मनोरंजन

मालिकांचे काम बंद करणे आता अशक्य, निर्माते या परिस्थितीसाठी तयार

Dipali Naphade  |  Jul 14, 2020
मालिकांचे काम बंद करणे आता अशक्य, निर्माते या परिस्थितीसाठी तयार

गेल्या काही दिवसांपासून मालिकांचे चित्रीकरण सुरू झाले आहे. मात्र काही मालिकांच्या सेटवर अचानक कोरोना संक्रमित सापडल्याने ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेचे चित्रीकरण थांबवावे लागले. मुंबई महानगरपालिकेच्या आदेशावरून इतर क्रू सभासद आणि कलाकारांनाही आता टेस्ट करावी लागणार आहे. या मालिकेशिवाय इतरही काही मालिकांच्या  सेटवर अशीच अवस्था आहे. पण या सगळ्या परिस्थितीशी सामना करायला आता सगळेच तयार झाले आहेत. विशेषतः निर्माते. इतक्या लवकर मनोरंजन क्षेत्रात अनलॉक करण्याचा निर्णय योग्य होता का याचं उत्तर काही निर्मात्यांनी दिलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या परिस्थितीसाठी आम्ही तयार झालो आहोत. सगळी काळजी घेऊनही कुठे ना कुठेतरी काहीतरी होणारच. पण ज्याचं हातावर पोट आहे त्यांच्यासाठी हा निर्णय घेणं गरजेचं आहे असंही बाकीच्या निर्मात्यांचं मत  आहे. 

या परिस्थितीसाठी आम्ही तयार – जेडी मजिठिया

या बाबतीत जेडी मजिठिया यांच्याशी एका वृत्तपत्राने संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, ‘खरं तर आम्ही या परिस्थितीसाठी पहिल्यापासून तयार आहोत. जेव्हा आम्ही चित्रीकरणाला सुरूवात केली तेव्हाच आम्हाला याचा अंदाज होता की कधी ना कधीतरी अशी परिस्थिती येणार की सेटवर कोणाला ना कोणाला तरी कोरोनाची बाधा होणार. तुम्ही कितीही काळजी घेतली तरीही तुम्ही यावर पूर्ण नियंत्रण मिळवू शकत नाही. अमिताभ बच्चन यांना कशी बाधा झाली? आपल्याकडे डॉक्टर्स असो वा पोलीस सगळ्यांनाच यातून जावं लागत आहे. पण त्यांनी आपलं काम थांबवलं नाही. त्याप्रमाणेच आता मालिकांचे कामा बंद करणे शक्य नाही. आम्हाला काम थांबवून चालणार नाही.’ तर  पुढे त्यांनी असं म्हटलं की, ‘आम्ही टीव्ही इंडस्ट्रीमध्ये  काम करत आहोत, जे लोकांचं मनोरंजन करण्याचं  काम करतात. कितीतरी लोक सध्या निराशेच्या गर्तेत आहेत. त्यांच्यासाठी आम्ही काम करत आहोत. आम्हीदेखील कोव्हिड योद्धाच आहोत. बऱ्याच जणांना वाटतं की पैशाच्या मागे धावतोय. पण असं नाहीये. आमच्यासाठीदेखील हे एक आव्हान आहे. कामगारांना काम मिळावं आणि त्यांना आपलं कुटुंब चालवता यावं यासाठी आम्ही हा निर्णय घेतला  आहे. आम्ही जास्तीत जास्त काळजी घेण्याचा प्रयत्न करतच आहोत.’

अजून एका अभिनेत्रीचे निधन, 29 व्या वर्षीच कॅन्सरमुळे गमावले प्राण

असे आव्हान येणार याची कल्पना होती – बिनैफर कोहली

काही दिवसांपूर्वी ‘भाभीजी घर पर है’ च्या सेटवरदेखील कोरोनाबाधित व्यक्ती सापडली. पण निर्माता बिनैफर कोहलीने सांगितलं की आम्ही योग्य ती काळजी घेत आहोत. ‘जेव्हा चित्रीकरणाला सुरूवात झाली तेव्हाचा अशा आव्हानांचा सामना करावा लागेल याची कल्पना होती. आम्ही शासनाने दिलेल्या गाईडलाईन फॉलो केल्या आहेत किंबहुना त्यापेक्षा जास्त काळजी घेत आहोत. दोन – दोन  वेळा प्रत्येकाची टेस्ट केली आहे. तरीही इन्फेक्शन कुठून कसं होतं ते माहीत नाही. पण आम्ही सेटवर सर्वात चांगल्या उत्पादनांचाच वापर करत आहोत. त्यामुळे काम थांबवू शकत नाही. मी नेहमी टीमला हेच सांगते की  आम्ही तुमची काळजी घेतच  आहोत तुम्हीही काळजी घ्या. कितीतरी लोकांचे पोट कामावर अवलंबून असते. या गोष्टीची काळजी करणंही अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आता काम थांबवून चालणार नाही. कोरोनाबरोबरच जगावं लागेल.’

इशा गुप्ताचे हॉट फोटोशूट, तूप खाऊन मेंटेन केली फिगर

मनोरंजन करणं थांबवता येणार नाही

गेले तीन महिने मनोरंजन क्षेत्राचं नुकसान तर झालंच आहे पण त्याहीपेक्षा अनेक लोक आहेत ज्यांचं कुटुंब चालतं त्यांना खूपच त्रास होत आहे. जर कमाई झालीच नाही तर कुटुंब कसं पोसणार.  त्यामुळे आता काम थांबवता येणं शक्य नसल्याचं अनेक जणांनी सांगितलं आहे. योग्य काळजी घेत आता काम सुरूच राहील असंही सांगण्यात आलं आहे.   

मुंबईच्या डब्बेवाल्यांवरच उपासमारीची वेळ, या अभिनेत्यांनी पुढे केला मदतीचा हात

Read More From मनोरंजन