Festival

गणेशोत्सवात बनवा हे ‘5’ प्रकारचे चविष्ट नैवेद्य

Trupti Paradkar  |  Aug 18, 2020
गणेशोत्सवात बनवा हे ‘5’ प्रकारचे चविष्ट नैवेद्य

गणेशोत्सव हा अकरा दिवस साजरा केला जाणारा एक मोठा सण आहे. ज्यामध्ये घरोघरी दीड, पाच, सात आणि अकरा दिवस गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. यंदा कोरोनामुळे हा उत्सव नेहमीप्रमाणे साजरा होणार नसला तरी उत्सवाचा आनंद आणि उत्साह नेहमीप्रमाणेच असेल. बाप्पाच्या स्वागत आणि पुजेच्या तयारीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे नैवेद्य. कारण हा नैवेद्य बाप्पाप्रमाणेच घरच्यांच्याही आवडीचा असतो. खंरतर बाप्पाला उकडीचे मोदक खूप आवडतात. पण बाप्पासाठी दररोज मोदकाचा नैवेद्य करणं सर्वांनाच शक्य होईल असं नाही यासाठी आम्ही तुम्हाला पाच प्रकारच्या अशा रेसिपीज शेअर करत आहोत. जे गोड पदार्थ तुम्ही बाप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी सहज करू शकता. 

पुरणपोळी –

पुरणपोळीचा नैवेद्य आपण गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी अथवा गौरीगणपतीसाठी नक्कीच करू शकतो. एकतर हा महाराष्ट्रातील एक खास गोड पदार्थ आहे ज्यामुळे प्रत्येक सणाला तो सर्वांनाच हवाहवासा वाटतो. शिवाय हा पदार्थ सतत केल्यामुळे हातवळणी पडलेला असतो. त्यामुळे गणेशोत्सवासाठी तो तुम्ही पटकन करू शकता. चविष्ट पुरळपोळीसाठी आम्ही शेअर केलेली रेसिपी ट्राय करा. 

पुरणपोळीसाठी साहित्य-

पुरणपोळी करण्याची पद्धत-

 

हरबरा डाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. त्यातील पाणी काढून त्यात किसलेला गुळ टाका आणि मंद आचेवर मिश्रण शिजवून घ्या. मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात वेलची पूड घालून ते मिक्सर अथवा पुरणयंत्रात वाटून घ्या. मैदा आणि गव्हाचे पीठ एकत्र करून सैलसर कणीक मळून घ्या. या कणकेची पारी तयार करून त्यात पुरणाचा गोळा भरा आणि अलगद पारीचे तोंड बंद करा. पोळी लाटून तूपावर खरपूस शेकवा. गरमागरम पोळी तूप, दुध आणि कटाच्या आमटीसोबत अगदी मस्त लागते. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही पुरणपोळ्या नक्कीच तयार करू शकता. 

माल पोहे –

मालपोहे भारतीय घरात गोडाधोडासाठी बऱ्याचदा केले जातात. सणसमारंभाला मालपोहा हा एक पटकन करता येण्यासारखा प्रकार आहे. बाप्पाच्या नैवेद्यासाठीही तुम्ही मालपोहे करू शकता. 

 

मालपोहा करण्यासाठी साहित्य –

 

मालपोहे करण्याची कृती –

 

एका भांड्यात दूध घ्या. त्या मावा अथवा मिल्क पावडर मिसळा आणि मिश्रण एकजीव करून घ्या. या मिश्रणात मैदा, बडीशोप आणि वेलची पावडर मिसळा. मिश्रण एकजीव करून घ्या. तुमच्या सोयीनुसार त्याचा घट्टपणा चेक करा. तव्यावर चांगले पसरेल इतपत दूध घालून मिश्रण पातळ करा. या मिश्रणाचे तव्यावर छोटे छोटे मालपोहे पसरवा. त्यावर तूप सोडून ते दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करा अथवा तूपात डीप फ्राय करा. एका दुसऱ्या भांड्यांत पाणी आणि साखर एकत्र मिसळून मंद आचेवर साधा पाक करून घ्या. या पाकात कमीत कमी चार तास मालपोहे बूडवून ठेवा. मालपोहे पाकात मुरले की सुक्यामेव्याने सजवा आणि बाप्पाला नेवेद्य दाखवा. 

