माणूस हा वयाच्या कोणत्याही वर्षी शिक्षण घेऊ शकतो. पुरुषांच्या बाबतीत शिक्षणासंदर्भात कोणत्याही अडचणी येत नाही. पण महिलांची साधारणपणे विशी ओलांडली की, त्यांच्या मागे नोकरी, लग्न, घर शिक्षण, संसाराची जबाबदारी अशा सगळ्याच गोष्टी येऊ लागतात. जर योग्य शिक्षण झाले नाही तर मुलींना करीअर करताना फारच जास्त अडचणी येतात. लग्नानंतर शिक्षण करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला शिक्षणासाठी नक्कीच अनेक पर्याय असतात. लग्न झाले म्हणजे तुम्ही करीअर करु शकत नाही असे मुळीच नाही. उलट खूप जणांचे करीअर हे लग्नानंतरच झालेले आहे. त्यामुळे लग्नानंतर शिक्षणाचा विचार करत असाल तर या गोष्टींचा विचार तुम्ही करायला हवा.
एखाद्या घरगुती बिझनेसमधून नफा कसा ठरवावा घ्या जाणून
वयाचा विचार करा
तुमचे लग्न कोणत्या वयात झाले आहे त्याचा विचारही तुम्ही शिक्षण करण्याआधी करायला हवा. काहींचे लग्न हे लवकर होते. पण काहींचे लग्न मात्र बरेच उशिरा होते. खूप उशीरा लग्न झालेल्यांना करिअरच्या संधी वयोमानानुसार फारच कमी मिळतात. कारण त्यांना मोठ्या आणि जास्तीत जास्त शिक्षणासाठी खूप वेळ घालवावा लागतो. त्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही वयाचा विचार हा सगळ्यात आधी करायला हवा. वयाची पंचविशी अजून गेली नसेल तर तुम्हाला बरेच काही करण्याची संधी मिळते. तुम्हाला अनेक पर्यायही मिळतात. त्यामुळे याचा विचार सगळ्यात आधी करायला हवा.
काय शिकायचे त्याची माहिती घ्या
तुम्हाला नेमके काय करायचे आहे त्याची माहिती देखील तुम्हाला असायला हवी. जर तुम्हाला त्याची माहिती नसेल तर तुम्ही त्याची सगळ्यात आधी योग्य माहिती घ्या. ही माहिती तुम्ही घेतली तर तुम्हाला शिकण्याची योग्य दिशा मिळते. ही दिशा मिळाली की बऱ्याच गोष्टी करणे फारच सोपे जाते. सगळी उत्तर गुगलकरुन मिळत नाहीत त्यामुळे योग्य करिअर गाईडंसचा सल्ला घेऊन मगच तुम्ही योग्य निर्णय घ्या
अभ्यासासाठी लागणारा वेळ
वय झाल्यानंतर किंवा काही जबाबदारी आल्यानंतर काही कामांसाठी वेळ काढणे कठीण होेते. महिलांना अनेक जबाबदाऱ्या आल्या की, अभ्यासाला वेळ काढणे कठीण होऊन जाते. त्यामुळे तुम्हाला अभ्यासाठी किती वेळ काढता येईल याचा अंदाज घ्यायला हवे. कुटुंबातील कोणती जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागते आणि त्यानुसार तुम्हाला नेमका किती वेळ जातो त्यामुळे तुम्हाला याचे गणित जुळवता यायला हवे. त्यामुळे तुम्ही या गोष्टींचा देखील विचार करायला हवा.
करिअर आणि कमाईचा विचार
तुम्ही जे काही शिकणार आहात त्याचा तुम्हाला फायदाही हवा असेल तर तुम्ही जे शिकणार आहात. त्यासाठी तुम्ही मागे काय शिकलेले आहात त्यालाच पुढे नेता येणे शक्य असेल तर तुमचा वेळ वाचेल आणि तुम्हाला कमाईची जास्त संधी मिळेल. त्यामुळे करिअर आणि कमाईचा विचार त्यासाठी तुम्हाला मिळणारे आर्थिक पाठबळ या सगळ्याचा विचार तुम्ही सगळ्यात आधी नक्कीच करायला हवे
आता लग्नानंतर शिक्षण करायचा विचार करत असाल तर नक्कीच या काही गोष्टींचा विचार करा