टीव्हीवरील काही मालिका या अनेक वर्ष चालू आहेत आणि त्याची लोकप्रियता आजही तशीच आहे. त्यापैकी अशीच एक मालिका म्हणजे ‘भाभीजी घर पे है’ या मालिकेतील सर्वांनीच आपल्या अभिनयाने आपली मनं जिंकून घेतली आहेत. काही महिन्यांपूर्वीच अनिता भाभीच्या भूमिकेत अभिनेत्री नेहा पेंडसे दिसू लागली आहे. नेहाचं कामही प्रेक्षकांना आवडत आहेत. पण आता नेहाने मालिका सोडली अशी चर्चा रंगू लागली होती. मालिकेमध्ये सध्या नेहा दिसत नसल्याने अशा चर्चेला उधाण आलं मात्र आता नेहाने स्वतःच या गोष्टीचा खुलासा करत स्पष्टीकरण दिले आहे. आपण मालिका सोडली नसून अजूनही या मालिकेचा भाग आहोत असं नेहाने स्पष्ट केलं आहे.
अभिनेत्री तेजस्विनी पंडित म्हणतेय…क्या पता कल हो ना हो!!!
अजूनही मालिकेचा भाग
गेल्या काही दिवसांपासून मालिकेमध्ये नेहा दिसून येत नाही. त्यामुळे नेहा पेंडसेनेही ही मालिका सोडली अशी चर्चा सुरू झाली. पण आता एका मुलाखतीमध्ये नेहाने आपण मालिका सोडली नसल्याचे सांगितले आहे. ‘गेल्या काही दिवसांपासून मालिकेत आपण दिसत नसल्याने या अफवांना सुरूवात झाली आहे आणि याचे मला कोणतेही आश्चर्य वाटत नाही. सध्या प्रदर्शित होत असणारे भाग हे जुने असून त्या चित्रीकरणाचा हिस्सा मी नव्हते. जेव्हा हे भाग प्रदर्शित झाले तेव्हा मला अनेक मेसेज आले आणि माझी आठवण येत असल्याचे सांगितले. सगळ्यांनाच मी समजावून सांगितले आहे की, मी परत येणार आहे. मला ही भूमिका साकारायला खूप मज्जा येत आहे आणि मी अजूनही या मालिकेचा भाग आहे.’ नेहाच्या या स्पष्टीकरणानंतर नक्कीच तिचे चाहते आनंदी होतील. नेहाने ही मालिका सोडली नसून लवकरच ती या मालिकेत पुन्हा दिसणार असल्याचं तिने सांगितलं आहे. तसंच सौम्या टंडन ही भूमिका आधी साकारत होती. त्यामुळे तिच्याशी तुलना होणे साहजिक होते आणि आता मात्र प्रेक्षकांनी आपल्याला या भूमिकेत स्वीकारले असून आपल्याला त्याचा आनंद होत असल्याचेही नेहाने सांगितले आहे.
22 दिवस ऑक्सिजन सपोर्टवर असणाऱ्या अभिनेत्याची भावूक पोस्ट, लवकरच भेटू…
सध्या सगळे कलाकार बायो बबलमध्ये
मालिकेतील सर्व कलाकार सध्या एका हॉटेलमध्ये बायो बबलमध्ये आहेत. हा अनुभवदेखील नेहाने शेअर केला आहे. ‘मी खूप उत्साही पण आहे आणि तितकीच काळजीदेखील आहे. कारण अशा परिस्थितीत चित्रीकरण करणे हे धोकादायक आहे. पण मला खात्री आहे की आमच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. आम्ही एका सुरक्षित ठिकाणीच चित्रीकरण करत आहोत आणि केवळ कोरोना चाचणी झालेल्या व्यक्तीच इथेच असतील.’ सध्या कोरोनामुळे मुंबईतील चित्रीकरण बंद करण्यात आले आहे. पण मालिकांचे चित्रीकरण विविध ठिकाणी चालू आहे. ‘भाभीजी घर पे है’ मालिकेचे चित्रीकरण हे सध्या सुरतमध्ये सुरू आहे. नवीन भाग लवकरच प्रदर्शित करण्यात येतील. नेहाने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे आता नक्कीच तिच्या चाहत्यांच्या जीवात जीव आला असेल. पुन्हा एकदा नेहाला आता या मालिकेत पाहता येईल आणि आनंद घेता येईल. या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. लवकरच नवे भागही प्रदर्शित होतील.
या कारणामुळे अमिषा पटेल इंडस्ट्रीमधून झाली बाहेर
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade