मनोरंजन

पूनम पांडेच्या त्या अश्लील व्हिडिओविरोधात गोव्यात तक्रार दाखल

Leenal Gawade  |  Nov 5, 2020
पूनम पांडेच्या त्या अश्लील व्हिडिओविरोधात गोव्यात तक्रार दाखल

कॉन्ट्राव्हर्सी क्वीन पूनम पांडे आता एका नव्या संकटात सापडली आहे. आपल्या अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करणारा एक अश्लील व्हिडिओ पोस्ट करणे तिला महागात पडले आहे. गोवा पोलिसांमध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लग्नानंतर गोव्यात हनीमूनसाठी  गेलेल्या पूनम पांडेने नवऱ्याविरोधातही तक्रार केली होती. आता तिच्याच अंगाशी अश्लील व्हिडिओ प्रकरण आल्यामुळे पुन्हा एकदा पूनम पांडेच्या नावाचा गजर होऊ लागला आहे. नेमकं हे प्रकरण काय हे अता जाणून घेऊया. 

गोव्यातील लोकांच्या भावना दुखावल्या

 गोव्यामध्ये हनीमूनसाठी गेलेल्या पूनम पांडेने केलेला तमाशा आतापर्यंत अनेकांना माहीत असेलच. पण याच गोव्याच्या उत्तर भागातील चापोली डॅम परीसरात तिने न्यूड फोटोशूट केले. यातील एक व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्रामवर टाकला. हा व्हिडिओ पोस्ट करताच अगदी काही काळात तिच्याविरोधात काही लोकांनी आवाज उठवला. गोव्याच्या हा भाग सरकारच्या अख्त्यारीत असून तिथे अशा प्रकारचे शूट करणे हे लाजिरवाणी गोष्ट आहे. अशा पद्धतीने अश्लील व्हिडिओ करुन गोव्यातील महिलांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. गोवा फॉरवर्ड पार्टीने हा गुन्हा दाखल केला असून पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

इन्स्टाग्रामवर दीपिकालाही मागे टाकलं श्रद्धा कपूरने, सर्वात जास्त आहेत फॉलोव्हर्स

हनीमूनच्यावेळी केला होता वेगळा तमाशा

पूनम पांडेने अचानक सॅम बॉम्बेसोबत लग्न केले. त्या लग्नाआधी तिने तिचे अनेक फोटो सॅम बॉम्बेसोबत शेअर केले होते. पण अचानक तिच्या लग्नाचे फोटो आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. लॉकडाऊनच्या या काळात लग्न करुन पूनम पांडे हनीमूनसाठी गोव्याला गेली होती. गोव्याला गेल्यानंतर तिने अगदी काहीच तासाच सॅमने तिच्यावर जबरदस्ती केली. तिला मारझोड करुन तिला मारण्याची धमकी दिली असे आरोप तिने सॅमवर केले होते. लग्नाला काही काळ जात नाही तोच तिने अशी तक्रार केल्यामुळे अनेकांसाठी ही बातमीही धक्का देणारी होती. पण हा तमाशा केल्यानंतर तिने अवघ्या काहीच तासाच हे सगळे प्रकरण मिटवले आणि आता ती त्याच्यासोबत अगदी व्यवस्थित असल्याचे दिसत आहे.

Bigg Boss 14: जास्मिनला वाचवल्यामुळे एजाज-पवित्रामध्ये भांडणाची ठिणगी

हा होता का पब्लिसिटी स्टंट

Instagram

पूनम पांडे नेहमीच प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी काहीतरी करत असते. या आधी तिने प्रसिद्धीत राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. अशा गोष्टी केल्यानंतर ती बऱ्याच काळासाठी प्रसिद्धीमध्येही राहिली आहे. आता लॉकडाऊनमध्ये उगाचच चर्चेत राहण्यासाठी तिने लग्नानंतरचा हा सगळा तमाशा केला असावा असा अंदाज अनेकांनी बांधला. पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी  ती हे सगळे करत असल्याचे तिच्या या सगळ्या प्रकरणावरुन वाटले. ते प्रकरण निवळत नाही तोच गोवा पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे तिला पुन्हा एकदा चर्चेत राहण्याचे कारण मिळाले आहे. 

साजरा केला करवाचौथ

सॅम बॉम्बेवर आरोप करुन आता त्याच्यासोबत पती-पत्नी नात्यासाठी सगळ्यात महत्वाच्या असलेल्या अशा करवाचौथ या सणाचा आनंदही तिने लुटला आहे. जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी मनोकामना करुन तिने हा तिचा दिवस साजरा केला आहे. त्यामुळे पूनम पांडेच्या सगळ्याच गोष्टी आम्हाला कळेनाशाच आहेत. 

दरम्यान, गोवा पोलीस तिला यातून कधी सुटका देईल किंवा तिला काही दंड भरावा लागेल का ते कळेलच.

केएल राहुलने केला आथियाबरोबर फोटो पोस्ट, लवकरच स्वीकारणार का नाते याबाबत चाहते उत्साही

Read More From मनोरंजन