प्रियांका चोप्रा आणि निक जोनस बॉलीवूड आणि हॉलीवूडचं एक क्यूट कपल आहे. दोघांनी देखील आपापल्या करिअरमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या दोघांच्या फोटो आणि मॅरीड लाईफची सोशल मीडियावर सतत चर्चा सुरू असते. 2018 साली डिसेंबरमध्ये प्रियांका आणि निकने हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. प्रियांका आणि निकचा चाहतावर्ग फार मोठा आहे. त्यामुळे लग्नानंतर सतत त्यांच्याविषयी जाणून घेण्यास त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. प्रियंका आणि निकच्या लव्हस्टोरीबद्दल मीडियामध्ये सतत काहीतरी चर्चा सुरू असते. लवकरच हे दोघं बेबी प्लॅन करत असल्याच्या बातम्यादेखील सोशल मीडियावर वारंवार येतात. मात्र प्रियांका आणि निकने इतक्यात आई-बाबा न होण्याचा निर्णय घेतला आहे.
काय म्हणाले निक आणि प्रियांका…
लग्नाला एक वर्ष पूर्ण होत नाही तर लगेचच निक आणि प्रियांकांला त्यांच्या बेबी प्लॅनिंग विषयी विचारणा सुरू झाली आहे. याबाबत त्या दोघांनी अगदी मोकळ्या मनाने खुलासा केला आहे. निक आणि प्रियांका लहान मुलं फार आवडतात. त्यांना भविष्यात आई-बाबा व्हायला नक्कीच आवडेल. मात्र ते इतक्यात हा निर्णय घेण्यास तयार नाहीत. कारण त्या दोघांना जोनस ब्रद्रर्सच्या लोकप्रियतेबाबत माहीत आहेत. ते त्यांच्या कार्यक्रमांसाठी किती बिझी असतील हे आत्ताच सांगता येणार नाही. शिवाय निरनिराळ्या ठिकाणी टूरवर जावं लागत असल्यामुळे त्यांना त्यांच्या बेबी प्लॅनिंगसाठी आता वेळ देणं नक्कीच शक्य नाही. त्यामुळे या निर्णयाबाबत कोणतीही घाई करण्याची त्यांना मुळीच ईच्छा नाही. प्रियांकादेखील तिच्या आगामी दी स्काय इज पिंक मध्ये बिझी झाली आहे. ज्यामुळे दोघांनी त्यांचा आई-बाबा होण्याचा निर्णय पूढे ढकलला आहे.
निक आणि प्रियांका बेडरूममध्ये पाळतात हे नियम
प्रियांका आणि निक त्यांच्या वैवाहिक जीवनात फार खूश आहेत. लग्नानंतर सोशल मीडियावर ते त्यांचे फोटो आणि हॅपी मुव्हमेंट्स शेअर करत असतात. मात्र घरी मात्र निकने झोपण्याआधी काही कडक नियम सुरू केले आहेत. हे नियम प्रत्येक वैवाहिक जोडप्यासाठी गरजेचे आहेत. लग्नाच्या पूर्वी तुम्ही कसेही वागत असला तरी तरी लग्नानंतर काही गोष्टींबाबत बदल आणि तडजोड हे दोघांकडून व्हायला हवेत. यासाठीच प्रियांका आणि निकने त्यांच्या वैवाहिक जीवनात हे बदल केले आहेत. शिवाय या नियमांचं ते काटेकोरपणे पालन करण्याचा करत आहेत. त्यातील महत्त्वाचा नियम म्हणजे दोघांपैकी कोणीच बेडरूममध्ये मोबाईल फोन वापरायचा नाही. हा नियम प्रियांका आणि निक सक्तीने फॉलो करतात. कारण प्रियंका मोबाईल आणि सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते. ज्यामुळे हा नियम फॉलो करण्यासाठी प्रियांकाला फारच त्रास होतो. म्हणूनच निकने प्रियांकाला मोबाईल बेडरूम बाहेर ठेवण्याची सक्ती केली आहे. वैवाहिक जीवन सुखी आणि आनंदी होण्यासाठी दोघांनीदेखील हा नियम स्वतःला लावून घेतला आहे. शिवाय लग्नानंतर कपल्स बेडरूममध्ये आपापल्या मोबाईलवर व्यस्त असतील तर ते एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. सध्या अनेक विवाहित जोडप्यांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. लग्नानंतर बेडरूममध्ये मोबाईल स्वतःपासून दूर ठेवणं प्रत्येकालाच जमतंच असं नाही. त्यामुळे अनेकांच्या वैवाहिक जीवनात भांडणं आणि कलह निर्माण होतात. म्हणूनच लग्नानंतर प्रत्येक जोडप्याने हे बेडरूम सिक्रेट फॉलो करायलाच हवं.
अधिक वाचा
शिल्पा शेट्टी 13 वर्षांनी दिसणार सिल्व्हर स्क्रिनवर, ‘निकम्मा’ चित्रपटातून करणार कमबॅक
बॉलीवूडमधील हे सेलिब्रिटी आहेत यंग.. जाणून घ्या त्यांचे वय
बॉलीवूडमधील हे 10 बालकलाकार तुमच्या लक्षात आहेत का
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade