लग्नसराई

प्रियांका – निक जोधपूरमध्ये – Nickyanka arrived in Jodhpur for wedding

Dipali Naphade  |  Nov 28, 2018
प्रियांका – निक जोधपूरमध्ये  – Nickyanka arrived in Jodhpur for wedding

दीपिका – रणवीरच्या लग्न आणि रिसेप्शनमधून अजूनही चाहते गुंतून पडले असताना आता नव्या जोडप्याच्या लग्नांच्या फोटोसाठी तयार राहावं लागणार आहे. २ डिसेंबरला जोधपूरमध्ये प्रियांका आणि निक विवाहबंधनात अडकत आहेत. २८ सप्टेंबरला घरी पूजेने विधीला सुरुवात झाली असून २९ ला सकाळी लग्नासाठी प्रियांका – निक जोधपूरला रवाना झाले आहेत. इतकंच नाही तर पूर्ण चोप्रा कुटुंबीय आणि निकचं कुटुंबीयदेखील जोधपूरला रवाना झाल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. प्रियांका आणि निकने मीडियाला खास पोझही दिली. या दोघांसह निकचा भाऊ जो जोनास आणि सोफी टर्नरचे फोटोही व्हायरल होत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रियांकाची आई अर्थात वधूची आईदेखील अगदी आनंदात दिसत असून मधू चोप्रा यांचाही फोटो व्हायरल होतो आहे. सर्व कुटुंबीय जोधपूरला पोचले असून लवकरच त्यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात होईल.

जोधपूरला निघताना सर्वच आनंदी

प्रियांका आणि निकच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नाहीये. प्रियांकाने जोधपूरला जातानाही अगदी भारतीय परंपरा जपली असून तिने पांढऱ्या रंगाची कुरती आणि पलाझो परिधान केलं असून त्याला साजेसा रंगीत गुलाबी दुपट्टा घेतला आहे. तिच्या चेहऱ्यावरही नवरीचं तेज आलेलं दिसून येत आहे. तर निकने यावेळी अगदी कॅज्युअल लुक ठेवला असून त्यावर त्यानेे जॅकेट घातलं आहे. तर प्रियांच्या आईने साडी परिधान करण्यालाच प्राधान्य दिलं आहे. त्यांच्याबरोबर प्रियांकाच दीर आणि जाऊ दोघेही जोधपूरला रवाना झाले आहेत.

तसेच टूथपेस्ट गोरे करण्याविषयी वाचा

आज रंगणार मेंदी सोहळा

प्रियांका आणि निकचा मेंदी सोहळा आज जोधपूरच्या उमेद भवनमध्ये रंगणार असून सर्व नातेवाईक आणि जवळची मित्रमैत्रिणीदेखील यामध्ये असतील. नुकतंच निकचा भाऊ केविन जोनासदेखील मुंबईत दाखल झाला आहे. निकचं कुटुंबीयदेखील मोठं असून परदेशी असूनही त्यांना कुटुंबाचं महत्त्व आहे. म्हणूनच प्रियांका आणि निक हे एकमेकांची परंपरा अतिशय चांगल्या तऱ्हेने निभावत असून एकमेकांच्या कुटुंबाना समजून घेत आहेत. प्रियांकाचा तिच्या दीर आणि जाऊबरोबर खूपच चांगला बाँड असल्याचे याआधीही लोकांनी पाहिले आहे.

प्रियांकाने शेवटच्या क्षणी केली कपड्यांची ट्रायल

प्रियांका आपल्या कामामध्ये आणि लग्नाच्या गडबडीत असल्यामुळे लग्नाच्या कपड्यांची ट्रायलही तिने अगदी जोधपूरला जाण्याच्या आदल्या रात्री जुहूमध्ये जेडब्ल्यू मॅरियटमध्ये केली. यावेळी ती थकलेली वाटत असली तरीही तिच्या चेहऱ्यावरील आनंद मात्र लपत नव्हता.

फोटो सौजन्य : Instagram 

Read More From लग्नसराई