आरोग्य

ओटीपोटात तीव्र वेदना होण्याची ही असू शकतात कारणे

Vaidehi Raje  |  Feb 16, 2022
ओटीपोटात तीव्र वेदना होण्याची ही असू शकतात कारणे

जर तुम्हाला तुमच्या नाभीच्या खाली आणि पायांच्या वरच्या भागात दुखत असेल तर ते ओटीपोटाचे दुखणे म्हणून गणले जाते. ओटीपोटात वेदना होण्याची अनेक कारणे आहेत. ते तुम्ही गरोदर असल्याचे लक्षण देखील असू शकते किंवा पोटाचे, पचनाचे विकार असल्याची नांदी असू शकते. जर तुम्हाला ओटीपोटात जास्तच दुखत असेल तर ती तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाण्याची वॉर्निंग देखील असू शकते. 

जरी ओटीपोटात वेदना होण्याची कारणे बहुतेक वेळा स्त्रियांच्या पुनरुत्पादक अवयवांच्या समस्यांशी निगडित असली तरी पुरुषांना देखील ओटीपोटातील वेदनांचा त्रास होऊ शकतो. ओटीपोटात दुखणे हे जंतूसंसर्गाचे लक्षण असू शकते किंवा ओटीपोटाच्या हाडात किंवा मूत्राशय किंवा कोलन सारख्या प्रजननाशी संबंधित नसलेल्या अवयवांमध्ये समस्या झाल्यामुळे उद्भवू शकते. परंतु स्त्रियांमध्ये ओटीपोटात वेदना होणे म्हणजे ओटीपोटाच्या क्षेत्रामध्ये असलेले अवयव जसे की गर्भाशय, अंडाशय, फॅलोपियन नलिका, गर्भाशय ग्रीवा (cervix) किंवा योनी यापैकी कशातही समस्या निर्माण झाली असू शकते. 

ओटीपोटात वेदना होण्याची कारणे

पुरुष  व स्त्रिया या दोघांमध्येही ओटीपोटात दुखण्याची कारणे अपेंडिसायटिस, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, आतड्यासंबंधित समस्या, हर्निया, लैंगिक संक्रमित रोग, किडनी इन्फेक्शन किंवा किडनी स्टोन, ओटीपोटाचा विकार , सायकोजेनिक वेदना किंवा Prostatitis ही असू शकतात. तर स्त्रियांमध्ये ओटीपोटाच्या वेदनांची कारणे गर्भपात, एक्टॉपिक प्रेग्नन्सी, ओव्यूलेशन, मासिक पाळीच्या दरम्यान येणारे क्रॅम्प्स, पेल्विक इंफ्लेमेटरी डिसीज, ओव्हेरियन सिस्ट किंवा ओव्हरीचे विकार, फायब्रॉइड्स, एंडोमेट्रिओसिस, गर्भाशयाचा कर्करोग, सर्व्हायकल कॅन्सर ही असू शकतात. या प्रत्येकाची काही लक्षणे वेगवेगळी आहेत. त्यामुळे अचानक ओटीपोटात दुखायला लागल्यास घाबरून न जाता, मनात शंकाकुशंका न आणता लगेच डॉक्टरांकडे जावे. ते तुमची सगळी लक्षणे बघून योग्य उपचार सुरु करतील. 

अपेंडिसायटिस 

तुम्हाला पोटाच्या खालच्या उजव्या भागात तीव्र वेदना होत असल्यास, उलट्या होत असल्यास आणि ताप येत असल्यास, तुम्हाला अपेंडिसायटिस असण्याची शक्यता आहे. तुम्हाला असा त्रास झाल्यास तो अंगावर न काढता व घरगुती उपचार न करता त्वरित डॉक्टरांकडे जा. कारण  संक्रमित अपेंडिक्सवर शस्त्रक्रिया आवश्यक असते. जर ते शरीराच्या आतच फुटले तर संपूर्ण शरीरात संसर्ग पसरवू शकते. यामुळे गंभीर गुंतागुंत होऊन जीवाला धोका निर्माण होतो. 

अधिक वाचा अल्सरच्या समस्येने झालाय हैराण, मग आहारात करा या पदार्थांचा समावेश

Mittelschmerz (वेदनादायक ओव्यूलेशन)

मासिक पाळी सुरु नसतानाही जर ओव्यूलेशनच्या आसपास ओटीपोटात अचानक कळ येत असेल तर तुम्हाला वेदनादायक ओव्यूलेशनचा त्रास असू शकतो. हे तुमच्या मासिक चक्राच्या मध्ये घडते. हे दुखणे हानिकारक नाही आणि सहसा काही तासांत निघून जाते.

एक्टोपिक प्रेग्नन्सी 

एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे जेव्हा गर्भाचे गर्भाशयाच्या बाहेर कुठेतरी रोपण होते आणि तो वाढू लागतो. हे सहसा फॅलोपियन ट्यूबमध्ये होते. असे झाले असेल तर ओटीपोटात विशेषतः एका बाजूला तीव्र वेदना किंवा क्रॅम्प्स येतात.  मासिक पाळी सुरु नसतानाही रक्तस्त्राव होतो.  मळमळते आणि चक्कर येते.  ही सर्व लक्षणे दिसत असतील तर  ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या. कारण उपचारांशिवाय तुमच्या जीवाला गंभीर धोका उद्भवू शकतो. 

मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग

वारंवार लघवीला जाणे, लघवी करताना त्रास किंवा जळजळ होणे किंवा वेदना जाणवणे व ओटीपोटात वेदना होणे ही युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची काही लक्षणे आहेत. जेव्हा मूत्रमार्गाला जंतुसंसर्ग होतो तेव्हा हा त्रास होतो.  त्यावर त्वरीत उपचार केल्यास ते लवकर बरे होते नाहीतर गंभीर स्थिती उद्भवू शकते कारण ते किडनीमध्ये पसरले तर किडनीचे गंभीर नुकसान होऊ शकते. 

म्हणूनच तुम्हाला वारंवार ओटीपोटात वेदना जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार सुरु करा जेणे करून परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही. 

Photo credit- istockphoto 

अधिक वाचा पित्ताशय काढून टाकल्यानंतर काय काळजी घ्याल

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य