पालकत्व

बाळंतपणानंतर अशी घ्या स्वतःची काळजी, नाही येणार नैराश्य

Trupti Paradkar  |  Jun 14, 2022
Selfcare tips for new moms

बाळंतपणानंतर आई होण्याच्या आनंदासोबत जबाबदारीसोबत प्रत्येक स्त्रीला नवीन जबाबदाऱ्यांना सामोरं जावं लागतं. बाळाचं संगोपन, बाळाची अंघोळ, बाळाचे नॅपी बदलणं, बाळाला दूध पाजणं अशा अनेक गोष्टी तिला सतत कराव्या लागतात. बाळाची काळजी घेताना कधी कधी तिला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. ज्यामुळे पुढे तिला बाळंतपणानंतर येणाऱ्या नैराश्याला सामोरं जावं लागू शकतं. यासाठी वाचा मातृत्वानंतरचे मानसिक आरोग्य, नैराश्याची कारणे आणि उपाय (Postpartum Depression In Marathi) शिवाय बाळंतणपणानंतर जरी तुमचे दैनंदिन व्यवहार बदलले असले तरी स्वतःची काळजी जरूर घ्या. नवमातांसाठी या काळात स्वतःच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याची योग्य काळजी घेतली तर त्यांचं आईपण सुखाचं होऊ शकतं. यासाठीच आई झाल्यावर फॉलो करा या सेल्फ केअर टिप्स (Selfcare tips) आणि बाळंतिणीची काळजी घेण्यासाठी टिप्स | After Pregnancy Tips In Marathi

नवमातांसाठी सेल्फ केअर टिप्स – Selfcare Tips for New Moms

बाळाच्या संगोपनासोबत प्रत्येक नवमातेने दिवसभरात काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवायला हवा. यासाठी काही सोप्या टिप्स

बेबी ब्लूजमधून बाहेर या

बाळाच्या जन्मानंतर नवमातेला अनेक हॉर्मोनल, शारिरीक आणि मानसिक बदलांना सामोरं जावं लागतं.  ज्यामुळे तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. सतत चिडचिड करणं, रडायला येणं हे याचं एक सामान्य लक्षण आहे. ज्याला बेबी ब्लूज असं म्हणतात. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या मनातील भावना तुमच्या जोडीदार, आईबाबा अथवा मित्रमंडळींसोबत शेअर केल्या तर तुम्हाला यातून बाहेर पडणं सहज शक्य होतं. यासाठी घरच्यांची आणि योग्य तज्ञ्जांची मदत घेण्याचा संकोच बाळगू नका.

योग्य आहार घ्या

गरोदरपण आणि बाळंतपणात स्त्रीच्या शरीराची अनेक प्रकारे झीज झालेली असते. शिवाय बाळंतपणानंतर स्तनपान ही आईची मुख्य जबाबदारी असते. अशा वेळी तुमच्या शरीराचे योग्य पोषण होणं गरजेचं आहे. कारण तरंच तुम्ही तुमच्या बाळाचे योग्य पोषण करू शकता. म्हणूनच या काळात तुमच्या आहारावर पुरेसं लक्ष द्या. बाळंतपणानंतरच्या आहारासाठी घरातील वडीलधाऱ्या अनुभवी महिलांचा सल्ला घ्या.

शांत झोप घ्या

आई झाल्यावर तुमची झोप आपोआप कमी होते. बाळासोबत तुम्हालाही बऱ्याचदा रात्रभर जागरण करावं लागतं. बाळंतपणानंतर अनेक महिलांना बाळ रडेल या भीतीने झोप घेता येत नाही. असं असलं तरी तुमचं बाळ जेव्हा झोपतं त्या काळात तुम्ही तुमची झोप पूर्ण करू शकता. यासाठी नवमातांनी दिवसा झोप घेण्याचा कंटाळा करू नये. कारण निरोगी राहण्यासाठी तुमच्या शरीराला पुरेशा झोपेची गरज आहे.

हायड्रेट राहा

नवमातांना सतत दोन ते तीन तासांनी बाळाला दूध पाजावं लागतं. सतत स्तनपान दिल्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. शरीर डिहायड्रेट होऊ नये यासाठी नवमातांनी मुबलक पाणी पिणं गरजेचं आहे. या काळात पोषण मिळेल अशी पेज, सूप पिणं देखील नवमातांसाठी नक्कीच फायद्याचं ठरेल. 

सौंदर्याकडे लक्ष द्या

बाळंतपणानंतर अनेक नवमाता स्वतःच्या सौंदर्याकडे लक्ष देणं सोडून देतात. बाळाच्या संगोपनात त्या इतक्या गुंततात की त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. मात्र याची जाणिव झाल्यावर त्यांना आपण चांगलं दिसत नाही यामुळेही नैराश्य येतं. यासाठीच बाळाच्या संगोपनासोबत स्वतःच्या सौंदर्याकडेही थोडं लक्ष देण्यास काहीच हरकत नाही. यासाठी नियमित अंघोळ करणं, केस विंचरणं, काजळ लावणं, कधी कधी बाळाला इतरांकडे देऊन जवळ असलेल्या पार्लरमध्ये जाणं केल्यास तुम्हाला फ्रेश वाटेल. यासाठी वाचा कशी घ्यावी बाळंतपणानंतर त्वचेची काळजी | Skin Care During Pregnancy In Marathi

व्यायाम करा 

बाळंतपणानंतर तुम्ही लगेच हेव्ही व्यायामाचे प्रकार करू शकत नाही. मात्र बाळंतपणानंतर काही दिवस तुम्ही चालण्याचा व्यायाम नक्कीच करू शकता. घराशेजारी अथवा बागेत दररोज फिरल्यास तुम्हाला ताजी हवा मिळेल आणि फ्रेश वाटू लागेल. या काळात करण्यासारखी योगासने, प्राणायम आणि मेडिटेशन तुम्ही तज्ञ्जांच्या सल्लाने करू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From पालकत्व