बॉलीवूड अभिनेता आर. माधवन बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावर दिसला नाहीये, पण कालपासून त्याची एक सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्याचा मुलगा वेदांत माधवनचा उल्लेख आहे, ज्याने स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. माधवनने स्वतः याबद्दल एक पोस्ट लिहिली आहे आणि याबद्दल माहिती दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत. रहना है तेरे दिल में पासून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवल्यानंतर 3 इडियट्स चित्रपटात अभिनेता माधवनला लोकांचे खूप प्रेम मिळाले. त्यानंतर तो इंडस्ट्रीचा फेव्हरेट बनला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ माधवनच नव्हे तर त्याच्या मुलाचीही खूप चर्चा होते आणि तीही अभिनयामुळे नाही तर एका वेगळ्या स्किलमुळे! जिथे इतर स्टारकिड्स आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनयाच्या क्षेत्रातच उतरत आहेत, तिथे माधवनच्या मुलाने म्हणजेच वेदांतने आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तुंग यश मिळवून देशाला अभिमान वाटेल असे कार्य केले आहे.
परदेशात रौप्य पदक जिंकून उंचावले देशाचे नाव
माधवनचा मुलगा वेदांत माधवन अतिशय उत्तम जलतरणपटू म्हणून उदयास येत आहे. कोपनहेगन येथे झालेल्या डेन्मार्क ओपनमध्ये पुन्हा एकदा देशाचे नाव उंचावणाऱ्या वेदांतने रौप्य पदक जिंकले आहे. वेदांत माधवन याने कोपनहेगन येथील डेन्मार्क ओपनमध्ये रौप्य पदक जिंकून जागतिक पातळीवर देशाची मान उंचावली आणि त्याच्या वडिलांसाठीही अभिमानाचा क्षण निर्माण केला. आपल्या मुलाच्या जलतरणातील यशाबद्दल अत्यंत अभिमान वाटत असलेल्या माधवनने त्याच्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून आपला हा आनंद सर्वांबरोबर शेअर केला. आपल्या मुलाला रौप्य पदक मिळाल्याची व्हिडिओ क्लिप पोस्ट करताना माधवनने लिहिले की, “वेदांत माधवनने कोपनहेगनमधील डॅनिश ओपनमध्ये भारतासाठी रौप्यपदक जिंकले. प्रदीप सर, स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि #ansadxb तुमच्या सर्व प्रयत्नांबद्दल तुमचे खूप खूप आभार. आम्हाला खूप अभिमान वाटत आहे.”
भारताच्या संपूर्ण टिमचीच उत्तम कामगिरी
अव्वल भारतीय जलतरणपटू साजन प्रकाशने कोपनहेगन, डेन्मार्क येथे झालेल्या डॅनिश ओपन स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 200 मीटर बटरफ्लाय या कॅटॅगरीमध्ये सुवर्णपदक जिंकून या सिझनची एक उत्तम सुरुवात केली. या वर्षीच्या आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत असलेल्या प्रकाशने शुक्रवारी रात्री 1.59.27 सेकंदांची वेळ नोंदवली. तत्पूर्वी, केरळचा जलतरणपटू 2.03.67 सेकंद वेळेसह ‘अ’ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. दोन वेळा ऑलिम्पियन राहिलेले प्रकाश म्हणाले, “या महिन्यात काही महत्वाच्या स्पर्धा आहेत. राष्ट्रकुल खेळ आणि आशियाई खेळांसाठी आम्ही हळूहळू शीर्षस्थानी येण्याचा प्रयत्न करू.”
वेदांतने केले उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन
भारताच्या इतर कुशल जलतरणपटूंप्रमाणेच वेदांत माधवननेही आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी सुधारण्यासाठी सकारात्मक सुरुवात केली आणि पुरुषांच्या 1500 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत रौप्य पदक मिळवले. वेदांतने १० जलतरणपटूंच्या अंतिम फेरीत 15.57.86 सेकंद वेळेसह दुसरे स्थान पटकावले. आपल्या मुलाच्या या यशाबद्दल आर माधवनने आनंद व्यक्त केला आहे. सोळा वर्षीय वेदांतने मार्च 2021 मध्ये लॅटव्हिया ओपनमध्ये कांस्यपदक जिंकले होते. त्याने गेल्या वर्षी ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सात पदके (चार रौप्य आणि तीन कांस्य) जिंकून सगळीकडे आपली छाप पाडली होती. तर महिलांच्या 400 मीटर ब फायनलमध्ये शक्ती बालकृष्णनने दुसरे आणि एकूण आठवे स्थान पटकावले. स्पर्धेत भाग घेणारा चौथा भारतीय जलतरणपटू तनिश जॉर्ज मॅथ्यू 50 मीटर फ्रीस्टाइलमध्ये 29व्या स्थानावर राहिला.
जागतिक पातळीवर देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या वेदांत व इतर कुशल जलतरणपटूंचे हार्दिक अभिनंदन!
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade