फिनाले राऊंडचा जबरदस्त खेळ सुरु असताना टॉप 4 ची जागा राहुलला मिळेल अशा अपेक्षेत सगळे फॅन्स होते. पण अचानक राहुल वैद्यने सलमानच्या विचारण्यावर घर सोडले आणि सगळ्यांनाच धक्का बसला. पहिल्या दिवसापासून कोणताही खेळ किंवा मुखवटा घालून नसलेला घरातील एकमेव सदस्य राहुल वैद्य अनेकांचा चाहता होता. पहिल्या आठवड्यापासून नॉमिनेट होऊनही घरात त्याने 50 दिवसांचा कालावधी पूर्ण केला होता. पण अचानक आलेल्या या ट्विस्टमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्याचे फॅन्सच नाही तर Bigg Boss फॉलो करणाऱ्या सेलिब्रिटींनाही हा धक्काच बसला असून राहुलने घेतलेल्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राहुल घरातून खरंच बाहेर गेला आहे की, आता सीन पलटणार आहे अशी चर्चा सगळीकडे पुन्हा एकदा होऊ लागली आहे.
जेलमधून सुटल्यानंतर भारती-हर्ष दिसले आदित्य नारायणच्या लग्नात, व्हिडिओ वायरल
स्वत:हून सोडला शो
शनिवारपासून सुरु असलेल्या प्रोमोमध्ये राहुल वैद्य स्वत:हून मुख्य द्वारमधून बाहेर पडताना दिसत आहे. शनिवारी निकी तांबोळी गेल्यानंतर रविवारच्या दिवशी पुढचे एविक्शन होणार होते. पण त्या आधीच राहुल घर सोडतानाचा व्हिडिओ वायरल झाला होता. तर झालं असं की, राहुलने शेवटचा टास्क हा अगदी सहजरित्या जाऊ दिला असा सलमानचा आरोप होता. त्यावर राहुलने बळजबरीने काहीही करण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. यावर सलमानने त्याला खेळाप्रती तुझी आवड नसल्याचे म्हणत तू खेळातून बाहेर पडण्यास उत्सुक आहेस का ? असे विचारत त्याला जाण्याचा मार्ग मोकळा करुन दिला. आई-वडिलांच्या आठवणीत भावुक झालेल्या राहुलने खेळाचा कोणताही विचार न करता त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग स्विकारला.
अनेकांना बसला धक्का आवडला नाही निर्णय, खेळावर घेतला संशय
राहुल वैद्यने घरातून जाण्याचा निर्णय घेतला असला तरी तो सलमानने विचारल्यानंतर घेण्यात आला होता. पण या घरात काही कालावधी जात नाही तो कलर्स या वाहिनीचा चेहरा असलेल्या रुबिना दिलैकने कन्फेशन रुममध्ये जाऊन शो सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी तिच्या या निर्णयाचा विचार करण्यासाठी अभिनवलादेखील बोलावण्यात आले होते. पण राहुलच्या या निर्णयावर विचारविमर्श करण्याची संधी देण्यात आली नाही. त्याला सरळ निघून जा असे सांगण्यात आले. त्यामुळे सेलिब्रिटींनाही धक्का बसला आहे. एका चांगल्या टीआरपी असलेल्या खेळाडूला अशापद्धतीने काढून टाकण्याचे काम यापूर्वी कधीच झालेले नाही. असे असताना एका अशा खेळाडूला थेट कसे बाहेर काढले गेले हे अनेकांना कळले नाही.
प्रियांका चोप्रा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण, फोटो झाला व्हायरल
शोमध्ये आणला वेग
सध्या या शोचा अर्धा टप्पा पार झाला आहे. घरातील हालचालींना वेग आणण्यासाठी घरामध्ये टॉप 4 ची रेस सुरु करण्यात आली आहे. टॉप 4 मध्ये जाण्याचा पहिला मान एजाज खानला मिळाला. त्यानंतर शार्कचा टास्क करत अभिनव शुक्ला याने या खेळात आपली जागा पटकावली. त्यामुळे उरलेल्या रुबिना, जास्मिन, निकी, राहुल यांच्यामध्ये टॉप 4 चा खेळ रंगला होता. थेट नॉमिनेशनच्या माध्यमातून यातील दोघांची निवड करण्यात येणार होते. जनतेच्या वोट्सच्या आधारावर निकी तांबोळी घराच्या बाहेर पडली. राहुलने स्वत:च खेळ सोडल्यामुळे जास्मिन आणि रुबिना या दोघांना या खेळात राहण्याची संधी मिळाली.
राहुल झाला गायबच
राहुल घरात गेल्यापासून त्याच्या पेजवर नव्या पोस्ट कायम पडत आल्या आहेत. त्याची टीम नेहमीच राहुलचे काही व्हिडिओ पोस्ट करत असते. पण रविवारचा शो झाल्यापासून राहुलच्या इन्स्टा आणि फेसबुक पेजवर काहीही हालचाली नाही. अनेकांनी तो खरंच बाहेर आला आहे का? यासाठी सगळीकडे शोध सुरु केला आहे. पण राहुलबद्दल कोणाला काहीच माहीत नाही. त्यामुळे राहुल खेळातून बाहेर आला आहे की, सीन पलटणार आहे याबद्दल सध्या तरी काहीच कळत नाही.
राहुल वैद्यच्या फॅन्सनी त्याला खेळात परत आणण्यासाठी ट्विटरवर एक मोहीमच सुरु केली आहे. त्यामुळे आता शोसाठी राहुल वैद्यला पुन्हा बोलावणार की नाही याची उत्सुकता आहे.
छोट्या पडद्यावर सुपरहिट ठरल्या या जोड्या, मात्र प्रत्यक्षात करतात एकमेकांचा द्वेष