आरोग्य

टॉयलेट सीटवर टॉयलेट पेपर वापरणे पडू शकते महागात, होऊ शकते इन्फेक्शन 

Vaidehi Raje  |  Jul 1, 2022
Putting Toilet Paper on Toilet Seat

तुम्ही देखील विमानतळ किंवा रेस्टॉरंटमधील सार्वजनिक शौचालय वापरण्यापूर्वी स्वच्छतेच्या नावाखाली टॉयलेट सीटवर टिश्यू पेपर वापरता का? अशा लोकांचा असा विश्वास आहे की असे केल्याने जंतू, बॅक्टेरिया किंवा संसर्ग त्यांच्या त्वचेच्या संपर्कात येणार नाहीत. पण सत्य हे आहे की, ही सवय तुम्ही लगेच बदलली नाही, तर तुम्ही आजारी पडू शकता. तुमची ही सवय तुम्हाला आजारी बनवू शकते.तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार जितके बॅक्टेरिया बाथरूममध्ये ठेवलेल्या टॉयलेट पेपरवर असतात तितके ,टॉयलेट सीटवर नसतात. टॉयलेट सीटचा पृष्ठभाग अशा प्रकारे डिझाइन केलेला असतो की त्याच्या वरच्या भागावर जीवाणू वाढू शकत नाहीत. जरी बसण्याच्या जागेच्या आतील बाजूस E. Coli सारखे हानिकारक बॅक्टेरिया असू शकतात, परंतु तरीही टॉयलेट सीट बाथरूममध्ये ठेवलेल्या इतर गोष्टींपेक्षा जास्त स्वच्छ असते.

टॉयलेट पेपर म्हणजे जंतूंचे प्रजनन स्थळ असते 

Putting Toilet Paper on Seat

टॉयलेट पेपर हे सूक्ष्मजंतू म्हणजेच हानिकारक जीवाणूंच्या प्रजननासाठी योग्य ठिकाण आहे. कारण कागद ओलावा शोषून घेतो आणि त्याचा पृष्ठभागही खडबडीत असतो. बहुतेक लोक सार्वजनिक ठिकाणी टॉयलेटला गेल्यावर टॉयलेट पेपर वापरतात आणि तो वापरताना हाताने स्पर्श करतात. टॉयलेट सीटवर बसताना आपला पार्श्वभाग आणि मांड्यांचा भाग टॉयलेट सीटच्या संपर्कात येतो. शरीराचा हा भाग नेहमी पँट, पायजमा किंवा इतर कपड्यांनी झाकलेला असतो आणि यामुळे शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत तो जंतूमुक्त आणि स्वच्छ देखील असतो. पण सार्वजनिक टॉयलेट्समध्ये ठेवलेल्या टॉयलेट पेपरच्या संपर्कात आल्यावर आपल्या शरीराच्या या भागांवर देखील जिवाणू व सूक्ष्मजंतू येऊ शकतात. 

सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

सार्वजनिक शौचालय वापरण्यापूर्वी फ्लश करायचे कायम लक्षात ठेवा. तसेच स्वच्छतागृहाचा वापर केल्यावर हात धुण्यासाठी अँटी-बॅक्टेरियल साबण वापरा. टॉयलेटच्या दरवाजाला हात लावल्यानंतर हात धुतलेच पाहिजेत. सार्वजनिक शौचालयात इलेक्ट्रिक हँड ड्रायर वापरणे टाळा, कारण त्याचा वापर करून तुम्ही बॅक्टेरियांना मेजवानी देता.

टॉयलेट सीट कव्हर्स देखील इन्फेक्शनसाठी असू शकतात जबाबदार 

Putting Toilet Paper on Seat

बॅक्टेरिया आणि विषाणू लहान असतात ते सीट कव्हरच्या मोठ्या छिद्रांमधून जाऊ शकतात. याचा अर्थ की टॉयलेट सीट कव्हर्स हे जंतूंचा प्रसार थांबवत नाहीत. टॉयलेट सीटला स्पर्श केल्याने तुमच्या त्वचेतून जंतूंचा संसर्ग होण्याचा धोका तितका नसतो जितका टॉयलेट सीट कव्हर व टॉयलेट पेपरमधून असतो. तुम्ही फ्लश केल्यानंतर जंतूंचा प्रसार होण्याची शक्यता जास्त असते, जेव्हा विष्ठेचे बारीक कण एरोसोलच्या स्वरूपात हवेत जातात, ही घटना “टॉयलेट प्लम” म्हणून ओळखली जाते. तिथून विष्ठेचे बारीक कण स्वच्छतागृहाच्या पृष्ठभागावर स्थिर होतात. या ठिकाणी स्पर्श केल्याने आपले हात दूषित होतात आणि नंतर तेच हात आपण न धुता इकडे तिकडे लावतो तेव्हा ते बारीक कण डोळे, नाक किंवा तोंडात पसरू शकतात. म्हणूनच स्वच्छतागृहाचा वापर केल्यावर कायम अँटी बॅक्टेरियल साबणाने हात स्वच्छ धुवावेत. 

संशोधनात असेही आढळले आहे की टॉयलेट सीट कव्हरमुळे मुळे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज व गॅस्ट्रोइंटेस्टाइनल संक्रमण पसरते. आणि टॉयलेट पेपरने सीट कव्हर केल्यास  गोष्टी आणखी वाईट होऊ शकतात. टॉयलेट सीटवर टॉयलेट पेपरचे तुकडे कव्हर म्हणून ठेवल्याने जंतूंच्या वाढीसाठी पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढते. सार्वजनिक स्वच्छतागृहांमधील सर्वात मोठा धोका म्हणजे जंतू तोंडात पसरणे हा आहे आणि त्याची सुरुवात आपल्या हाताने होते. म्हणूनच हात धुताना हातात साबण घेऊन  20 सेकंद हात व्यवस्थित चोळावे व नंतर पाण्याने धुवावेत. अशाने हातावरील सर्व जंतू नष्ट होतात आणि संक्रमण होण्याचा धोका कमी होतो. 

म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी टॉयलेट सीटवर टॉयलेट पेपरचा वापर करू नये.

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य