बॉलीवूड

फक्त एका चित्रपटासाठी राजकुमारने खाल्ले नॉनव्हेज

Leenal Gawade  |  Dec 5, 2019
फक्त एका चित्रपटासाठी राजकुमारने खाल्ले नॉनव्हेज

चित्रपटात काम करणे सोपी गोष्ट नसते. कारण एखादा रोल निभावताना तुम्हाला अनेक गोष्टी नव्याने शिकाव्या लागतात. काही गोष्टींची आहुती तो रोल निभावताना द्यावी लागते. कधीही मासांहार करेन असा विचार ही न करणाऱ्या राजकुमारला मात्र एका चित्रपटासाठी चक्क नॉनव्हेज खावे लागते होते. पण राजकुमार रावच नाही तर अन्य अनेक कलाकारांनी त्याच्या चित्रपटांसाठी अशा प्रकारची आहुती दिली आहे. जाणून घेऊया नेमकं राजकुमारने कशासाठी नॉनव्हेज खाल्ले.

बॉलीवूड स्टार्स: वेबसिरीजमध्ये ठरले काही हिट तर काही फ्लॉप

 

या चित्रपटासाठी त्याने खाल्ले नॉनव्हेज

Instagram

राजकुमार रावचे चित्रपट नेहमीच आपल्याला खऱ्या आयुष्यात घडणारे वाटतात. कारण तो प्रत्येक चित्रपटात अभिनयच इतका तगडा करतो. 2016 साली आलेल्या ट्रॅप्ड या चित्रपटात त्याने केलेली भूमिका आजही अनेकांना आठवत असेल. या चित्रपटात तो एका फ्लॅटमध्ये चुकून अडकतो. एक अशी बिल्डींग ज्या इमारतीत कोणीही राहात नाही. या इमारतीच्या उंच इमारतीत अडकल्यानंतर कोणीही त्याला पाहायला सुद्धा येत नाही. या चित्रपटाच्या एका सीनमध्ये त्याच्याकडे खाण्यासाठी काहीच शिल्लक नसतं. अशावेळी तो घरात आलेल्या प्राण्यांना- पक्ष्यांना मारुन खातो.  असे दाखवण्यात आले आहे. हा सीन खरा वाटावा यासाठी राजकुमारने चक्क तसे दिसू शकेल असे नॉनव्हेज खाल्ले आहे. इतकंच नाही तर या चित्रपटासाठी त्याने चक्क वजनही कमी केले आहे. या चित्रपटादरम्यान तो केवळ गाजर आणि कॉफीवरच राहात होता. 

बॉलिवूडचा ऋतिक रोशन ठरला 2019 मधील ‘सर्वात सेक्सी आशियाई पुरूष’

राजकुमार राव नेहमीच करतो वेगळे प्रयत्न

नुकताच त्याचा ‘जजमेंटल हे क्या हा’ चित्रपट येऊन गेला. कंगना रणौतमुळे हा चित्रपट जरी कितीही वादात असला तरी राजकुमारने या चित्रपटात केलेला अभिनय हा पाहण्यासारखा होता. त्याने एका सायकोची भूमिका साकारली होती. या चित्रपटात शेवटपर्यंत कंगनाचं वेडी आहे का असे वाटते. पण चित्रपटाच्या शेवटी सगळ्या गोष्टी इतक्या चमत्कारीक पद्धतीने फिरतात की विश्वास बसत नाही. पण हा चित्रपट फार चालला नाही कारण त्याची मांडणी फारच रटाळ पद्धतीने करण्यात आली होती. पण अभिनयाच्या बाबतीत राजकुमारला कोणीच मागे टाकू शकत नाही.

स्त्री 2 मध्ये दिसणार राजकुमार

राजकुमार राव नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारत असतो. त्याच्या ‘स्त्री’ चित्रपटातील त्याची भूमिकाही तितकीच वेगळी होती. हा चित्रपट  एका डाएनची गोष्ट होती. आणि आता या चित्रपटाचा दुसरा भाग येण्यासाठी सज्ज झाला आहे. श्रद्धा कपूर आणि त्याची जोडी पहिल्यांदाच या चित्रपटात दिसली आहे. 

हा रोमँटीक नाही तर प्रॅक्टीकल हिरो

Instagram

राजकुमार राव  जेव्हापासून इंडस्ट्रीमध्ये आला आहे. त्या दिवसापासून त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या चित्रपटात तो रोमान्स करताना दिसला तरी सुद्धा त्याच्यामधून प्रॅक्टीकलपणा जास्त झळकतो. त्यामुळे रोमान्सपेक्षाही तो प्रॅक्टीकल हिरो आहे असे म्हणायला हवे. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच  POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty  लिंकवर क्लिक करा. 

Read More From बॉलीवूड