भविष्य

वृषभ राशींच्या व्यक्ती असतात तरी कशा, यांच्यासाठी परफेक्ट मॅच काय आहे घ्या जाणून

Dipali Naphade  |  Oct 12, 2020
वृषभ राशींच्या व्यक्ती असतात तरी कशा, यांच्यासाठी परफेक्ट मॅच काय आहे घ्या जाणून

वृषभ राशीच्या व्यक्तींचा जन्म महिना हा 19 एप्रिल ते 20 मे हा कालावधी आहे. या राशीचा स्वामी शुक्र हा ग्रह आहे. याच कारणामुळे या व्यक्ती दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असतात.  यांचा स्वभाव अत्यंत सौम्य असतो. तर दुसऱ्या बाजूने या व्यक्तींना कोणी त्रास दिला तर या व्यक्ती आक्रमक होतात. तुमच्या जवळच्या व्यक्तींपैकी कोणी वृषभ राशीची असेल तर तुम्हाला त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. जाणून घेऊया कसा असतो वृषभ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव आणि काय आहेत त्यांची वैशिष्ट्य. 

राशीनुसार कोणत्या लिपस्टिकचा रंग आहे तुमच्यासाठी लकी

वृषभ राशीच्या व्यक्ती कशा असतात (Taurus sign people Positive and Negative Characteristics in Marathi)

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक माणसाचा जन्म हा एका ठरविक वेळ, महिना आणि वर्षात होत असतो. त्याच  आधारावर प्रत्येक माणसाची रास आणि वैशिष्ट्य,  त्यांचा स्वभाव ठरतो. तसंच प्रत्येक माणसाच्या सवयीदेखील त्यांच्या राशीच्या गुणधर्मानुसार असतात. यावेळी आपण पाहूया वृषभ (Taurus) राशीच्या व्यक्तींची वैशिष्ट्य.  

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

GIF

वृषभ पृथ्वी तत्वाची रास आहे. ज्याचा शुभ रंग हिरवा मानला जातो. या राशीच्या व्यक्तींसाठी पिवळा आणि हिरव्या रंगाचा मेळ शुभ मानला जातो. या राशीच्या व्यक्तींनी लाल रंगापासून सहसा लांब राहावे.  

भाग्यशाली क्रमांक – 5, 35, 50, 57, 82

भाग्यशाली दिवस  –  शुक्रवार, शनिवार आणि बुधवार

भाग्यशाली खडा  – हिरा अथवा पोवळे 

वृषभ राशीचे बॉलीवूड स्टार्स – माधुरी दीक्षित, मनोज वाजपेयी, अनुष्का शर्मा, वरुण धवन, सनी लियोनी, पूजा बेदी, मौसमी चटर्जी, झरीन खान

मेष राशींच्या व्यक्ती असतात तरी कशा, जाणून घ्या वैशिष्ट्य

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From भविष्य