मनोरंजन

मराठमोळ्या ‘राधाकृष्ण’ सुमेध मुदगरलकरचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल अवाक!

Dipali Naphade  |  Apr 23, 2020
मराठमोळ्या ‘राधाकृष्ण’ सुमेध मुदगरलकरचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल अवाक!

मराठमोळ्या सुमेध मुदगलकरने ‘राधाकृष्ण’ या मालिकेतून कृष्ण साकारून अनेकांचे मन जिंकून घेतले आहे. सुमेधचे अनेक चाहते आहेत आणि यामध्ये त्याचा फिमेल फॅन फॉलोईंग अधिक आहे. पण तुम्हाला माहीत आहे का मालिकांमध्ये काम करण्यापूर्वी सुमेधने काही डान्स रियालिटी शो मध्येही भाग घेतला होता आणि या शो मध्ये पहिल्या पाचामध्ये त्याचा क्रमांक होता. सुमेध अतिशय कमालीचा डान्सरही आहे. सध्या सगळेच लॉकडाऊनमध्ये काही ना काही करत आहे. सुमेधचे अनेक तास सध्या मालिकेच्या चित्रीकरणात जात असल्यामुळे त्याला डान्सचा सराव करण्यासाठीही वेळ मिळत नव्हता. पण आता पुन्हा सुमेध डान्सचा सराव करत असून त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यावर त्याचा डान्स पाहून अनेकांच्या कमेंट्स येत आहेत. त्यामध्ये ‘अलादिन’फेम सिद्धार्थ निगमही सुमेधच्या डान्सने भारावून गेल्याची कमेंट आहे. 

अंडरवर्ल्डच्या संपर्कामुळे संपले या अभिनेत्रींचे करीअर

सुमेधने केला रणबीरच्या मटरगश्तीवर डान्स

सुमेध हा उत्तम अभिनय तर करतोच पण त्याआधी तो एक उत्तम डान्सरही आहे. त्याने हे रियालिटी शो मधून सिद्धही केले आहे.  सुमेधने खूप लहानपणीपासूनच डान्स सुरू केला. सध्या ‘राधाकृष्ण’ या मालिकेत तो कृष्णाची भूमिका साकारत आहे. जी अनेकांना आवडत आहे.  त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्येही वाढ झाली आहे. सुमेध आपल्या सोशल अकाऊंटवर नेहमीच आपल्या अपडेट्स पोस्ट करत असतो. त्याने आपला हा डान्स पोस्ट केल्यानंतर त्याला तुफान प्रतिसाद मिळाला असून त्याचा डान्स बऱ्याच जणांना आवडत आहे. रणबीर कपूरच्या मटरगश्ती या गाण्यावर सुमेधने तुफान डान्स मूव्ह्ज केल्या आहेत. सुमेध अतिशय फ्लेक्सिबल असून त्याच्या या स्टेप्स प्रेक्षकांचं मन सध्या जिंंकून घेत आहेत. सुमेधने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही वेळातच याला लाखो लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर त्याच्या मित्रमैत्रिणी आणि इंडस्ट्रीतील काही कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. ‘अलादिन’फेम सिद्धार्थ निगम आणि त्याचा भाऊ दोघेही सुमेधचा हा परफॉर्मन्स पाहून भारावले असल्याचं त्यानी सांगितले. सुमेध याआधी ज्या रियालिटी शो मध्ये आला होता तिथे त्याला ‘बीट किंग’ असं टायटलही कोरिओग्राफर रेमो डिसुझाकडून देण्यात आलं होतं. हे टायटल सार्थ असल्याचे पुन्हा एकदा सुमेधने सिद्ध केले आहे. 

कुमकुम भाग्य’ फेम या अभिनेत्रीकडे आहे गुडन्यूज, पण लॉकडाऊनमुळे सध्या चिंतेत

सध्या सुमेध आई – वडिलांपासून दूर

लॉकडाऊनमुळे सध्या सगळ्यांचे चित्रीकरण थांबले आहे. त्याचप्रमाणे सुमेधही सध्या  चित्रीकरण करत नाही. यावर सुमेधने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये  आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुमेध म्हणाला, ‘सध्या सर्वांनी सुरक्षित राहणं हे अत्यंत गरजेचे  आहे. आपण सगळेच सध्या घरात आहोत. मी पुण्याचा आहे. पण चित्रीकरणामुळे  मला माझ्या आई वडिलांना फारच कमी वेळ देता येतो. मला आता काम नाही. पण आम्ही सगळेच आमच्या कुटुंबापासूनही या काळात दूर आहोत.’ राधाकृष्ण या मालिकेचे चित्रीकरण महाराष्ट्र – गुजरात सीमेलगत असणाऱ्या उमरगाव फिल्मसिटीमध्ये होते. तिथेच सगळे चित्रीकरण होत असल्याने सर्वांना तिथेच राहून  सध्या लॉकडाऊन संपण्याची वाट पाहावी लागत आहे. तोपर्यंत सुमेधचे असेच काही अजून व्हिडिओ पहायाला मिळतील अशी आशा आता त्याच्या चाहत्यांना नक्कीच लागून राहिली आहे. 

सुहाना खानच्या जन्मानंतर असं बदललं शाहरूखचं आयुष्य  

Read More From मनोरंजन