टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खानचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. हिना खान तिचे सौंदर्य आणि स्टाईल यासाठी लोकप्रिय आहे. सहाजिकच अनेकींना हिना खानप्रमाणे स्टायलिश दिसावं असं नक्कीच वाटत असेल. अनेक जणी तिच्या फॅशनपासून ब्युटी टिप्सपर्यंत सर्व गोष्टींसाठी हिनाला फॉलो करतात. हिना सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह आहे. त्यामुळे ती सतत तिच्या काही ब्युटी टिप्स आणि स्टायलिश लुक चाहत्यांसोबत शेअर करत असते. हिनाच्या सौंदर्यात अधिक भर घालतात ते तिचे सिल्कप्रमाणे चमकणारे सिल्की अॅंड शायनी केस. जर तुम्हालाही हिनाप्रमाणे केस चमकदार करायचे असतील तर या काही टिप्स नक्कीच फॉलो करा.
हिना केसांसाठी करते हे उपाय –
हिवाळ्यात केसांच्या समस्या अधिकच वाढतात. वातावरणातील कोरडेपणा आणि थंडी याचा परिणाम तुमच्या केसांवरही जाणवू लागतो. थंडीत तुमची त्वचा कोरडी होते त्याचप्रमाणे स्काल्पही कोरडा होतो. ज्यामुळे केसांमध्ये खाज येणं, केस गळणं, कोंडा होणं, केस कोरडे आणि निस्तेज दिसणं अशा समस्या जाणवतात. एक सेलिब्रेटी असली तरी हिना खानलाही केसांबाबत या समस्या जाणवतात. यासाठीच हिवाळ्यात केसांची योग्य निगा राखण्यासाठी हिना नेहमी आयुर्वेदिक तेलाने केसांना मालिश करते. ज्यामुळे तिचे केस सुंदर, शायनी आणि स्वस्थ होतात. आयुर्वेदिक तेलाने मालिश केल्यामुळे थंडीत निर्माण होणाऱ्या केसांच्या इतर समस्याही आपोआप कमी होतात. हिना खान तिच्या केसांची निगा राखण्यासाठी आजीच्या घरगुती उपायांवर विश्वास ठेवते. म्हणूनच ती नेहमी तिच्या केसांना आवळा, तिळ आणि नारळाचे तेल या तेलांनी युक्त त्रिचप ऑईलने मालिश करके. तिने स्वतःच याबाबत तिच्या सोशल मीडियावर माहिती दिली आहे. या तेलाने मालिश केल्यावर केस शॅम्पू करण्यासाठीदेखील ती आयुर्वेदिक शॅंम्पूचा वापर करते. ज्यामुळे तिचे केस इतरांपेक्षा हटके आणि आकर्षक दिसतात. केस निरोगी आणि चमकदार करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.
आयुर्वेदिक तेल घरी करण्याची सोपी युक्ती –
जर तुम्हाला बाजारातील हे विकतचे तेल नको असेल तर यासाठी जाणून घ्या केसांचे आरोग्य वाढवणारे हे आयुर्वेदिक तेल घरी कसे तयार करावे
आयुर्वेदिक तेलासाठी लागणारे साहित्य –
- नारळाचे तेल
- आवळ्याचे तेल
- तिळाचे तेल
- महाभृंगराज तेल
आयुर्वेदिक तेल तयार करण्याची कृती –
महाभृंगराज तेल, आवळ्याचे तेल, तिळाचे तेल आणि नारळाचे तेल एकत्र करा. सर्व तेलांचे मिश्रण एकत्र करा आणि मंद गॅसवर थोडं कोमट करा. थंड झाल्यावर हे ते एका बाटलीत भरून ठेवा आणि गरजेनुसार वापरा.
आयुर्वेदिक तेल केसांवर कसे वापरावे –
रात्री झोपण्यापूर्वी एका भांड्यात हे तयार आयुर्वेदिक तेल घ्या आणि कापसाच्या मदतीने केसांच्या मुळांना लावा. हलक्या हाताने केसांच्या मुळांना मालिश करा. केस वेणी अथवा पोनी बांधून रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी सौम्य शॅम्पूने केस धुवून टाका. जर रात्री तेल लावायचे नसेल तर तुमच्या वेळेनुसार केसांना तेल लावा आणि मालिश केल्यावर केसांना स्टिम द्या. स्टिम देण्यासाठी गरम पाण्यात टॉवेल बूडवून तो घट्ट पिळून घ्या आणि केसांवप गुंडाळून ठेवा. ज्यामुळे तेल केसांच्या मुळांमध्ये मुरेल आणि मुळांना पोषण मिळेल. वीस ते तीस मिनिटांनी तुम्ही केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवू शकता. केस धुण्यासाठी सौम्य शॅम्पू अथवा आवळा, शिकेकाई, रिठाचा वापर करा. ज्यामुळे केस अधिक सुंदर आणि निरोगी होतील.
आर्युवेदिक तेलाचे कोणतेही दु्ष्परिणाम नाहीत. केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही हिवाळ्यात आठवड्यातून दोन ते तीन वेळा आयुर्वेदिक तेल केसांवर लावू शकता. ज्यामुळे तुमच्या केसांच्या समस्या नक्कीच कमी होतील.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अभिनेत्री प्रिया बापटने शेअर केलं स्किन केअर रूटिन, अशी घेते त्वचेची काळजी
तुमचेही केस गळतायत? ‘या’ गोष्टी खाल तर थांबेल तुमची केसगळती
केसांना फुटलेत फाटे, काय आहेत त्यावर घरगुती उपाय (Home Remedies For Split Ends In Marathi)