त्वचेची काळजी

अभिनेत्री प्रिया बापटने शेअर केलं स्किन केअर रूटिन, अशी घेते त्वचेची काळजी

Trupti Paradkar  |  Oct 20, 2020
अभिनेत्री प्रिया बापटने शेअर केलं स्किन केअर रूटिन, अशी घेते त्वचेची काळजी

त्वचेची नियमित निगा राखण्यासाठी एखादं परफेक्ट स्किन केअर फॉलो करणं गरजेचं असतं. कारण कोणत्याही प्रॉडक्ट अथवा स्किन केअरचा परिणाम तेव्हाच दिसून येतो जेव्हा ते नियमित आणि सातत्याने वापरले जातात. सेलिब्रेटीजनां सतत सुंदर आणि फ्रेश दिसण्यासाठी असं एखादं बेस्ट स्किन केअर रूटिन फॉलो करण्याची नक्कीच गरज असते. नुकतंच सर्वांच्या आवडती मराठमोठी अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या सुंदर त्वचेचं गुपित सर्वांसोबत शेअर केलं आहे. प्रियाने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर स्किन केअर रूटिन शेअर केलं आहे. जाणून घ्या प्रिया सुंदर आणि फ्रेश दिसण्यासाठी नेमकं काय करते.

प्रियाचं स्किन केअर रूटिन

प्रियाने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केलं आहे  की, “जर आपण आपल्या आहाराची, डाएटची आणि मनाची एवढी काळजी घेतो तर आता वेळ आली आहे स्वतःला हे सांगण्याची की आपल्या त्वचेलाही तितक्याच काळजीची गरज आहे. तुम्ही मला  नेहमी माझ्या  स्किन केअर रूटिनविषयी विचारत असता. यासाठी मी शेअर करत आहे दिवसभर शूट करून थकुन घरी आल्यार मी माझ्या त्वचेसाठी नेमकं काय करते. मी सध्या सर्व काही #NewNormal होत असताना माझ्या त्वचेची निगा राखण्यासाठी #PlumGreenTeaChallenge घेतलेलं आहे.”

 तिने दी फिल्मीकुडीला हे चॅलेंज देत सर्वांना हे चॅलेंज घेत प्लमचे प्रॉडक्ट वापरण्याचा सल्ला दिलेला आहे. प्लम ब्रॅंडचे सर्वच प्रॉडक्ट छान असून त्यात ग्रीन टीचा वापर करण्यात आलेला आहे. ग्रीन टी  तुमच्या त्वचेसाठी फारच फायदेशीर ठरते. शिवाय हे  सर्व प्रॉडक्ट विगन असल्यामुळे यासाठी कोणत्याही प्राण्यांचा वापर केलेला नाही शिवाय कोणत्याही प्राण्यांवर हे प्रॉडक्ट टेस्ट करण्यात आलेले नाहीत. प्रियाने या पोस्टसोबत एक छान व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिने ती शूटिंगवरून घरी आल्यावर त्वचेची काळजी घेण्यासाठी फेसवॉश, फेसपॅक आणि नाईट क्रिमचा कसा वापर करते हे दाखवलं आहे. या प्रॉडक्टचं प्रमोशन करण्यासाठी प्रियाने तिच्या अभिनयाचा खूपच सुंदर पद्धतीने वापर केला आहे. ज्यामुळे प्रियाचे चाहते तिच्याप्रमाणे दिसण्यासाठी नक्कीच या प्रॉडक्टचा वापर करतील.

प्रियाचं फॅशन सिक्रेट

प्रिया आणि तिचा नवरा अभिनेता उमेश कामत दोघंही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. त्या दोघांचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. त्यामुळे प्रिया तिच्या ब्युटी सिक्रेट प्रमाणे प्रिया तिचं फॅशनचं सिक्रेटही नेहमी चाहत्यांसोबत शेअर करत असते. प्रियाच्या साड्यांचे कलेक्शन एकापेक्षा एक भारी असून ती नेहमी तिचे साड्यांमधील वेगवेगळे लुक शेअर करत असते. प्रियाने नुकतंच तिच्या बहिणीच्या Sawenchi या ब्रॅंडसोबत पार्टनशिप केली आहे. ज्या माध्यमातून ती तिचं साड्यांवरचं प्रेम आता सोशल मीडियावर व्यक्त करत आहे. प्रियाच्या या नव्या कलेक्शनमधून तुम्हीही नवनवीन प्रकारच्या साड्या नक्कीच खरेदी करू शकता.

अशा हॅंडलूमच्या साड्या नेसल्यावर प्रियाने सांगितलेलं स्किन केअर रूटिन फॉलो केल्यावर बाहेर जाताना लुक कम्पीट करण्यासाठी मायग्लॅमची लिपस्टिक लावायला मुळीच विसरू नका.

मात्र यासाठी तुम्हाला मायग्लॅमच्या #TheGreatGlammSurvey मध्ये सहभागी व्हावं लागेल. मायग्लॅमचा सर्व्हे पूर्ण केल्यावर तुम्हाला @MyGlgamm मिळेल 1000 रू. पर्यंत ब्युटी बेनिफिट्स आणि लिट लिक्विड मॅट कलेक्शनमधील एक लिपस्टिक चक्क मोफत

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –


त्वचा कोरडी होत असेल तर वापरा या 7 सोप्या टिप्स

फेस्टिव्ह सीझनमध्ये साबुदाण्याच्या फेसपॅकने त्वचा करा चमकदार

फळांचा असा वापर करुन मिळवा तजेलदार त्वचा

 

Read More From त्वचेची काळजी