बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan ) एक गुणी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनय आणि सौंदर्यासोबतच तिच्यात असलेली नम्रता चाहत्यांना नेहमीच भावते. पापाराझी असो अथवा एखादा फॅन ती नेहमीच सर्वांशी हसून आणि सौजन्याने वागते. मात्र नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात साराच्या रागाचा पारा चढलेला दिसत आहे. साराचा हा अवतार पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की असं काय घडलं की साराला एवढा राग आला
काय घडलं नेमकं
साराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात ती एका प्रोजेक्ट सेटवरून बाहेर पडत गाडीमध्ये बसत होती. सेलिब्रेटींचे फोटो घेण्यासाठी अशा ठिकाणी पापाराझी नेहमीच असतात. सहाजिकच साराचे फोटो घेण्यासाठी पापाराझींनी गोंधळ केला. या गोंधळात साराला एका फोटोग्राफरचा धक्का लागला. ज्यामुळे चीड येत सारा अली खान लगेच तिच्या गाडीत बसली. पण असं झाल्यावरही फोटग्राफर्स तिला फोटो देण्यासाठी विनंती करू लागले. या विनंतीला धुडकावत चिडलेल्या साराने पापाराझींवर तिचा राग ओकला. सारा रागाने म्हणाली, “मी फोटो काढायला दिले तर तुम्ही मलाच धक्का देता” साराचा हा अवतार सर्वांसाठीच नवा होता. कारण या अवतारात नेहमी हात जोडून नम्रतेने आणि सौजन्याने वागणारी सारा कुणाला दिसली नाही. सहाजिकच साराचा हा व्हिडिओ बघता बघता व्हायरल झाला आणि सारा ट्रोल होऊ लागली. काही जणांना साराचे वागणे योग्य आहे असं वाटलं. कारण पापाराझींच्या वागण्याचा अतिरेक झाल्यामुळे सारा चिडणं स्वाभाविक आहे असं त्यांना वाटलं. मात्र काहींनी याचा वेगळाच अर्थ काढायला सुरूवात केली. साराच्या डोक्यात हवा गेली असून ती आता पापाराझींशी चुकीच्या पद्धतीने वागत आहे असं अनेकांचं मत आहे.
साराचे आगामी चित्रपट
सारा अली खान सध्या तिच्या कामात बिझी आहे. अतरंगी रे मध्ये एका वेगळ्याच धाटणीची भूमिका साकारल्यानंतर ती तिच्या पुढील प्रोजेक्टसाठी सज्ज झाली आहे. साराच्या आगामी चित्रपटांची लिस्ट खूप मोठी आहे. सध्या ती लक्ष्मण उतेकरच्या एका शीर्षक जाहीर न केलेल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. ज्या चित्रपटात तिच्यासोबत विकी कौशलदेखील लीड रोल साकारणार आहे. यासोबतच ती लवकरच नखरेवाली, गॅसलाईट आणि दी इम्मॉर्टल ऑफ अश्नत्थामा अशा अनेक चित्रपटात काम करत आहे. सहाजिकच सारा सध्या खूपच बिझी आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक
Read More From Uncategorized
चार वर्षांनंतर ‘पठाण’मधून परत येण्यासाठी शाहरूखने घेतली मेहनत, ट्रेनरने केला खुलासा
Trupti Paradkar
भारतीय स्किन टोनवर शोभतात हे ब्लश
Dipali Naphade