बॉलीवूड अभिनेता संजय दत्त गेल्या काही महिन्यांपासून लंग कॅन्सरशी लढा देत आहे आणि मुंबईतील कोकिलाबे अंबानी रुग्णालयातच त्याच्यावर उपचार चालू आहेत. मात्र या कालावधीत संजय दत्तच्या तब्बेतीत बराच फरक पडल्याचे दिसून येत आहे आणि त्यामुळे चाहत्यांना आता संजय दत्तच्या तब्बेतीची अधिक काळजी वाटू लागली आहे. नुकताच संजय दत्त आपल्या कुटुंबासह दुबईवरून मुंबईत परतला आहे आणि त्याने रूग्णालयात हजेरी लावली. रूग्णालयातील संजय दत्तचा हा फोटो व्हायरल झाला आहे. हा नुकताच काढलेला संजय दत्तचा फोटो असल्याचे सांगण्यात येत आहे. पण हा फोटो पाहून संजय दत्तच्या तब्बेतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत.
संजय दत्तवर अजून एक संकट, फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त
संजय दत्तचा फोटो व्हायरल
संजय दत्त बऱ्याच काळानंतर आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी दुबईला गेला होता. त्याची मुलं लॉकडाऊनपासूनच दुबईमध्ये होती. त्यानंतर अचानक संजय दत्तला कॅन्सर असल्याचे निदान झाले आणि सगळी गणितं बदलली. संजय दत्त नुकताच परत आला असून त्याने रूग्णालयात हजेरी लावली आणि तिथेच एका चाहत्याने त्याच्याबरोबर फोटो क्लिक केला. हाच फोटो सध्या व्हायरल होत आहे. संजय दत्त अतिशय कमजोर झाला असून त्याचं वजन घटलेले दिसून येत आहे. तसंच अगदी क्लिन शेव्ड असलेला संजय दत्त खूपच थकलेला आणि बदललेलादेखील दिसून येत आहे. त्यामुळे हा फोटो पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे आणि सोशल मीडियावर त्याच्या तब्बेतीविषयी सर्वजण चिंता व्यक्त करत आहेत. सर्वांनीच त्याची तब्बेत लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना सुरू केली आहे. अभिनेता संजय दत्त सध्या उपचार घेत असून आपल्या कामावरही लक्ष केंद्रीत करत आहे. सध्या हातात असणारे चित्रपट पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे.
कॅन्सरवरील उपचार चालू असूनही संजय दत्त पूर्ण करणार ‘शमशेरा’चे चित्रीकरण
कुटुंबासह घालवला वेळ
संजय दत्त याच आठवड्यातून दुबईतून परत आला आहे. संजय दत्तने उपचाराचा एक पूर्ण फेज पूर्ण केल्यानंतर कुटुंबासह वेळ घालवला. पत्नी मान्यतासह आपल्या मुलांजवळ दुबईला संजय दत्त काही दिवसांपूर्वी रवाना झाला होता. दुबईतील काही फोटोदेखील समोर आले होते. ज्यामध्ये संजय दत्त खूपच आनंदी दिसत असून आपल्या कुटुंबासह वेळ घालवताना दिसून आला. तर आता पुन्हा उपचारासाठी संजय दत्त परत आला असून त्याच्या उपचाराची दुसरी फेज सुरू झाली आहे. यापूर्वी संजय दत्त पुढील उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार असून त्याला व्हिसा मिळाला आहे अशा स्वरूपाचे वृत्त आले होते. मात्र भारतातच संजय दत्त सध्या उपचार घेत आहे. पण कॅन्सरमुळे संजय दत्तची तब्बेत खूपच खराब झाली असल्याचंही दिसून येत आहे. त्यामुळे यातून लवकरात लवकर त्याला आराम मिळावा आणि या लढ्यातून त्याची सुटका व्हावी अशीच प्रार्थना त्याचे चाहते सध्या मनापासून करत आहेत. तसंच संजय दत्तनेदेखील आपण यातून लवकरच बाहेर पडू आणि लवकरच बरे होऊ अशी आशा सुरूवातीलाच आपल्या आजाराविषयी माहिती देताना केली होती. सध्या संजय दत्तकडे अनेक प्रोजेक्ट असून उपचारादरम्यानच या चित्रपटांचे चित्रीकरण आणि डबिंग पूर्ण करण्याचा प्रयत्न संजय दत्त करत आहे.
मुंबईतच संजय दत्त घेणार कॅन्सरवर उपचार
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje