सध्या सोशल मीडियावर घटस्फोट सोहळ्याची (Divorce) चर्चा जोरात रंगली आहे. घटस्फोट सोहळ्याच्या व्हायरल झालेल्या सोहळ्याने तर साऱ्या महाराष्ट्राला अचंबित करून सोडले आहे. एवढंच बाकी राहील होत, आता हे ही पाहायला मिळालं. पुणे तिथे काय उणे, पाटलाचा नादच खुळा, लोक कशाचे सोहळे करतील सांगता येत नाही अशा कमेंट्सने तर हाहाकार माजवला आहे. घटस्फोट सोहळ्याची चाललेली जय्यत तयारी पाहता नक्की हा प्रकार काय आहे या विचाराने साऱ्यांनाच चिंतेत पाडले आहे. असा हा घटस्फोट सोहळा साऱ्यांनाच अचंबित करून सोडणारा आहे. चार दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला हा सोहळा काही घटस्फोट सोहळा नसून ‘मंगलाष्टक रिटर्न’ (Mangalashtak Return) या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटा अंतर्गत असणाऱ्या चित्रीकरणाचा एक भाग आहे. नक्की घटस्फोट सोहळ्याची थीम काय आहे, हा आगळावेगळा सोहळा कशाचे भाकीत उलगडणार आहे याकडे साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या नजरा वळल्या आहेत.
नव्या मराठी मालिकांची लागणार वर्णी, या मालिका घेत आहेत निरोप
चित्रीकरणासाठी झाली सुरूवात
चित्रीकरणास सुरुवात होऊन अवघे चारच दिवस झाले असून या चित्रपटाच्या अंतर्गत होणाऱ्या या घटस्फोट सोहळ्याने तर हाहाःकारच माजवला आहे त्यामुळे प्रेक्षकांमधील चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माता वीरकुमार शहा यांनी सांभाळली आहे. त्यांच्या ‘शारदा प्रॉडक्शन’ या प्रॉडक्शन हाऊसतर्फे या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘मंगलाष्टक रिटर्न’ चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक,आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, वृषभ शहा, अभिनेत्री श्वेता खरात, प्रसन्ना केतकर, शीतल अहिरराव अभिनेता सुनील गोडबोले, कमलेश सावंत, समीर पौलस्ते अभिनेत्री प्राजक्ता नेवळे, सोनल पवार,भक्ती चव्हाण, शीतल ओस्वाल यांच्याही दमदार भूमिका पाहायला मिळणार आहेत. लॉकडाऊन नंतर चित्रपट सृष्टीला मिळालेल्या ग्रीन सिग्नल दरम्यान या ‘मंगलाष्टक रिटर्न’ चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला होता. दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित हा चित्रपट असून एका नव्या कोऱ्या विषयाचा आणि कोड्यात टाकणारा दमदार विषय घेऊन हा चित्रपट लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. हिंजवडी पुणे येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच घटस्फोट सोहळा असे नाव असलेल्या कमानीचा फोटो सर्वत्र व्हायरल झाला आहे. आणि फोटोसह बऱ्याच मनोरंजक अशा कमेंट्सचा माराही पाहायला मिळाला.
प्रियंकाचा धक्कादायक खुलासा, मिस वर्ल्ड होण्याआधी काय घडलं होतं
वेगळ्या धाटणीचा चित्रपट
‘बाजार’ या चित्रपटातून अभिनेता, दिग्दर्शक योगेश भोसले प्रेक्षकांच्या समोर आला. ‘बाजार’ या त्यांनी केलेल्या दिग्दर्शित चित्रपटाला 16 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आता त्यांचा ‘मंगलाष्टक रिटर्न’ हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. त्यामुळे या अचंबित करून टाकणाऱ्या सोहळ्याची नेमकी कथा काय असेल याची साऱ्या सिनेरसिकांना उत्सुकता लागून राहिली आहे. प्रसाद ओक आणि आनंद इंगळे यांच्या कॉमेडीची जुगलबंदी ही प्रेक्षकांसाठी नक्कीच पर्वणी असेल. तर सक्षम कुलकर्णी आणि श्वेता खरात हे कलाकारही अप्रतिम काम करतात. आता हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस केव्हा येतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या जोरात सुरू असून याच वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी आशा आहे.
Bigg boss : रुबिना दिलैक विजेती, पण राहुलने जिंकली प्रेक्षकांची मनं
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade