल्या करिअरची सुरूवात केली ती रियालिटी शो ने. इंडियन आयडॉलमध्ये स्पर्धक ते आता या शो ची परीक्षक असा नेहाच्या करिअरचा प्रवास हा थक्क करणारा आहे. नेहा कक्करचे असंख्य चाहते आहेत. आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने नेहाने सर्वांनाच आपलंसं केलं आहे. सध्या नेहा इंडियन आयडॉल या शो च्या परीक्षक पदाची धुरा सांभाळत आहे. लवकरच या शो मध्ये होळी स्पेशल भाग दाखविण्यात येणार आहे. त्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये नेहा आता कोणत्याही दुसरा रियालिटी शो करणार नसल्याचे सांगत आहे. गोंधळून जाऊ नका. नेहा काही रियालिटी शो मध्ये दिसणं बंद होणार नाहीये. कारण तिचं हे वक्तव्य ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. पण नेहाने याचे स्पष्टीकरणही दिले आहे.
स्टार किड्ससाठी तारणहार ठरतोय करण जोहर
इंडियन आयडॉल आहे खास शो
शनिवार आणि रविवारच्या भागात होळीसाठी स्पेशल भाग चित्रीत झाला आहे. नेहा कक्करने स्पर्धकांसह काही गाणी या मंचावर गायल्याचे दिसून येत आहे. तिच्या आवाजाने सगळेच प्रभावित झाले असून तिला या शो मध्येही खूपच प्रेम मिळाले आहे. हा शो तिच्यासाठी अत्यंत महत्वाचा असल्याने नेहा यावेळी भावूक होताना दिसून आली. ‘इंडियन आयडॉल हा माझ्यासाठी अत्यंत जवळचा आणि खास शो आहे. या शो ने मला भरभरून दिलं आहे. म्हणून हा सो सोडून मी दुसरा कोणताही रियालिटी शो करणार नाही. या शो च्या सगळ्या टीमने एकत्र येऊन कष्ट करून हा शो सुरू केला. त्यांच्या कष्टामुळे आज कलाविश्वामध्ये एक खास शो आणि कलाविश्वातील इतिहासातील नावाजलेला हा शो झाला आहे’ असं नेहाने यावेळी भावूक होत सांगितले. त्यामुळे नेहा आता दुसऱ्या कोणत्याही रियालिटी शो मध्ये नाही तर केवळ इंडियन आयडॉलसाठीच परीक्षक म्हणून काम बघणार असल्याचे तिने घोषित केले आहे.
माई-माधवचा असा अवतार पाहिल्यामुळे प्रेक्षकांना बसला धक्का, उलगडणार वाड्याची कथा
नेहाचा प्रवास आहे थक्क करणारा
नेहाने इंडियन आयडॉलच्या दुसऱ्या पर्वामध्ये स्पर्धक म्हणून सहभाग नोंदवला होता. त्यावेळीही तिला परीक्षकांनी दाद दिली होती. तर आता गेले दोन पर्व नेहा स्वतः या शो ची परीक्षक म्हणून काम बघत आहे. नेहाचा हा प्रवास थक्क करणारा आहे. बॉलीवूडमध्ये सध्या प्रत्येक चित्रपटात नेहाचे एक गाणे असतेच. नेहाच्या आवाजाने सगळ्यांनाच भुरळ पाडली आहे असं म्हणावं लागेल. नेहाचे सध्या अनेक सिंगल्सही येत आहेत. नेहाने नुकतेच गायक रोहनप्रीत सिंह याच्याशी लग्न केले असून दोघेही सध्या वेगवेगळ्या सिंगल्स आणि गाण्यांमध्ये व्यग्र आहेत. तर नेहाने आपल्या मेहनतीने ही जागा आज मिळवली असून असंख्य चाहते असणारी नेहा ही पहिली बॉलीवूडमधील गायिका आहे. नेहाचे सोशल मीडियावर असणारे फॉलोअर्स पाहता तिचा हा प्रवास आणि तिची ही मेहनत तिला इथपर्यंत घेऊन आली आहे याचा नक्कीच प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. नेहाला नेहमीच तिच्या चाहत्यांनी पाठिंबा दिला आहे आणि आता तिच्या या निर्णयालाही नक्कीच तिच्या चाहत्यांकडून पाठिंबा मिळेल अशी तिला आशा आहे.
कियारा आडवाणीने का नाकारला मुराद खेतानी चा ‘अपूर्वा’
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje