लग्नाच्या रिसेप्शनला मस्त लेहंगा घालावा असे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. लेहंगा हा आता कोणत्याही लग्नाच्या पद्धतीमध्ये घातला जाणारा असा #bridalwear आहे. हा लेहंगा लग्नात आणि त्यानंतर फार फार तर एक ते दोनवेळा घातला जातो. त्यानंतर या लेहंग्याचे काय करायचे कळत नाही. जितका महाग आणि जड लेहंगा तितका तो महाग आणि कपाटातील जागा अडवणारा असतो. पण या लेहंग्याऐवजी जर तुम्ही लग्नाच्या सगळ्या सोहळ्यांसाठी साड्या निवडल्या तर या साड्या तुम्हाला लग्नानंतरही नेसता येतात. आता लग्नासाठी शालूच घ्यायला हवा असे नाही तर अशा काही साड्या आहेत ज्या शालूपेक्षाही अधिक उठून दिसतात. जाणून घेऊया अशा साड्या ज्या तुम्ही लेहंग्याऐवजी निवडू शकता.
बनारसी साडी
बनारसी साड्यांमध्ये मिळणारे कितीतरी प्रकार हे लग्नासाठी एकदम परफेक्ट आहेत. बनारसी साड्या या वेगवेगळ्या रेंजमध्ये मिळतात. बनारसी साड्यांमध्ये तुम्हाला हवे ते रंग मिळतात यावरील डिझाईन्समध्येही खूप व्हरायटी असते. त्यामुळे एखादी बनारसी साडी घेऊन तुम्हाला ती अगदी कडक आणि वेगळ्या पद्धतीने नेसता येईल.हल्ली सिल्व्हर आणि गोल्डन अशा वेगवेगळ्या बॉर्डरमध्ये या साड्या मिळतात. या साड्यांवर हेव्ही ब्लाऊज आणि ज्वेलरी घातली की, तुम्हाला हेवी लुक मिळू शकतो. वेगळ्या हेअरस्टाईल आणि ड्रेपिंग स्टाईलने तुम्हाला ही साडी सुंदर दिसू शकते.
सिलव्हर जरीच्या साड्या आणि ज्वेलरी आहेत सध्याचा फेस्टिव्ह ट्रेंड, नक्की ट्राय करा
पैठणी
साड्यांची राणी पैठणी ही सगळ्याच साड्यांची शान आहे. महाराष्ट्रीयन लग्नात पैठणीचा तोरा हा काही वेगळाच असतो. आपली मराठमोळी पैठणीही तुमच्या लग्नात तुमचा भाव चांगलाच वाढवू शकते. पैठणींचेही अनेक प्रकार आहेत.त्यामध्ये जर तुम्ही चांगल्या बॉर्डरच्या साड्या निवडल्या तर त्या तुम्हाला अधिक चांगल्या दिसतात. पैठणींच्या पदरावर असलेला मोर आणि हल्ली मिळणारे पैठणीचे ब्लाऊज पीस साड्यांना चांगला न्याय देतात. अगदी 7 हजारापासून तुम्हाला चांगल्या पैठणी साड्या मिळू शकतात.
कांजिवरम साड्या
कांजिवरम साड्या या देखील ट्रेडिशनल साड्यांचा एक चांगला प्रकार आहे. कांजिवरम साड्यांंमध्येही तुम्हाला बरीच व्हरायटी मिळू शकते. लग्नासाठी कांजिवरम साड्यांची निवड करताना ज्यांचे काठ गोल्डन रंगाचे असतात अशा कांजिवरम साड्यांची निवड तुम्ही करा. त्या साड्या तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने आणि स्टाईल करुन नेसता येतात. कांजिवरम साड्यांमध्येही वेगवेगळ्या रेंज असतात.त्यामुळे तुमचा बजेटपासून तुम्ही त्याची निवड करा.
वेलवेट साड्या
सिल्व्हर बॉर्डरच्या साड्यांप्रमाणेच हल्ली ज्या साड्यांचा ट्रेंड जास्त आहे अशा साड्या म्हणजे वेलवेटच्या साड्या. वेलवेटच्या साड्या या प्लेन आणि गडद असल्या तरी त्याला लुक देण्यासाठी तुम्ही एखादा छान डिझायनर ब्लाऊज, शाल असे परिधान करु शकता. वेलवेटच्या साड्यांमध्ये बरेच रंग मिळत असले तरी देखील तुम्ही या साड्यांमधील डार्क रंग निवडा असे रंग अधिक चांगले दिसतात. या साड्याही तुम्हाला वेगवेगळ्या रेंजमध्ये मिळू शकतात.
साड्यांवर ऑफशोल्डर ब्लाऊज निवडताना
कांचिपुरम साड्या
मोठ्या बॉर्डर या कांचिपुरम साड्यांची ओळख असते. अशा साड्या लग्नात नवरीला नेसण्यासाठी एकदम परफेक्ट आहेत. कांचिपुरम साड्या या अनेक जणांकडे असतील. पण लग्नासाठी नववधूचा पोषाख म्हणून तुम्ही या साडीचा विचार करत असाल तर तुम्ही या साडीमधील वेगळी व्हरायटी निवडू शकता. कांचिपुरम साड्या या हलक्या असतात. त्या छान बसतात त्यामुळे या साड्या नेसणे देखील खूप सोपे असते.
आता खूप जास्त पैसे घालवण्यापेक्षा तुम्ही या साड्यांमध्ये पैसे घाला. कारण या साड्या तुम्हाला कधीही आणि कुठेही नेसता येतील.
जयपूर साड्यांचा वाढता ट्रेंड, आकर्षक आणि अप्रतिम साड्या