प्रियांका चोप्रा जोन्स झाल्यापासून चांगलीच चर्चेत आली आहे. तिला प्रत्येक ठिकाणी फॉलो करण्यात येत आहे. सगळ्यात गोष्टी प्रियांकासाठी गुडी गुडी झाल्या आहेत. पण एक व्यक्तिने एक असा अनुभव शेअर केला आहे. त्यातून ‘प्रियांका तू किती ग निष्ठुर’ असे तुम्ही म्हणाल. ही व्यक्ती एक बॅक डान्सर असून त्याने त्याचा अनुभव एका रिअॅलिटी शोमध्ये केला आहे. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याची आपबीती सांगत आहे. त्याचा बोलण्यातील विश्वास पाहता तो नक्कीच खोटं बोलत नसावा असे वाटत आहे.
कोल्हापूर डायरीजमधून झळकणार तुमची लाडकी ईशा
प्रियांकाची निष्ठुरता
बॅक डान्सरने Roadies या कार्यक्रमादरम्यान आपला अनुभव सांगितला आहे. सारंग असे या बॅक डान्सरचे नाव असून त्याने त्याच्या माहिती अर्जावर मला प्रियांका चोप्राला मारायचे आहे असे लिहिले. त्यावर परिक्षकाची भूमिका साकारणाऱ्या नेहाने सारंगला त्याचे कारण विचारल्यानंतर त्याने त्याच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला. तो म्हणााला की, मी बॅक डान्सर म्हणून काम करत असताना एकदा एका स्टेज परफॉर्मन्ससाठी आम्ही तयारी करत होते.संपूर्ण दिवस सराव केल्यानंतर जेव्हा प्रियांका सेटवर आली त्यावेळी तिने सगळ्या स्टेप्स बदलायल्या लावल्या. आयत्यावेळी हे बदल केल्यामुळे माझ्या सगळ्या टीमला दुसऱ्या दिवशी सकाळी ६ पर्यंत सराव करावा लागला. न जेवता आम्ही सकाळी६ पर्यंत सराव करत होते. त्याचे तिचा काहीच वाटले नाही. ती ज्यावेळी रिर्हसलला यायची त्या प्रत्येकवेळी तिचे वागणे असे असायचे की, आम्हा बॅक डान्सर्सना कोणता दर्जाच नाहीए. त्यामुळे त्या दिवसापासून मला प्रियांका चोप्रा आवडत नाही. तिच्या या वागणुकीमुळे तिला मारायचे आहे. असे त्याने स्पष्ट केले. त्याच्या या अनुभवावरुन प्रियांकाची निष्ठुरता समोर आली आहे.
प्रियांका आणि नीकचे व्हेकेशन फोटो व्हायरल
आता प्रियांका देईल का उत्तर ?
इतक्या स्पष्टपणे या स्पर्धकाने अनुभव सांगितल्यानंतर आता प्रियांका त्यावर काय प्रतिक्रिया देते याची प्रतिक्षा आहे. पण अद्याप प्रियांकाने या प्रश्नाचे काहीच उत्तर दिलेले नाही. हा व्हिडिओ Roadiesने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
मलायका आणि अर्जुनची लग्नघटीका आली समीप
प्रियांका दुतोंडी
प्रियांका चोप्राने काही वर्षांपूर्वी दिवाळीत फटाके उडवू नका. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. प्रदूषण वाढते, असा संदेश दिला होता. पण ज्यावेळी तिने स्वत:च्या लग्नात फटाक्याची फटाके फोडले आणि त्याचे व्हिडिओ शेअर केले त्यावेळी नेटीझन्सनी तिला दुतोंडी म्हटले होते. आधी सांगायचे एक आणि वागायचे वेगळे हा दुतोंडीपणा आहे. त्यामुळे तिच्यावर सडकून टीका झाली होती. प्रियांकाला त्या संदर्भात नोटीस देखील बजावली होती.
(सौजन्य-Instagram)
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje