राखी सावंत म्हणजे धमाल. ती कधी कोणत्या वेळी काय करेल हे अजिबातच सांगता येत नाही. यावर्षीचा बिग बॉसचा 14 वा सीझन राखीने गाजवला असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. राखी सावंतच्या प्रवेशानंतर या शो चा टीआरपी खूपच वाढला होता. आता राखीने हा शो जिंकला नसला तरीही तिने या शो मधून 14 लाख रूपये जिंकले आणि घराबाहेर आल्यानंतरही राखी अजूनही प्रेक्षकांचे तितकेच भरभरून मनोरंजन करत आहे. घराबाहेर पडल्यानंतरही ती सोशल मीडियावरून आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. राखीने नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा नागिनचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा राखीने आपल्या सोशल मीडियावरून काजोल आणि प्रियांका चोप्राचा अवतार धारण करत व्हिडिओ पोस्ट केले आहेत आणि तिला आता फेस एडिटिंगचं नवं वेड लागल्याचे दिसून आले आहे. एका फेस एडिटिंग अॅपच्या मदतीने राखी सध्या प्रेक्षकांचे धमाल मनोरंजन करत आहे.
मानसी नाईकचा पहिलाच रोमँटिक म्युझिक व्हिडिओ, वैशाली आणि स्वप्नीलचा स्वरसाज
काजोल आणि प्रियांकाचे रूप केले धारण
राखीने नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक नवा व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये तिने काजोल आणि प्रियांका चोप्राचे रूप धारण केले आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. राखीने सांगितल्याप्रमाणे ती नेहमी आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. या नव्या व्हिडिओमध्ये राखीने ‘माय नेम इज’ खान या चित्रपटातील एका गाण्यावर एडिटिंग केले आहे. काजोलच्या ठिकाणी आपला चेहरा लाऊन ‘तेरा सजदा’ वर केलेले एडिटिंग प्रेक्षकांना खूपच मजेशीर वाटत आहे. तर दुसऱ्या गाण्यात ‘अस्लाम ए इश्क’ मध्ये प्रियांका चोप्राचा चेहरा एडिट करून तिने आपला चेहरा फिट केला आहे. यामध्ये प्रियांच्या गाण्यावर राखी नाचताना दिसत आहे. इतकंच नाही तर या दोन्ही चेहऱ्यांमधील तुम्हाला माझा कोणता लुक आवडला आहे असा प्रश्नही तिने आपल्या चाहत्यांना विचारला आहे. माय नेम इज खान मधील काजोलने साकारलेली मंदिरा की गुंडेमधील प्रियांका चोप्रा. हा व्हिडिओदेखील तुफान व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच राखीने श्रीदेवीचा नागिन चित्रपटातील ‘मैं तेरी दुश्मन’ या गाण्यावरील एडिट व्हिडिओ केला होता. हा व्हिडिओ आणि राखीचा वेडेपणा प्रेक्षकांना भलताच आवडला होता. त्यामुळे राखीने आता हा नवा व्हिडिओ पोस्ट करत आपल्याला या एडिटिंगचे नवे वेड लागले असल्याचेच दाखवून दिले आहे.
तो माझा अॅटिट्यु़ड नव्हता, रुबिनाने केला एअरपोर्टवरील वागण्याचा खुलासा
सध्या करत आहे आईची सेवा
राखी जेव्हा घरातून 14 लाख रूपये घेऊन बाहेर पडली तेव्हा तिला बाहेर आपल्यासाठी काय संकट वाढून ठेवलंय याची कल्पनाही नव्हती. बाहेर आल्यानंतर आपल्या आईला कॅन्सर झाल्याचे तिला कळले. ती सध्या आईची सेवा करण्यात व्यस्त असली तरीही ती प्रेक्षकांचे मनोरंजनही करत आहे. राखीची आई लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी तिचे चाहतेही प्रार्थना करत आहेत. काही दिवसांपूर्वीच राखीच्या आईने रूग्णालयातून सलमान खान आणि बिग बॉसच्या टीमचे आभार मानले होते. सलमानने राखीला केलेली मदत खूपच दिलासादायक असल्याचेही राखीच्या आईने म्हटले होते. तर राखीनेही आपल्याला सोहेल आणि सलमानमुळेच ही संधी मिळाली असल्याचे म्हटले. राखीचे खासगी आयुष्य अत्यंत वाईट असूनही राखी नेहमीच हसतमुख असते आणि तिच्या चाहत्यांचे ती मनोरंजन करत असते. आता राखी पुढे नवा कोणता व्हिडिओ घेऊन येणार याचीही सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.
असं काय म्हणाला टायगर श्रॉफ की, ढसाढसा रडले जॅकी श्रॉफ
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक