बॉलीवूड

सलमानप्रमाणेच त्याची आगामी हिरोईनही आहे फिटनेस फ्रीक

Aaditi Datar  |  Mar 2, 2020
सलमानप्रमाणेच त्याची आगामी हिरोईनही आहे फिटनेस फ्रीक

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान नेहमीच नव्या चेहऱ्यांना लाँच करत असतो आणि त्याने आधीही अनेक विदेशी चेहऱ्यांना त्याने बॉलीवूडमध्ये इंट्रोड्यूस केलं आहे. यातच आता नवीन नाव आलं आहे ब्राजीलियाई अभिनेत्री आणि मॉडेल लारिसा बोन्सीचं.

ही ब्राझिलियन ब्युटी सध्या सलमान खान आणि त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार असल्याने खूप चर्चेत आली आहे. नुकत्याच आलेल्या गुरु रंधावाच्या म्युझिक व्हिडिओ “सुरमा सुरमा” मध्येही ती झळकली. त्यामुळे लारिसाच्या फॅन्समध्ये अजून उत्सुकता वाढली आहे. तिने सलमानसोबतचा फोटो शेअर करत लिहीलं होतं की, मी बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेता सलमान खानसोबत काम करणार असल्याचा मला गर्व आहे आणि मी आनंदी आहे की, मला त्याच्यासोबत काम करून खूप काही शिकायला मिळालं. त्याच्या बरोबर काम केल्याने मी प्रभावित झाली असून मी स्वतःला खूप लकी समजते.

फिटनेस फ्रीक लारिसा

सलमान कँपमध्ये नव्याने सामील झालेली लारिसाही फिटनेस फ्रीक आहे आणि आणि वर्कआऊट तीसुद्धा सलमानप्रमाणेच नियमितपणे करते. तिच्याकडे पाहता तिचं नावही लवकरच बॉलीवूडमधल्या फिट अभिनेत्रीमध्ये घेतलं जाईल यात शंका नाही. कदाचित तिला फिटनेसबाबत सलमान खान असंही संबोधल जाऊ शकतं. कारण तिचे एब्स कोणत्याही बॉलीवूड हिरोपेक्षा कमी नाहीत.

लारिसाचा करिअर ग्राफ

लारिसा फॅशनेबलही आहे. एवढंच नाहीतर अप्रतिम डान्सरसुद्धा आहे. कारण तिने बॉलीवूडच्या करिअरला सुरूवात केली होती दोन हँडसम हंक्स अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमसोबत. सुबह होने ना दे या गाण्यात ती थिरकताना दिसली होती. लारिसाने टायगर आणि सुरज पांचोलीसोबत पण एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम केलं आहे आणि नुकताच गुरु रंधावाच्या “सुरमा सुरमा” मध्येही प्रेक्षकांना तिची वेगळीच अदा पाहायला मिळाली. बॉलीवूडमध्ये काम तर लारिसा करणार आहेच पण त्याआधी तिने टॉलीवूडमधील नेक्स एनी आणि थिक्का या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तसंच ती सलमान आधी गो गोवा गॉन या चित्रपटात सैफ अली खानसोबतही झळकली होती.

पाहा लारिसाचे काही स्टीमिंग हॉट आणि स्टायलिश फोटोज, जे पाहून तुम्हीपण व्हाल तिचे फॅन.

सलमानने बॉलीवूडमध्ये आणलेल्या परदेशी ब्युटीज

सलमानच्या लाँच लिस्टमध्ये पहिलं नाव येतं ते सोमी अलीचं. सोमी अलीसोबत त्याचं सीरियस अफेयरच्याही चर्चा होत्या. त्यानंतर सर्वात आघाडीवरचं नाव म्हणजे कतरिना कैफ. जी आज बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिरोईन झाली आहे. जॅकलिन फर्नांडिस, लुलिया वंतूर, इसाबेल कैफ (कतरिनाची बहीण), एली एवराम, सनी लिओन (बिग बॉसमध्ये लाँच) आणि नताशा स्टेनकॉविक (हार्दिक पांड्याची होणारी बायको) याचंही नाव सलमानने लाँच केलेल्या ब्युटीजमध्ये आहे.

याच इफ्तार पार्टीमध्ये झाला होता सलमान आणि शाहरुख मिलाप

केजोने केला सलमान खानच्या लग्नाचा गौप्यस्फोट

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

 

Read More From बॉलीवूड