नातीगोती

नात्यात प्रायोरिटी सेट करता आली नाही तर…

Leenal Gawade  |  Apr 25, 2022
Relationship_priority

 लग्नाआधी कपलमधील बाँड वेगळा असतो. एकमेकांपासून दूर राहू शकत नाही. एकमेकांशिवाय कशाचाही विचार करु शकत नाही. असे साधारणपणे सगळीकडे दिसून येते. पण लग्नाची माळ गळ्यात पडल्यानंतर अचानक असे काय होते की, एकमेकांशिवाय राहू न शकणारे दोन जीव अचानक एकमेकांशिवायही राहायला तयार होतात. लग्नानंतर तुमच्या आणि जोडीदाराच्या नात्यात हा बदल तुम्हाला जाणवला आहे का? जाणवला असेल तर नात्यातील तुमच्या प्रायोरिटी या आता बदलत चालल्या त्याचा हा परिणाम आहे. पण नात्यात प्रायोरिटी ही आपणच ठरवत असतो आणि आपणच बिघडवत असतो. ही प्रायोरिटी सेट करणे गरजेचे आहे. कारण ते सेट करता आले नाही तर नात्यात पूर्वी असणारे प्रेम टिकून राहात नाहीत. उदाहरणांसह जाणून घेऊया तुमच्या आयुष्यातही असे प्रसंग आले आहेत का?  आणि तुम्ही त्यावेळी नेमकं काय केलं ते

आज मला वेळ नाही

लग्नापूर्वी अनेकदा दोघं एकमेकांसाठी काहीही ॲडजेस्ट करायला तयार असतात. पण लग्नानंतर वीकेंड किंवा एखादा पिक्चरसाठीही वेळ काढणे जोडीदारापैकी एकाला जमत नाही. तुमच्यात अचानक झालेला बदल जोडीदाराला पटेल असा नाही. कारण वेळ नाही म्हणताना तुम्ही तुमच्या काही खास कामांसाठी वेळ काढत असता. पण तुम्हाला जोडीरासाठी आज मला वेळ नाही असे म्हणणे सोेपे ठरते म्हणून तुम्ही ते बोलता. ज्याचा परिणाम जोडीदाराची नाराजी तुम्हाला सहन करावी लागते.  त्यापेक्षा तुम्ही एकदिवस बसून खास जोडीदारासोबतचे प्लॅन केले तरी देखील त्याला एक वेगळे समाधान मिळते. 

नात्यात गुंता नको

खूप वेळा घरातील काही लोकांसाठी आपण जोडीदाराचे मन दुखावत असतो. माणूस म्हटला की, नाते आलेच. घरातील इतर लोकांशी नाते जपण जितके गरजेचे आहे तितकेच तुमच्या हक्काच्या जोडीदाराशी जुळवून घेणेही गरजेचे आहे. खूप वेळा असे होते की आपण एक नाते जपण्यासाठी आपल्या हक्काच्या जोडीदाराला दुखावून बसतो. उदा. तुम्ही जोडीदाराला कुठेतरी जाण्याचे किेवा वेळ देण्याचे कबूल केले आणि अचानक तुम्ही घरातील दुसऱ्यासोबत बाहेर जाण्याचे प्लॅन करता त्यामुळे जोडीदाराचे आणि तुमचे बॉन्डिंग नाहक तुटते. असा गुंता तुम्ही स्वत:च करत असता. त्यामुळे असे करत असाल तर आताच हे थांबवा. कधी कोणत्यावेळी कोणाला वेळ द्यायचा हे तुम्हाला कळायला हवे. 

ओढाताण करु नका

खूप जण नात्यात नाहक ओढाताण करतात. म्हणजे सगळं काही ॲडजस्ट करायला जातात. पण तसे करणे नेहमीच शक्य नसते. तुम्हाला एखाद्याला वेळ देताना दुसऱ्याला नाही म्हणावे लागते. त्यामुळे कोणाला होकार द्यायचा आणि कोणाला नकार द्यायचा ते तुमचं तुम्ही ठरवा. ओढाताण करण्यापेक्षा तुम्हाला बॅलेन्स साधता आले पाहिजे. कोणाला काय बोलू याचा विचार करण्यापेक्षा सध्या काय महत्वाचे आहे ते तुम्हीच ठरवा. तुमचा हा स्वभाव जोडीदाराला कळला तर त्याला तुमच्याप्रती विश्वास राहील. नाहीतर हे नाते तुटायला वेळ लागणार नाही. 

उदा. घरात आई, बहीण आणि इतरांना कसे कधी जपायचे हे तुम्ही शिकले तर आयुष्यात तुम्ही सुखी राहाल. 

आता नात्यात प्रायोरिटी सेट करा अन्यथा नात्यातील दुष्परिणामांना सामोरे जायला तयार राहा.

Read More From नातीगोती