मनोरंजन

शिवाजी नाही छत्रपती शिवाजी… सोशल मीडियावर शरदची वाहवा

Leenal Gawade  |  Nov 20, 2019
शिवाजी नाही छत्रपती शिवाजी… सोशल मीडियावर शरदची वाहवा

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांचा अपमान हा देशातील कोणालाच सहन होणारा नाही. त्यात शिवाजी महाराजांना नुसतेच शिवाजी असे म्हणणे कोणाला रुचणार म्हणा. तान्हाजी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी असे काही घडले की, शरदने एकाची चूक दुरुस्त करत त्याला शिवाजी नाही तर छत्रपती शिवाजी असे म्हणण्यास सांगितले. मग काय शरदच्या या जबाबदारीपूर्ण वागण्याची सगळ्यांनीच तारीफ केली. शिवाजी महाराजांची भूमिका साकारावी ती अशा जबाबदार अभिनेत्याने असेच सगळ्यांना आता वाटू लागले आहे.

टीव्हीवरील स्टार्स… पण प्रत्यक्ष आयुष्यात राहिली प्रेमकहाणी अपूर्ण

नेमकं झालं काय?

अजय देवगणचा ‘तान्हाजी’ चित्रपट लवकरच येणार आहे. या चित्रपटात अनेक मोठे कलाकार आहेत हे ठाऊकच होते. पण शिवाजीच्या भूमिकेत शरद केळकरला पहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला कारण शरद शिवाजी महाराजांची भूमिका साकारेल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या ट्रेलर सोहळ्यात शरदशी बोलण्याची उत्सुकता सगळ्या पत्रकारांना होती. अशाच एका पत्रकाराने ज्यावेळी शरदला त्याच्या भूमिकेबद्दल विचारताना तू शिवाजीची भूमिका करतोय असा प्रश्न विचारला त्यावेळी त्याची कोणतीही गोष्ट ऐकण्याआधी त्याने तिला शिवाजी नाही छत्रपती शिवाजी महाराज अशी आठवण करुन दिली. त्यानंतर त्या पत्रकारानेही आपली चूक लक्षात घेत छत्रपती असे म्हटले. त्यामुळे शिवाजी महाराजांचा अवमान झालेले चालणार नाही हे त्याने त्याच्या वागण्यातून दाखवून दिले.

अमिताभ बच्चन ही झाले ट्रोल

Instagram

काहीच दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात एका प्रश्नाचा पर्याय सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी असे म्हटले होते. त्यामुळे अमिताभ बच्चन यांना सगळ्यांनी ट्रोल केले होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा कोणालाही सहन होण्यासारखा नाही. हे त्यावेळी सगळ्यांनी लक्षात आणून दिले होते.

शरदची भूमिकेत दिसतोय फारच सुंदर

 शरदला या आधी नकारात्मक भूमिका करताना पाहिले आहे. त्याने हिरोची भूमिका जरी साकारली असली तरी देखील त्यामध्ये नेहमीच एक ग्रे शेड पाहायला मिळाली आहे. पण आता शरदला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहून अनेकांना त्याने ही भूमिका करणेही रुचले आहे. म्हणूनच त्याचे पोस्टर रिलीज झाल्यानंतर लोकांनी त्याच्या या लुकवर स्तुतीसुमने उधळली.

तान्हाजीच्या ट्रेलरची स्तुती

तान्हाजीचा ट्रेलर जर तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्की पाहा कारण हा ट्रेलर लोकांना फारच आवडला आहे. तानाजी मालुसरे हे इतिहासातील महत्वपूर्ण व्यक्तीरेखा असून तिच्यावर चित्रपट येईल असे कधीच वाटले नव्हते. पण आता इतिहासातील महत्वपूर्ण व्यक्तीवर चित्रपट तयार केला जाणार आहे. उत्तम VFX, संवाद आणि कमालीची टीम या चित्रपटात आहे.  त्यामुळे हा चित्रपट आधीच लोकांच्या पसंतीला उतरणार आहे असे कळत आहे.

लता दीदींच्या फॅन्ससाठी खूषखबर..

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From मनोरंजन