आरोग्य

चुकूनही खाऊ नका या फळांच्या बिया, होतील दुष्परिणाम

Trupti Paradkar  |  Jul 18, 2022
चुकूनही खाऊ नका या फळांच्या बिया, होतील दुष्परिणाम

फळं आणि भाज्यांमध्ये बिया असतात. बऱ्याच प्रकारच्या बिया या आरोग्यासाठी हितकारक असतात. म्हणूनच त्या बियांना सूपरसीड्स असंही म्हणतात. या बिया सुकवून त्यांचा पुर्नवापर केला जातो. अशा बियांमध्ये भरपूर प्रोटीन्स असल्यामुळे फिटनेस प्रेमी दिवसाची सुरूवातच सूपरसीड्सने करतात. मात्र याचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्ही सर्वच प्रकारच्या बियांचा वापर तुमच्या आहारात करायला हवा. कारण अशाही काही बिया फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये आढळतात. ज्या तुमच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. या बियांच्या सेवनाने तुमचे आरोग्य बिघडू शकते. म्हणूनच जाणून घ्या कोणत्या बिया चुकूनही खाऊ नयेत. तसंच वाचा या आरोग्यदायी टिप्स मराठी | Health Tips In Marathi, वजन वाढवायचे असेल तर जाणून घ्या वजन वाढवण्यासाठी फळं (Weight Gaining Fruits In Marathi), आरोग्यासाठी उत्तम फॉलिक ॲसिड पदार्थ | Folic Acid Foods In Marathi

सफरचंदाची बी

निरोगी राहण्यासाठी नियमित एक तरी सफरचंद खावं असं डॉक्टर सांगतात. मात्र सफरचंद कितीही पौष्टीक असलं तरी त्याच्या बियामात्र आरोग्यासाठी मुळीच चांगल्या नसतातच उलट विषारी असतात. सफरचंदाच्या बियांमध्ये असे घटक असतात जर त्या प्रमाणाबाहेर सेवन केल्यास त्यामुळे शरीराला विषबाधा होऊ शकते. 

टोमॅटोची बी

टोमॅटोचा वापर घरात स्वंयपाकघरात नियमित होत असतो. टोमॅटोमुळे पदार्थाला स्वाद येतोच शिवाय तोंडाला रूची येते. टोमॅटोमध्ये अनेक पोषक घटक असतात जे निरोगी राहण्यासाठी शरीराला आवश्यक असतात. मात्र असं असलं तरी टोमॅटोचा वापर करताना त्यातील बिया मात्र सावधपणे काढून टाकाव्या. कारण टोमॅटोच्या बिया अति प्रमाणात शरीरात गेल्या तर त्यामुळे मुतखड्याचा त्रास होण्याची शक्यता असते. टोमॅटोच्या बियांमध्ये असे घटक असतात ज्यामुळे मुतखडा निर्माण होतो. 

लिचीची बी

लिची फळ उन्हाळा संपताना आणि पावसाळ्याच्या सुरवातीला मिळतं. थंडगार लिची खाण्यामुळे उन्हाची काहिली कमी होते. मात्र तुम्हाला माहीत आहे का लिचीची बी कधीच खाऊ नये. कारण लिचीची बी अति प्रमाणात पोटात गेल्यास तुमच्या रक्तातील साखर वाढून मधुमेह अनियंत्रित होण्याची शक्यता असते. यासाठी लिची खाताना या गोष्टीची काळजी घ्यावी. 

या व्यतिरिक्त जर्दाळू, चेरी, प्लम, पीच अशा फळांच्या बिया मुळीच खाऊ नये. फळं खाताना बिया गिळल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारण त्या आरोग्यासाठी चांगल्या नसतात. मात्र असं असलं तरी एकदा बी गिळल्यास त्रास होत नाही. या बिया मोठ्या प्रमाणात सेवन केल्या गेल्या तर त्या आरोग्यासाठी अपायकारक ठरतात.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य