बॉलीवूड

टीव्हीवर ठरले हिट, पण बॉलीवूडमध्ये अनफिट, कोण आहेत हे कलाकार जाणून घ्या

Dipali Naphade  |  Nov 13, 2020
टीव्हीवर ठरले हिट, पण बॉलीवूडमध्ये अनफिट, कोण आहेत हे कलाकार जाणून घ्या

टीव्हीवर अनेक कलाकार प्रसिद्ध ठरतात. पण त्यांची पुढची पायरी असते ती म्हणजे बॉलीवूडमध्ये काम करणं. पण असे अनेक कलाकार आहेत जे टीव्हीवर काम करताना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले त्यांना बॉलीवूडमध्ये मात्र आपल्या अभिनयाची छाप सोडता आली नाही. त्यापैकी काही जणांचे तर पूर्ण करिअर खराब झाले. काही जणांना ना इथले ना इथले अशा परिस्थितीचाही सामना करावा लागला. अशाच काही कलाकारांबद्दल आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. 

राजीव खंडेलवाल

Instagram

टीव्हीवरील हा चॉकलेटी रोमँटिक असा चेहरा बॉलीवूडमध्ये जम बसवू शका नाही. बॉलीवूडमधील चित्रपटांमध्ये  काम करण्यासाठी आपले टीव्हीवरील करिअर राजीवने सोडले. पण इथलाही नाही आणि तिथलाही नाही अशी त्याची अवस्था झाली. राजीवने ज्या चित्रपटांमध्ये  काम केले त्यामध्ये त्याच्या कामाची प्रशंसा झाली मात्र त्याला हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही आणि चित्रपटही हिट झाले नाहीत. त्यानंतर त्याने काही शो साठी निवेदक म्हणून काम केले आणि वेबसिरीजमध्येही काम केले. पण पूर्वीची प्रसिद्धी त्याला पुन्हा मिळू शकली नाही. 

कंगना रणौतने घातलेला हा लेहंगा बनवायला लागले 14 महिने

करणसिंह ग्रोव्हर

Instagram

बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी करणसिंह ग्रोव्हरने तुफान लोकप्रिय ठरलेली मालिका ‘कुबूल है’ सोडली होती. पण त्यानंतर केवळ बिपाशा बासूशी लग्न सोडल्यास करणला कोणतीही प्रसिद्धी मिळवता आलेली नाही. करणसिंह ग्रोव्हरची आजही मुलींमध्ये क्रेझ असली तरीही चित्रपटांमध्ये करण आपल्या अभिनयाची जादू दाखवू शकलेला नाही. करणच्या लग्नाला आता चार वर्ष झाली असून करण केवळ सोशल मीडियावर सध्या दिसतो.  त्याच्याकडे अजून नक्की कोणता नवा प्रोजेक्ट आला आहे याची अजूनही कोणाला माहिती नाही. करण पुन्हा लहान पडद्याकडे वळणार अशी मध्यंतरी चर्चा होती त्यामुळे आता असे होणार का यासाठी त्याचे चाहतेही नक्कीच उत्सुक आहेत. 

सणासाठी करिना कपूरप्रमाणे दिसायचं असेल तर वापरा अशी लाल लिपस्टिक

कपिल शर्मा

Instagram

कपिल शर्मा हे नाव कोणाला माहीत नाही असे नाही.  लहान पडद्यावर सतत प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कपिल शर्मा अजूनही हेच काम करत आहे.  मात्र बॉलीवूडमध्ये एक – दोन चित्रपटात काम केल्यानंतर कपिलला यश मिळू शकलेले नाही. कपिल सध्या एका वेबसिरीजमध्येही काम करत आहे. पण बॉलीवूडमध्ये आणि अभिनयात कपिलला प्रेक्षकांनी स्वीकारलेले नाही. त्यामुळे पुन्हा कपिलने आपला जम आपल्या शो मध्येच बसवल्याचे दिसून आले आहे आणि प्रेक्षकांनीही पुन्हा कपिलला तितकाच भरभरून प्रतिसादही दिला आहे. 

मनिष पॉल

Instagram

मनिष पॉलचे नाव उत्तम निवेदकांमध्ये घेतले जाते.  मनिष पॉलचे कॉमेडी टायमिंग अप्रतिम असून आजही मनिष लहान पडद्यावर अनेक शो चे निवेदन करताना दिसतो. मात्र मनिषला बॉलीवूडमध्ये चित्रपटांमध्ये आपला जम बसवता आलेला नाही. मनिषचे चित्रपट सुपरफ्लॉप झालेले दिसून  आले आहेत. पण त्यावेळी त्याच्या करिअरवर खूपच परिणाम झाला होता. आता पुन्हा एकदा मनिष निवेदन करत आपला जम बसवत आहे. 

#Metoo नंतर आता तनुश्री दत्ताचे पुनरागमन, 15 किलो वजन केले कमी

जय भानुशाली

Instagram

लहान पडद्यावरील चॉकलेट बॉय आणि अप्रतिम निवेदकांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा जय भानुशालीदेखील चित्रपटांमध्ये आपला जम बसवू शकला नाही. पण  लहान पडद्यावरील प्रेम जयला मोठ्या  पडद्यावर मिळू शकले नाही. जयने पुन्हा आपली गाडी लहान पडद्याकडे वळवत रियालिटी शो चा निवेदक म्हणून कामाला पुन्हा सुरुवात केल्याचे दिसून आले. 

एजाज खान

Instagram

कही तो होगा या मालिकेने एजाज खानला एका रात्रीत स्टार बनवले. पण काही चुकीच्या निर्णयामुळे एजाजचे करिअर एकदमच बुडाले.  अनेक चुकीच्या  निर्णयाने त्याला नैराश्यानेही ग्रासले. सध्या एजाज खान ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) मध्ये सहभागी झाला आहे. पण प्रेक्षक त्याला पूर्वीसारखा बघू इच्छित असल्याने त्याच्या कामगिरीवर परिणाम होत आहे. 

प्राची देसाई

Instagram

कसम या मालिकेने प्राची देसाईला घराघरात पोहचवले. बॉलीवूडची दारे या शो मुळे तिला उघडी झाली. रॉक ऑन, वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई आणि बोलबच्चन सारख्या  चित्रपटांमध्ये काम करून प्राचीने प्रशंसा मिळवली. पण तरीही तिचे करिअर जास्त वर जाऊ शकले नाही. तिला नंतर ना काम मिळाले ना प्रसिद्धी. गेल्या कित्येक वर्षांपासून प्राची कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसत नाही. टीव्हीवरील प्रसिद्धी तिला बॉलीवूडमधून मिळू शकली नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From बॉलीवूड