बॉलीवूड

रणबीर आणि आलियाच्या साखरपुड्याच्या तयारीला सुरूवात, जयपूरमध्ये चालू आहे लगबग

Dipali Naphade  |  Dec 30, 2020
रणबीर आणि आलियाच्या साखरपुड्याच्या तयारीला सुरूवात, जयपूरमध्ये चालू आहे लगबग

नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी रणबीर आपल्या कुटुंबासह दोन दिवसापूर्वीच राजस्थानमधील रणथंबोरमध्ये पोचला आहे. इतकंच नाही त्याच्या कुटुंबासह रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणही असून इतर काही सेलिब्रिटीदेखील जयपूर आणि रणथंबोरच्या आजूबाजूच्या परिसरात असल्याची माहिती सध्या समोर येते आहे. कपूर आणि भट्ट हे दोन्ही परिवार सध्या एकत्र असून अमन – ए- खास या रिसॉर्टमध्ये सगळे आहेत. तर आलिया आणि रणबीर याच ठिकाणी साखरपुडाही करणार असल्याच्या बातम्या आता सुरू झाल्या आहेत. दोन्ही कुटुंब एकत्र असल्यामुळे नव्या वर्षात कधीही या दोघांच्या साखरपुड्याची बातमी येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

नव्या वर्षाची संध्याकाळ जोडीदारासह घालवा रोमँटिक चित्रपट पाहून

तारीख सांगण्यास केली मनाई – मुकेश भट्टने केले कबूल

एका मुलाखतीमध्ये आलियाचे काका आणि प्रसिद्ध निर्माते मुकेश भट्ट यांनी आता आपण या विषयावर काहीही बोलू शकत नाही असं सांगितलं आहे. याशिवाय  मला खोटं बोलता येत नाही आणि मला त्यासाठी तुम्ही कोणतीही जबरदस्ती करू नका आणि खरं सांगण्यास सध्या मनाई आहे असंही त्यांनी सांगितले. इतकंच नाही तर मुलाकडील लोकांनी सध्या याविषयी काहीही सांगू नये असं सांगितलं असल्याचंही म्हटलं आहे. त्यामुळे मला सांगता येणार नही. जेव्हा सर्व काही फायनल होईल तेव्हा आम्ही सांगू. मी सध्या मुंबईत नाही आणि कुठे आहे ते सांगू शकत नाही असंही मुकेश भट्ट यांनी सांगितल्यामुळे आता अधिकच अंदाज बांधण्यात  येत आहेत. 

Bigg Boss 14 : राखी सावंतने फाडले राहुल महाजनचे धोतर, राखीवर सदस्य नाराज

करण आणि टीम बघणार मॅनेजमेंट

रणबीरच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने साखरपुड्याबाबत काही माहिती दिली असून करण जोहरच्या देखरेखीखाली सर्व मॅनेज होणार असल्याचं म्हटलं जात आहे. दोन्ही कुटुंबातील सर्व व्यक्ती हजर असून बरेच जण दिल्लीतूनही आले आहेत. तर करण जोहर लवकरच या सर्वांना जॉईन करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. करणची टीम आधीच याठिकाणी पोचली असून तयारी सुरू झाल्याचेही सांगण्यात येत आहे. रणवीर आणि दीपिकाही या ठिकाणी असल्याने ही शक्यता अधिक असल्याचे म्हटले जात आहे. रणवीर आलियाचा अतिशय जवळचा मित्र आहे. त्यामुळे आलियाने दीपिका आणि रणवीरला यासाठी आमंत्रण पाठविल्याचे सांगण्यात येत आहे. तर रणबीर कपूरची बहीण आणि तिचे कुटुंबही उपस्थित आहे. मात्र दोन्ही कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. 

अनुष्काचं प्रेगनन्सीमधील बोल्ड फोटोशूट पाहून विराटने दिली ही प्रतिक्रिया

डेस्टिनेशन शोधण्यासाठी आल्याचाही कयास

रणबीर आणि आलिया दोघेही आपल्या लग्नासाठी डेस्टिनेशन अर्थात स्थळ शोधण्यासाठीही आले आहेत असाही कयास बांधला जात आहे. रणथंबोर रोडवर ज्या हॉटेलमध्ये सध्या हे सर्व  स्टार्स राहात आहेत ते प्रसिद्ध वेडिंग डेस्टिनेशन  आहे. पॉप सिंगर कॅटी पॅरी आणि रसेल ब्रँडचे लग्नही इथेच झाले आहे. या हॉटेलला जगातील उत्तम वॅलेंटाईन हॉटेलचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. त्यामुळे ही जोडी आता इथेच साखरपुडा अथवा लग्न करणार का अशा प्रश्न सर्व चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. मात्र सध्या आलिया आणि नीतू पोस्ट करत असलेल्या फोटोंवरच समाधान मानावं लागत आहे. तर ही जोडी कधी एकदा लग्नबंधनात अडकणार हा प्रश्नही चाहत्यांना सतावत आहे. नव्या वर्षात काहीतरी नक्कीच चांगले घडेल अशी अपेक्षा चाहते करत आहेत. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From बॉलीवूड