Diet

एक दिवसाचे असे डाएट प्लॅन करेल तुमचे वजन कमी

Leenal Gawade  |  May 11, 2021
एक दिवसाचे असे डाएट प्लॅन करेल तुमचे वजन कमी

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट तुम्ही आतापर्यंत नक्कीच फॉलो केले असेल. काही डाएट प्लॅन फॉलो केल्यानंतर वजन कमी होण्यास मदत मिळते. तर काही डाएट प्लॅन कितीही फॉलो केला तरी काही केल्या वजन कमी होत नाही. एक दिवस डाएट केल्याने वजन कमी होऊ शकते या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे का? हो खूप शोधल्यानंतर आम्हाला असा एक डाएट सापडला आहे जे डाएट तुमचे वजन अगदी एका दिवसात कमी करेल असा आहे. एका दिवसात वजन कमी करण्यासाठी हा डाएट प्लॅन तुम्हाला मदत करेल. जाणून घेऊया हा एक दिवसाचा डाएट प्लॅन

कमी पाणी प्याल तर संभवतात हे त्रास

असे करा एक दिवसाचे डाएट

एक दिवसाचे डाएट करण्यासाठी तुम्हाला इतर दिवसांप्रमाणेच तुम्हाला चार मिल्समध्ये विभाजित करायचे आहे. जाणून घेऊया एक दिवसाचा तुमचा डाएट

नाश्ता  ( बजेट साधारण 300-400 कॅलरीज)

सकाळाच्या या वेळी तुम्ही तुमचा अगदी रोजचा आहार म्हणजेच पोहे खाऊ शकता. त्याला थोडे हेल्दी करण्यासाठी तुम्ही त्यामध्ये वरुन मोड आलेली कडधान्ये घाला. तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा मिळले.
पोह्यासोबत तुम्ही नाश्त्यामध्ये एक ग्लास दूध त्यामध्ये हळद आणि  किंचितशी काळीमिरी पूड घाला आणि अशा दूधाचे सेवन करा. तुम्हाला त्यानंतर काही काळ काहीही खाण्याची इच्छा होणार नाही.

 मॉर्निंग स्नॅक्स (बजेट 109 कॅलरीज)

सकाळच्या नाश्तानंतर आणि दुपारच्या जेवणाआधी लागणाऱ्या भुकेसाठीही तुम्ही काहीतरी चांगलच आणि वजन कमी करणारं खायला हवं. आता या वेळेमध्ये  थोडं डिटॉक्स करा यासाठी तुम्ही एका ग्लासात गरम पाणी करुन त्यामध्ये लिंबाचा रस आणि पुदिन्याची पाने घाला आणि हे पाणी प्या. हे पाणी डिटॉक्स करणयाचे काम करते.यासोबतच एखादे फळ खाण्यास काहीच हरकत नाही.एखादे संत्र किंवा सफरचंद खाऊन तुम्ही तुमची त्यावेळची भूक भागवू शकता.

दात सरळ करण्याच्या या डेंटल पद्धती आहेत फारच फायद्याच्या

Instagram

दुपारचे जेवण (393 ते 400 कॅलरीज)

वजन कमी करायचे म्हणजे काहीही खायचे नाही असे नाही तर तुम्ही चांगले पदार्थ खाणे हे फारच गरजेचे असते. दुपारचे जेवण खाताना तुम्ही मोजका आणि चांगला आहार घ्यायला हवा. या आहारामध्ये साधारण दोन चपात्या, एखाद्या कडधान्याची उसळ, एखादी हिरवी भाजी आणि सॅलेड घ्या. तुम्हाला त्यानंतर काही काळासाठी तुम्हाला नक्कीच भूक लागणार नाही.

संध्याकाळचा नाश्ता (135 ते 140 कॅलरीज) 

संध्याकाळचा नाश्ताही फार महत्वाचा असतो. अशावेळी तुम्ही उपाशी राहून चालत नाही. या वेळेमध्ये चटपटीत खाण्याचा मोह कोणालाच आवडत नाही. पण भेळ आणि त्यासोबत एखादे फळ खाल्ले की, त्या वेळाची भूक भागते

रात्रीचे जेवण (432 ते 450 कॅलरीज)
रात्रीचे जेवण हे तितकेच चांगले असायला हवे. रात्रीच्या जेवणात दोन चपात्या आणि एक चांगली रस भाजी असायला हवी. हा एवढाच आहार रात्रीच्या जेवणासाठी पुरेसा आहे. त्यामुळे रात्रीचे हे जेवण हे अशापद्धतीने असायला हवे.

आता हा एक दिवसाचा डाएट तुम्ही करुन पाहा. तुम्हाला नक्कीच तुमच्यामधील हा फरक जाणवेल.

मधुमेहींनी यासाठी खायलाच हवी अळकुडीची भाजी

Read More From Diet