मनोरंजन

प्रियांका चोप्रा लवकरच होणार आई, फॅमिली प्लॅनिंगबाबत केला मोठा खुलासा

Trupti Paradkar  |  Jan 12, 2021
प्रियांका चोप्रा लवकरच होणार आई, फॅमिली प्लॅनिंगबाबत केला मोठा खुलासा

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या घरी मुलीचं आगमन झालं आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सहाजिकच त्यामुळे त्यांच्या पाठोपाठ लग्न झालेल्या प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या फॅमिली प्लॅनिंगबाबत चर्चा सुरू झाली. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाला आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे चाहते त्यांच्या गुडन्यूजची आतूरतेने वाट पाहत आहेत. प्रियांका चोप्रानेही एका मुलाखतीत तिच्या फॅमिली प्लॅनिंगबाबत बेधडकपणे एक खुलासा केला आहे. ज्यात तिने तिचं वैयक्तिक आयुष्य, लग्न, करिअर आणि फॅमिली प्लॅनिंगवर चर्चा केली. एवढंच नाही तर तिने या मुलाखतीत चक्क तिला किती मुलं हवी हेही उघडपणे सांगितलं आहे.

instagram

प्रियांका आणि निकचे खाजगी आयुष्य –

प्रियांकाने या मुलाखतीत सांगितलं आहे की ती जेव्हा निक जोनाससोबत असते तेव्हा आयुष्य तिला सर्वात जास्त आरामदायक आहे असं वाटतं. तिच्या मते ती प्रोफेशनल लाईफमध्ये ती कशीही असली, लोक तिच्याबाबत काही विचार करत असले तरी ती ती एक मुलगी आहे आणि तिला तिचं आयुष्य तिच्या मनाप्रमाणे आणि अप्रतिम पद्धतीने जगायचं आहे. त्यामुळे ती स्वतःला खूप भाग्यवान समजते की तिला निक जोनास सारखा चांगला लाईफ पार्टनर मिळाला. या मुलाखती दरम्यान निक जोनास आणि तिला त्यांच्या फॅमिली प्लॅनिंगबाबत विचारलं असता तिने अगदी दिलखुलास उत्तर दिलं आहे. प्रियांकाने सांगितलं की तिला लवकरच आई व्हायचं आहे, एवढंच नाही तर तिला भरपूर म्हणजे जितकी होतील तितकी मुलं हवी आहेत. जवळजवळ एखाद्या क्रिकेट टीमएवढी मुलं तिला निकसोबत हवी आहेत. हा धक्कादायक खुलासा ऐकून प्रियांका लवकरच तिची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर करणार याचा अंदाज येत आहे.

instagram

प्रियांका आणि निकच्या वयातील अंतर –

प्रियांकाला निक जोनास आणि तिच्या वयामध्ये असलेला फरकाबाबत विचारल्यावर तिने सांगितलं की, तिच्या आणि निकच्या वयात दहा वर्षांचं अंतर आहे. ती निकपेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे. शिवाय तिच्या आाणि त्याच्या संस्कृतीतही खूप मोठा फरक आहे. मात्र वय अथवा संस्कृती याचा त्यांच्या नात्यावर कधीच आणि काहीच परिणाम झालेला नाही. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास एखाद्या इतर कपलप्रमाणेच त्यांच्या आवडीनिवडी, सवयी एकमेंकांसोबत शेअर करतात. प्रियांकाच्या मते निकसोबत आयुष्य घालवणं म्हणजे एखाद्या अॅडव्हेंचरप्रमाणे आहे. त्यामुळे दोघांच्या नात्यात कधीही कोणतीच अडचण अथवा समस्या निर्माण होत नाही. 

instagram

प्रियांकाच्या आगामी प्रोजक्टविषयी

प्रियांकाचा नुकताच ‘दी व्हाईट टायगर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये प्रियांका आणि राजकुमार राव यांची मुख्य भूमिका होती. प्रियांकाच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे लवकरच ती ‘दी मॅट्रिक्स’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यानंतर तिचा ‘दी टेक्ट फॉर यू’ हा चित्रपटही येणार आहे. एवढंच नाही तर या वर्षी प्रियांकाचं आत्मचरित्र देखील लवकरच प्रकाशित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिचं पुस्तक ‘अनफिनिश्ड’ लवकरच प्रकाशित होणार असून त्याचं प्री बुकिंग सुरू असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर पहिल्या बारा तासातच प्रियांकाच्या पुस्तकाला प्रंचड मागणी येऊ लागली. थोडक्यात नवीन वर्ष प्रियांकासाठी चांगलं ठरलं असून लवकरच ती तिची गोड बातमीदेखील चाहत्यांसोबत शेअर करेल.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

सहा महिन्यातच बंद होणार एकता कपूरची ‘नागिन 5’, नवीन मालिकेची घोषणा

बॉलीवूडच्या अभिनेत्री ज्या आहेत यशस्वी बिझनेस वुमन

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधून नायराची एक्झिट, शिवांगी जोशीने सोडली मालिका

Read More From मनोरंजन