आरोग्य

भात की चपाती जाणून घ्या काय आहे तुमच्यासाठी बेस्ट

Leenal Gawade  |  Aug 28, 2021
चपाती की भात

 महाराष्ट्रीयन किंवा भारतातील कोणत्याही कोपऱ्यात गेलात तर पानात चपाती आणि भात वाढण्याची पद्धत आहे. जेवणात चपात्या असतील तर जेवण पूर्ण करण्याचे काम भात करते. चपाती बनवण्याची रेसिपी तर सर्वांनाच माहीत आहे.. भात खाल्ल्यानंतरच जेवण पूर्ण झाल्यासारखे असते. पण बरेचदा हेल्दी लाईफस्टाईलचा विचार करता खूप जण भात खाणे सोडून देतात. भातामुळे वजन वाढते असा विचार करुन खूप जणांनी भात आवडत असून किंवा त्याची शरीराला गरज असून देखील भात न खाता जास्तीत जास्त चपात्या किंवा पोळ्या खाण्याकडे भर दिला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या शरीराला नेमकी कशाची गरज आहे. शरीर सुदृढ राहावे यासाठी तुमच्या शरीराला नेमकी कशाची गरज आहे हे देखील जाणून घेणे तितकेचे गरजेचे असते. भात आणि चपाती यामधील फरक जाणून घेत तुम्हाला त्याचा आहारात समावेश करता यायला हवा. म्हणजे तुमचे आवडीचे खाणे तुमच्यापासून दुरावणार नाही.

या सवयींचा होतो मेंदूवर विचित्र परिणाम, वेळीच बदला

भात

सौजन्य: Instagram

भात हा असा पदार्थ आहे जो सगळ्यांनाच खूप जास्त आवडतो. भाताशिवाय खूप जणांचे जेवण पूर्ण होत नाही. काही जणांना भात वजन वाढण्यास कारणीभूत आहे असे वाटते पण प्रत्यक्षात भातामध्ये असलेले घटक तुमच्या शरीरात जाऊन काय करतात हे तुम्हाला माहीत आहे का?

पचनक्रिया : भात हा पचण्यास फारच हलका असतो.  तो कितीही खाल्ला तरी पटकन पचतो. त्यामुळे भात खाल्ला तरी त्यानंतर थोड्यावेळेसाठी पोट जड वाटत असलं तरी देखील ते नंतर लवकर हलकं वाटू लागतं. त्यामुळे पचनासाठी भात हलका आहे.

फायबरचे प्रमाण:  शरीरात फायबर असायला हवे. फायबर खाल्ल्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पण भातामध्ये फायबरचे प्रमाण फारच कमी असे. त्यामुळे म्हणावा तितका फायदा होईल असे सांगता येत नाही. 

ग्लुटेन : ग्लुटेन नावाचा घटक हा वजनवाढीसाठी कारणीभूत असे म्हणतात. पांढऱ्या भातामध्ये ग्लुटेन अजिबात नसते.  त्यामुळे भात खाण्यास तसा काहीच हरकत नाही. भात खाऊन वजन वाढते हे तसे शक्य नाही.

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव कारणांमुळे वंधत्वाच्या समस्येत वाढ

चपाती

काही जणांसाठी चपाती हे सगळे काही आहे. त्यांना आहारात चपात्या असल्या तरी पुरेसे होते.  चपाती जास्त खात असाल तरी देखील तुम्हाला त्यामध्ये नेमके काय असते त्याचा फायदा कसा होता ते जाणून घ्यायला हवे

पचनक्रिया :  चपाती पचण्यास फारच जड असते. त्याची पचनक्रिया ही फार हळुहळू होते. त्यामुळे बराच वेळासाठी पोट भरलेले राहते. तुम्ही अगदी दोन चपात्या खाल्ल्या तरी पोट भरलेले राहते. 

फायबरचे प्रमाण: चपातीमध्ये फायबरहे फार मोठ्या प्रमाणात असते. चपाती खाल्ल्यानंत तुम्हाला फायबरचा पुरेपूर साठा मिळतो. फायबर शरीरात जावे असे वाटत असेल तर तुम्ही अगदी हमखास चपाती खायला हवी 

ग्लुटेन : ग्लुटेन हा घटक खूप जणांना चालत नाही. पण चपातीमध्ये ग्लुटनेही मोठ्याप्रमाणात असते. त्यामुळेही वजन वाढण्याची शक्यता असते.

वर सांगितल्याप्रमाणे दोन्ही गोष्टींमध्ये  काही ना काही कमी जास्त आहे. एखादी गोष्ट सोडण्यापेक्षा त्याचे प्रमाण योग्य असू द्या. 

या सवयींचा होतो मेंदूवर विचित्र परिणाम, वेळीच बदला

Read More From आरोग्य