मनोरंजन

आमिर अलीपासून वेगळं झाल्यानंतर संजीदा झाली आहे जास्तच ‘बोल्ड’

Dipali Naphade  |  Sep 20, 2020
आमिर अलीपासून वेगळं झाल्यानंतर संजीदा झाली आहे जास्तच ‘बोल्ड’

आमिर अली आणि संजीदा शेख हे टीव्ही इंडस्ट्रीमधील एक आदर्श जोडपं मानलं जायचं. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या दोघांमध्ये काहीच आलबेल नसल्याचं म्हटलं जातंय. दोघांनीही कधीही अधिकृतरित्या याबाबत काहीही वक्तव्य केलेलं नाही. मात्र हे दोघे गेल्या एक वर्षांपासून एकत्र राहात नाही. आमिर आणि संजीदाने एका मुलीलाही दत्तक घेतलं होतं जी मुलगी सध्या आमिरकडे आहे. आमिरने नुकताच तिचा पहिला वाढदिवसही साजरा केला. मात्र यावेळीही संजीदाने कोणत्याही प्रकारची पोस्ट केली नव्हती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर संजीदा शेख खूपच ‘बोल्ड’ फोटो पोस्ट करत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांचं तिच्याकडे आता जास्तच लक्ष जात आहे. आमिरपासून वेगळं झाल्यानंतर संजीदाने पोस्ट केलेले बरेच फोटो हे अतिशय बोल्ड आहेत आणि तिच्या कॅप्शनही तितक्याच बोल्ड असतात.

करण जोहरच्या घरात झालेल्या ‘त्या’पार्टीची होणार चौकशी

वेगळं झाल्यापासून संजीदा झाली अधिक बोल्ड

संजीदा एखाद्या बाहुलीइतकीच नाजूक आहे. तिला नेहमीच बाहुलीची उपमा दिली जाते. खऱ्या आयुष्यात संजीदा एखाद्या परीसारखी दिसते असंही एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री हिना खान म्हणाली होती. नीळे डोळे, गोरीपान, सिल्की केस, नाजूक आणि आकर्षक ओठ यामुळे संजीदाचे अनेक चाहते आहेत. इतकी वर्ष होऊनही संजीदा अजूनही तशीच आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये वाढच होत गेली आहे. मात्र आता आमिरपासून वेगळं झाल्यापासून तर संजीदाचा अंदाजही अधिक बदलला आहे. ती अधिक बोल्ड आणि ब्युटीफूल झाली असल्याचंही दिसून येत आहे. ती पोस्ट करत असणाऱ्या फोटोनां बऱ्याच कमेंट्स मिळत असून ती दिवसेंदिवस अधिकाधिक बोल्ड फोटो पोस्ट करत आहे. तिच्या चाहत्यांमध्ये जरी वाढ होत असली तरीही नेमकं याचं कारण काय आहे हे मात्र कळत नाहीये. त्यामुळे नक्की संजीदाच्या मनात काय चालू आहे अशीही चर्चा सुरू झाली आहे.

Good News: गेल्या महिन्यात आई-वडील गमावलेल्या या अभिनेत्याने दिली मुलगा झाल्याची गोड बातमी

हर्षवर्धन राणेसह जोडलं जातंय नाव

संजीदा आणि अभिनेता हर्षवर्धन राणे या दोघांनी वेबसिरीजमध्ये काम केलं आहे. तर सध्या हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचंही म्हटलं जातंय. संजीदाचं नाव हर्षवर्धन राणेसह जोडलं जातंय.  तर काही जण आमिर आणि संजीदा हे याच कारणामुळे वेगळे झालेत असंही म्हणत आहेत. मात्र याबद्दल कोणतीही खात्रीलायक अशी बातमी नाही. पण संजीदा आपल्या प्रत्येक फोटोमध्ये सध्या आनंदी दिसत असून अधिकाधिक बोल्ड होत चालली आहे हे दिसून येत आहे. संजीदाने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती अतिशय फिट दिसत असून तिची स्लीम ट्रिम फिगर पाहून अनेक जण कमेंट्स करत आहेत. तसंच तिची फिगर आणि तिच्या फिटनेसबाबत चाहत्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. संजीदा गेले अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये असून इतकी वर्ष ती जशी आहे तशीच दिसत आहे. हर्षवर्धन आपला अतिशय चांगला मित्र असून काहीही नसल्याचं संजीदाने सांगितलं होतं.  तसंच आमिर आणि आपल्यातला वाद आता कधीही मिटू शकत नाही असंही संजीदाने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. तर पैशाच्या वादावरून दोघांमध्ये दुरावा आल्याचंही काही ठिकाणी सांगण्यात आलं होतं. आमिर आणि संजीदाने 2012 मध्ये  लग्न केलं. त्याआधी त्यानी एकमेकांना डेट केलं होतं. 

रियालिटी शो मधून आलेले हे चेहरे आहेत मनोरंजन क्षेत्रात यशस्वी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन