बिग बॉस 14 विजेतेपदाची ट्रॉफी हातात घेतल्यानंतर रुबिना दिलैकच्या वागण्यात बराच फरक पडला आहे, असे एका व्हिडिओतून दिसले होते. अत्यंत उर्मटपणाने एअरपोर्टवर वावरताना रुबिना दिसली होती. तिचे ते वागणे पाहून तिला बिग बॉस जिंकण्याचा गर्व झाला असावा असे अनेकांनी म्हटले होते. तिच्यावर बऱ्याच टीकाही झाल्या होत्या. पण आता रुबिनाने तिच्या या वागण्याचा खुलासा केला आहे. तो माझा अॅटिट्युट नव्हता. मी कारणामुळे अस्वस्थ होते. रुबिनाने एका मुलाखतीदरम्यान ती नेमकं असं का वागली ते सांगितले आहे. जाणून घेऊया रुबिनाने एअरपोर्टवरील वागण्याचा नेमका काय खुलासा केला ते.
प्रेग्नंसीच्या बातमीवर भडकली गौहर खान, म्हणाली…
त्यामुळे मी होते दु:खी
रुबिनाने नुकतीच मुलाखत केली. त्यावेळी तिला तिच्या एअरपोर्टच्या वागण्यावरुन प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने घडलेला सगळा किस्सा सांगितला ती म्हणाली की, मी बिग बॉसच्या घरात असताना माझी आत्या हार्टअटॅकने गेली. मी शोमध्ये असल्यामुळे मला या गोष्टीची कल्पना जाणीवपूर्वक देण्यात आली नव्हती. मी हा शो जिंकल्यानंतर आणि काही काळ सेलिब्रेशन झाल्यानंतर मला घरातल्यांनी ही माहिती दिली. शूटिंगसाठी चंडिगढला जाताना मला या गोष्टीची कल्पना दिली. त्यामुळे मी फार दु:खात होते. एअरपोर्टवर आल्यानंतर मी वेगळ्या विचारात गुंतले होते. त्यामुळे मला त्यावेळी कॅमेऱ्यात पाहणे किंवा इतर काही गोष्टी करणे सुचले नाही. यात माझा अॅटिटयुटचा काहीही प्रश्न नव्हता.
रुबिना झाली ट्रोल
तिचा एअरपोर्टवरील हाच व्हिडिओ ज्यावेळी सगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला त्यावेळी रुबिनाला सोशल मीडियावर सगळ्यांनीच जोरदार ट्रोल केले. तिच्या वागण्याबोलण्यातल्या या फरकामुळे तिचे अनेक फॅन्स नाराज झाले. रुबिना कधीही असे करु शकेल असा कोणालाही विश्वास नव्हता. पण रुबिना रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यामुळे तिचे वागणे असे असावे असे अनेकांना वाटले होते. रुबिना ही अशीच असे असे देखील अनेकांनी तिच्या या पोस्टखाली लिहिले.पण आता तिने याचा खुलासा केल्यानंतर प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया असतील हे देखील पाहणे महत्वाचे आहे.
माझ्या नवऱ्याची बायकोचा येणार सिक्वल, या फोटोमुळे जोरदार चर्चा
निकी तांबोळीसोबत झाली मैत्री
बिग बॉसच्या शेवटच्या काही टप्प्यात असताना निकी तांबोळी आणि रुबिना दिलैकची खूप चांगली मैत्री झाली. सुरुवातीला एकमेकांना डोळ्यासमोर पाहून न घेणारी निकी-रुबिना एकमेकांसाठी बहिणी कधी झाल्या हे कळले नाही. निकी केवळ मतांसाठी रुबिनासोबत राहते असा अंदाज घरातल्यांना आणि प्रेक्षकांनाही होता. पण या खेळानंतरही ती बरेचदा अभिनव आणि रुबिनासोबत वेळ घालवताना दिसते. त्यामुळे आता ही मैत्री खरीच होती असे म्हणावे लागेल.
नव्या गाण्यांमध्ये दिसणार रुबिना
रुबिना हा मालिका विश्वातील नावाजलेला असा चेहरा आहे. तिची मालिका विश्वातील प्रसिद्धी वाखाणण्यासारखी आहे. हा रिअॅलिटी शो जिंकून ती बाहेर येत नाही तोच तिला कामाच्या कितीतरी ऑफर्स येऊ लागल्या आहेत. तिने या संदर्भातील काही व्हिडिओ आणि फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ती येत्या काळात काही म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे.
दरम्यान, रुबिनाने तिच्या वागण्याचा खुलासा केल्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
उर्मिला मातोंडकरचा कमबॅक, बारा वर्षांनंतर करणार चित्रपटात काम