श्रीखंड पुरी –

सणासुदीला महाराष्ट्रात श्रीखंड पुरी अथवा आमरस पुरीचा बेत हमखास केला जातो. सध्या आंब्याचा सिझन नाही त्यामुळे तुम्ही श्रीखंडपुरीचा नैवेद्य बाप्पाला दाखवू शकता. 

श्रीखंड तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –

 

श्रीखंड तयार करण्याची कृती –

 

श्रीखंडासाठी तुम्ही एक दिवस आधी दही लावून घ्या. त्यानंतर त्याचा चक्का बनवून घ्या. चक्का बनवण्यासाठी तुम्हाला दही फडक्यामध्ये घालून पूर्ण रात्रभर ठेवायचं असतं. त्यातील पूर्ण पाणी निघून जाऊन त्याचा चक्का तयार होतो. हा चक्का काढून नंतर त्यामध्ये साखर मिक्स करून राहू द्या. जितका चक्का तितकी साखर असं प्रमाण असू द्या. त्यानंतर हे मिश्रण चाळून घ्या. त्यातून जे मिश्रण येईल त्यामध्ये वेलची पावडर, जायफळ घालून चविष्ट श्रीखंड खायला घ्या. गव्हाच्या पीठाच्या पुऱ्या करा आणि श्रीखंड पुरीचा नैवेद्य बाप्पाला द्या. 

खीर –

महाराष्ट्रात निरनिराळ्या प्रकारच्या खीर केल्या जातात. तुम्ही तांदूळ, गहू, रवा, साबुदाणे , शेवया अशा अनेक प्रकारच्या खीर नैवेद्यासाठी करू शकता. 

शेवयांची खीर तयार करण्यासाठी साहित्य – 

 

खीर करण्यासाठी लागणारी कृती –

 

शेवया तूपामध्ये भाजून घ्याव्यात. त्यानंतर दूध गरम करून घ्यावं. शेवया भाजून झाल्यानंतर त्यात गरम दूध, साखर घालून त्याला मंद आचेवर उकळी देत राहावं. नंतर त्यामध्ये तुम्हाला हवं असल्यास वेलची पावडर आणि इतर ड्रायफ्रूटस घालावेत. अशाचप्रकारे तुम्ही निरनिराळ्या खीर बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार करू शकता. 

मिक्स ड्रायफ्रूट मोदक अथवा लाडू –

गणेशोत्सवासाठी एखादा नैवेद्याचा पदार्थ आधीच करून ठेवता येईल असा असावा. कारण गणेशाचे आगमन अथवा विसर्जनाच्या वेळी अथवा इतर कामाच्या गडबडीत असा तयार नैवेद्य तुम्हाला नक्कीच वापरता येऊ शकतो. यासाठी ड्रायफ्रूट लाडू अथवा मोदक तयार करून ठेवा.

ड्रायफ्रूट मोदकसाठी साहित्य –

ड्रायफ्रूट मोदक अथवा लाडू तयार करण्याची कृती –

एका भांड्यात तूप गरम करुन त्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट भाजून घ्या. अंजीर आणि खजूर आणि सर्व ड्रायफ्रूट मिक्सरमध्ये वाटून घ्या. तयार मिश्रण एकत्र करुन त्याचे मोदक तयार करा. मोदकाचा साचा यासाठी वापरा. या मिश्रणाचे लाडूही  तुम्ही वळून ठेवू शकता. 

 

 

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

‘गणेश चतुर्थी’ बद्दलची संपूर्ण माहिती (Ganesh Chaturthi Information In Marathi)

गणेशोत्सवाला दिसा उत्साही, घरीच करा असा झटपट मेकअप

बाप्पाला वाहण्यात येणाऱ्या ‘दुर्वां’ना आहे खास आरोग्यदायी महत्त्व

Read More From Festival