बॉलीवूड

परत येतेय ‘राम तेरी गंगा मैली’मधील मंदाकिनी,  पोस्टर झाले प्रदर्शित

Trupti Paradkar  |  Jun 23, 2022
परत येतेय ‘राम तेरी गंगा मैली’मधील मंदाकिनी,  पोस्टर झाले प्रदर्शित

राज कपूरचा ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपट आणि धबधब्याखाली सफेद साडीत अंघोळ करणारी मंदाकिनी…हा सीन नव्वदीच्या काळातील प्रत्येकाच्या नक्कीच लक्षात असेल. मंदाकिनीने तिच्या सौंदर्य आणि बोल्डनेसमुळे चित्रपटसृष्टी अक्षरशः गाजवली होती. डॉन दाऊद इब्राहिमसोबत तिच्या अफेअरच्या चर्चांनाही तेव्हा उधाण आलं होतं. ज्यामुळे तिला पुढे चित्रपटसृष्टी सोडावी लागली होती. 1096 साली ती शेवटची जोरदार या चित्रपटात दिसली त्यानंतर मात्र तिने बॉलीवूडपासून दूर राहणं पसंत केलं. आता मात्र तब्बल दोन दशकांनंतर मंदाकिनीला पुन्हा बॉलीवूडचे वेध लागले आहेत. ती आता परत बॉलीवूडमध्ये येतेय…

मंदाकिनीचा आगामी प्रोजेक्ट

मंदाकिनी पुन्हा आला आहे पण ती कोणत्याही चित्रपटात काम करत नसून ‘मॉं ओ मॉं’ या म्युजिक अल्बममधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकतंच तिच्या अल्बमचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. जवळ जवळ दोन दशकांनंतर ती आता पुन्हा बॉलीवूडमध्ये आपलं नशीब आजमावणार आहे. एवढंच नाही तर या म्युजिक अल्बममधून मंदाकिनीचा मुलगा राबील ठाकुरचाही डेब्यू होत आहे. या अल्बममध्ये तिचा एक वेगळा अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कारण ती आता पूर्वीची बोल्ड मंदाकिनी दिसत नसून सलवार सूटमधील सौज्वळ मंदाकिनी दिसत आहे. या पोस्टरमध्ये तिचा मुलगा राबीलदेखील तिच्यासोबत दिसत आहे.

काय आहे ‘मॉं ओ मॉं’

‘मॉं ओ मॉं’ ची गाणी साजन अग्रवाल यांनी रचलेली आहेत. या अल्बमचं दिग्दर्शनही त्यानेच केलं आहे, गाण्यांना संगीत दिल आहे बाबिल हक आणि मीणा यांनी. या अल्बमसाठी गाणी गायली आहेत ऋषभ गिरी याने…अल्बमचा फर्स्ट लुक शेअर करताना मंदाकिनीे फोटोसोबत लिहीलं आहे की, “पोस्टरवर तुमचं मत मला जरूर सांगा, मला ते जाणून घ्यायचं आहे” मुलाचा पहिलाच अल्बम असल्याने मंदाकिनी या प्रोजेक्टबद्दल खूपच उत्सुक आहे. हा म्युजिक अल्बम प्रेक्षकांनी पाहावा असं प्रेमळ आवाहनच तिने या पोस्टमधून चाहत्यांना केलं आहे. पण प्रेक्षकांना मात्र मंदाकिनीला चित्रपटात पाहण्याची इच्छा आहे. ही तिची दुसरी इनिंग आहे का ? ती पुन्हा लवकरच बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार का ?अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लवकरच चाहत्यांना मिळण्याची शक्यता आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From बॉलीवूड