अभिनेता प्रतिक बब्बरच्या जन्मानंतर काहीच दिवसात त्याची आई दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील याचं निधन झालं होतं. त्यामुळे लहानपणापासूनच प्रतिकच्या जीवनात आईची कमतरता होती. मात्र त्याने नेहमीच त्याचं आईवर असलेलं प्रेम विविध माध्यमातून व्यक्त केलं. आई आणि मुलाचं नात हे जगावेगळं नातं असतं. मुलाच्या जीवनातील आईची कमतरता कशानेही भरून काढता येत नाही. मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आईची गरज भासतेच. प्रतिक बब्बरही सध्या आईच्या आठवणीने भावुक झाला आहे. म्हणूनच आईची आठवण सतत राहावी यासाठी त्याने चक्क ह्रदयावर स्मिता पाटील याचं नाव कोरलं आहे.
आईच्या आठवणीने प्रतिक झाला भावूक
प्रतिक बब्बरने त्याच्या सोशल मीडिया पोस्टवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याने त्याच्या छातीवर म्हणजेच ह्रदयाजवळ स्मिता पाटील याच्या नवाचा टॅटू काढलेला दिसत आहे. हा टॅटू इंग्रजीत स्मिता या नावाचा आहे. टॅटू छातीवर डाव्या बाजूला काढला आहे कारण ह्रदय डावीकडे असतं. या फोटोसोबत प्रतिकने शेअर केलं आहे की, “मी माझ्या ह्रदयावर आईचं नाव कोरलं आहे ” पुढे प्रतिकने हार्ट इमोजी शेअर केली आहे. कारण त्याच्या मते त्याची आई त्याच्या ह्रदयातच आहे. त्याने smita#4ever आणि हार्ट इमोजी काढून ही भावना व्यक्त केली आहे. या टॅटू मध्ये प्रतिकने स्मिता पाटील यांची जन्मतारीख १९५५ काढली आहे मात्र पुढे मृत्यू दिनांकांच्या ठिकाणी इनफिनिटची इमोजी काढली आहे याचा अर्थ स्मिता पाटील अनंतात आहेत असा त्याचा अर्थ आहे. प्रतिकच्या या पोस्टवर चाहत्यांना लाईक्स असून हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्मिता पाटील एक दिग्गज अभिनेत्री
अभिनेत्री स्मिता पाटील यांचे चाहते आजही अनेक आहेत. स्मिता पाटील यांनी त्यांच्या सक्षम अभिनय आणि सौंदर्याने चित्रपटसृष्टीत स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवला होता. मराठी, हिंदी, गुजराती, मल्याळम आणि कन्नड अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी काम केलं होतं. एकतीस वयाच्या कारकिर्दीत स्मिता पाटील यांना उत्कृष्ठ अभिनयासाठी दोन वेळा नॅशनल अॅवॉर्डने गौरवण्यात आलं होतं. या व्यतिरिक्तही अभिनय क्षेत्रात त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले होते. मात्र अचानक १३ डिसेंबर १०८६ साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला. प्रतिक बब्बरच्या जन्मानंतर काहीच दिवसांमध्ये स्मिता पाटील यांचे निधन झाले. स्मिता पाटील यांच्या अगदी लहान वयात अकाली जाण्याने चित्रपटसृष्टीचं नुकसान तर झालंच पण यामुळे त्यांचा मुलगा प्रतिक बब्बरही आईच्या प्रेमाला मुकला. पुढे प्रतिक मोठा झाल्यावर त्याच्याकडूनही स्मिता पाटील यांच्याप्रमाणेच अभिनयाची अपेक्षा होऊ लागली. चाहते प्रतिकमध्ये स्मिता पाटील यांची झलक शोधू लागले. प्रतिकनेही आजवर अनेक हिंदी चित्रपट आणि वेबसिरिजमध्ये उत्कृष्ठ काम केलेलं आहे. आई स्मिता पाटील आणि वडील राज बब्बर यांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रतिक अभिनयात प्रगती करत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘मुंबई सागा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ज्यात त्याच्यासोबत जॉन अब्राहम, काजल अग्रवाल, इम्रहान हाश्मी यांच्या मुख्य भूमिका होत्या. लवकरच प्रतिक ‘ब्रम्हास्त्र’ आणि ‘बच्चन पांडे’मधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
नव्या चित्रपटासाठी मोनालिसा बागलचा Fit & Fine लुक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade