अॅस्ट्रो वर्ल्ड

तुमच्या पार्टनरची रास मकर (Capricorn) असेल तर हे वाचा

Vaidehi Raje  |  May 6, 2022
capricorn personality traits

प्रेम ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला अत्यंत सुखद अनुभव आणि सुखमय आयुष्य देऊ शकते, पण जर तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याशी कम्पॅटिबल नसेल तर तुमचे आयुष्य खूप कठीण आणि दुःखद होते. अशा प्रेमामुळे तुम्ही पूर्णपणे निराश आणि दुखावले जाऊ शकता. या दोन टोकांपैकी कोणते टोक तुम्हाला अनुभवायला मिळते ते तुम्ही आणि तुमचा जोडीदार असे आहेत यावर अवलंबून आहे. तुमचे भूतकाळातील अनुभव, जुने नातेसंबंध, संगोपन या बाबी तुमची प्रेमाची धारणा तयार करण्यात योगदान देतात. वस्तुनिष्ठ पद्धतीने प्रेम समजून घेणे कठीण आहे.आपल्या जोडीदाराला प्रेमाबद्दल काय वाटते याचा अंदाज लावण्यासाठी ज्योतिषशास्त्र आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तुमच्या पार्टनरची रास मकर किंवा Capricorn असेल तर त्या राशीविषयी हे जाणून घ्या. ज्या व्यक्तींचा जन्म  22 डिसेंबर ते 19 जानेवारी या दरम्यान होतो त्यांचे सन साइन मकर किंवा कॅप्रीकॉन असते.

मकर (Capricorn) राशीविषयी जाणून घ्या 

Capricorn Personality Traits

कॅप्रीकॉर्न किंवा मकर राशीच्या व्यक्ती या रोमँटिक असतात पण त्या त्यांच्या पार्टनरसमोर कधीच त्यांच्या भावना व्यक्त करत नाहीत. मकरेचा राशिस्वामी शनी आहे. या राशीत जन्मलेल्या लोकांच्या स्वभावात त्यांच्या राशिस्वामी ग्रहाच्या प्रभावामुळे उदासपणा आणि गांभीर्य ओतप्रोत भरलेले असते. कॅप्रीकॉर्न ही पृथ्वीतत्त्वाची रास असल्यामुळे त्यांना स्थिर व सुरक्षित जीवन आवडते. तसेच ते त्यांच्या कुटुंबालाही शक्य तितके स्थिर व सुरक्षित देण्यासाठी प्रचंड मेहनत करतात. शनी हा कर्म व कर्मफळ यांचा कारक ग्रह आहे. त्यामुळे राशिस्वामी शनीच्या प्रभावाखाली असलेल्या मकर राशीच्या व्यक्ती या हट्टी आणि गंभीर असतात. 

(Capricorn) मकर राशीचे पुरुष कसे असतात  

Capricorn Personality Traits

मकर राशीचे पुरुष हे दिसायला हँडसम,बुद्धिमान आणि  मोहक असतात. त्यांचे व्यक्तिमत्व आणि विचार ठाम असतात. त्यांना जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर नियंत्रण ठेवण्यास आवडते. हे पुरुष विश्वासार्ह तर असतात पण प्रचंड गंभीर असतात. त्यांना उगाच जोखीम घेण्यास आवडत नाही कारण त्यांना एक स्थिर सुरक्षित आयुष्य आवडते. हे पुरुष अतिशय महत्वाकांक्षी असतात आणि स्वतः ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी ते कष्ट करण्यास मागेपुढे बघत नाहीत. पण ध्येयाकडे वाटचाल करताना हे पुरुष इतर कुणाचाही विचार करत नाहीत, अगदी स्वतःच्या जोडीदाराचाही. त्यांच्यालेखी ध्येय गाठणे, यश मिळवणे या गोष्टींना सर्वाधिक किंमत असते. कामाच्या व्यापात त्यांना इतर कशाचेही भान राखता येत नाही. आधीच भावना व्यक्त करण्यात अडचणी आणि त्यात जर हे पुरुष एखाद्या ध्येयाच्या मागे लागले तर अशावेळी त्यांच्या व त्यांच्या जोडीदाराच्या नात्यात कडवटपणा येऊ शकतो. 

समजण्यास अत्यंत कठीण मकर (Capricorn) राशीच्या व्यक्ती  

Capricorn Personality Traits

मकर ही रास समजण्यास कठीण राशींपैकी एक आहे. ते त्यांच्या उद्दिष्टांबद्दल खूप गंभीर असतात आणि करियरला ते त्यांच्या जीवनात प्रथम प्राथमिकता देतात. नातेसंबंधांमध्ये, ते रोमँटिक किंवा प्रेमळ नसतातच. तसेच, त्यांच्या भावना व्यक्त करणेही त्यांना फारसे जमत नाही.  मकरेचे पुरुष हे एकीकडे महत्त्वाकांक्षी, निष्ठावान, व्यावहारिक आणि शिस्तप्रिय असतात तर दुसरीकडे ते गंभीर, निराशावादी असतात. पण ते स्वतःच्या जबाबदाऱ्यांची कदर करण्याबरोबरच ते प्रचंड निष्ठावान आणि उदार असतात. ज्यांची त्यांना सर्वात जास्त काळजी असते त्यांना मदत करण्यास ते सदैव तयार असतात. मकरेचे पुरुष हे कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या खऱ्या भावना बाहेर येऊ देत नाहीत म्हणूनच त्यांना भावनाशून्य आणि अलिप्त समजले जाते..

मकर राशीच्या पुरुषांमध्ये अनेक उत्तम गुण असले तरी, त्यांची सर्वात मोठी कमजोरी ही त्यांची असुरक्षितता आणि त्यांच्या भावना व्यक्त करण्यात असमर्थता ही आहे. ही माणसे स्वतःचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या सर्व भावना मनात कुठेतरी एका कप्प्यात बंद करून ठेवतात. 

Photo Credit – istockphoto, freepik

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From अॅस्ट्रो वर्ल्ड