लग्नसराई

Nickyanka च्या रिसेप्शनमध्ये DeepVeer ची धमाल

Dipali Naphade  |  Dec 20, 2018
Nickyanka च्या रिसेप्शनमध्ये DeepVeer ची धमाल

गेल्या एक महिन्यापासून सेलिब्रिटीजचं लग्न आणि रिसेप्शन यांची अगदी धूमधाम सुरु आहे. एक महिना झाला तरीही दीपवीरची धमाल चालूच आहे. प्रियांका आणि निकच्या रिसेप्शनमध्येही या जोडीने धमाल उडवून दिली. रणवीर सिंग जिथे जातो तिथे सर्व वातवरण रणवीरमय होऊन जातं. मुंबईतील प्रियांका आणि निकच्या रिसेप्शनमध्येही रणवीरने आपली जादू दाखवली. अगदी रणवीर डीजेसुद्धा बनला. प्रियांका आणि निकने खास बॉलीवूडमधील लोकांसाठी 20 डिसेंबरला रिसेप्शन वांद्रामधील ताज लँड्स एन्डला आयोजित केलं होतं आणि या रिसेप्शनला अवघं बॉलीवूड लोटलं होतं. यावेळीदेखील सर्वांचे डोळे फक्त दीपिका आणि रणवीरकडे लागून राहिले होते. दीपिका आणि रणवीर काळ्या सूट आणि लेहंग्यामध्ये स्टनिंग दिसत होते.

रणवीरने केली धमाल

रणवीरने प्रत्येकाला डान्स फ्लोअरवर नाचायला लावलं. इतकंच नाही तर प्रियांका आणि दीपिकाबरोबर बाजीराव मस्तानीमधील ‘पिंगा ग पोरी पिंगा’ गाण्यावर स्वतःही डान्स केला. निकला प्रियांकाच्या ‘देसी गर्ल’ गाण्यावर ठुमके लावायला लावले. अर्थात हे सगळं बॉलीवूडचा ‘सिम्बा’चं करू जाणे. अगदी उर्मिला मातोंडकरला खेचत डान्स फ्लोअरवर खेचून नेण्यापासून ते गोविंदाबरोबर फोटो काढण्यापर्यंत सर्व काही रणवीरने प्रियांका आणि निकच्या रिसेप्शनमध्ये केलं. शिवाय दीपिका आणि रणवीरने प्रियांका आणि निकच्या रिसेप्शनमध्ये डान्स करून सर्वांनाच आपलंसही केलं. प्रियांका आणि निकसाठी रणवीर खास रॅपर बनला आणि त्याने त्यांच्यासाठी एक रॅपही करून दाखवल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे.

रणवीर आणि प्रियांकाची केमिस्ट्री

रणवीरने आतापर्यंत प्रियांकाबरोबर तीन चित्रपट एकत्र केले असून त्या दोघांची खूपच चांगली मैत्री आहे. बाजीराव मस्तानी, दिल धडकने दो आणि गुंडे यामध्ये त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही दिसून आली होती. आता पुन्हा एकदा प्रियांका आणि निकच्या रिसेप्शनच्या निमित्ताने त्यांनी एकत्र धमाल केल्याचं पाहायला मिळत आहे. रिसेप्शनमध्ये दीपिका – रणवीर – प्रियांका आणि निकने धमाल केलेली या व्हिडिओजमधून दिसून येत आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम, manav manglani, viral bhayani

Read More From लग्नसराई