बॉलीवूड

‘कोरोना काळातील प्रेम’ म्हणत शिल्पाने हटके स्टाईलने केलं राज कुंद्राला किस

Trupti Paradkar  |  May 16, 2021
‘कोरोना काळातील प्रेम’ म्हणत शिल्पाने हटके स्टाईलने केलं राज कुंद्राला किस

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. काही दिवसांपूर्वीच शिल्पा शेट्टीच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती. शिल्पा शेट्टी सोडून घरातील सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. शिल्पा शेट्टी तिच्या चाहत्यांना याबाबत वेळोवेळी हेल्थ अपडेट देत आहे. शिल्पाचा पती राज कुंद्राही कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. सहाजिकच शिल्पासोडून घरातील सर्व सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. हा काळ शिल्पासाठी नक्कीच असह्य झाला आहे. कारण या  काळात तिला तिच्या कुटु्ंबापासून वेगळं राहवं लागत आहे. शिल्पाने काही वेळापूर्वी शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये ती चक्क राज कुंद्राला किस करताना दिसत आहे. कोरोना काळात नवऱ्यापासून वेगळं राहणं त्रासदायक असल्याने तिने रोमांन्स करण्याचा एक अनोखा अंदाज शोधून काढला आहे.

शिल्पाने शेअर केला रोमॅन्टिक फोटो

शिल्पा शेट्टीने नुकतंच तिच्या इंन्साग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती राज कुंद्राला हटके स्टाईलने किस करताना दिसत आहे. राज कुंद्रा कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे शिल्पाने पतीला किस करण्याची एक वेगळीच शक्कल लढवली आहे. या फोटोमध्ये शिल्पाने डबल मास्क लावला आहे. शिवाय राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या मध्ये एक काच आहे. काचेच्या पलीकडून ती राज कुंद्राला किस करत आहे. कोरोनाच्या  काळात चौदा दिवस एकमेकांपासून दूर राहणं नक्कीच असह्य असल्यामुळे शिल्पाने नवऱ्यासोबत रोमान्स करण्याचा हा मार्ग निवडला आहे. या फोटोला शिल्पाने ‘कोरोना काळातील प्रेम!  कोरोना प्रेम आहे’ असं शेअर केलं आहे. या पोस्टला शिल्पाने #Nearlydone असं हॅशटॅग दिलं आहे. याचा अर्थ राज कुंद्रा आणि इतर कुटुंबियांची तब्बेत आता ठीक होत आहे. शिवाय शिल्पाने पोस्टमध्ये सर्वांनी केलेल्या प्रार्थनेसाठी आभार असं ही शेअर केलं आहे. शिल्पा शेट्टीचे कुटुंब 7 मेला कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. तिने एका पोस्टमध्ये तिचे पती राज कुंद्रा, मुलगा विवान, मुलगी समीक्षा कोरोना पॉझिटिव्ह झाले असून तिची टेस्ट निगेटिव्ह आल्याचं शेअर केलं होतं. 

शिल्पासाठी कसा होता हा कठीण काळ

शिल्पा शेट्टीने दिलेल्या माहितीनुसार तिच्यासाठी मागील दहा दिवसांचा काळ फारच कठीण होता. कारण आधी तिचे सासूसासरे कोरोना संक्रमित झाले आणि त्यानंतर तिचे पती,मुलं पॉझिटिव्ह झाले होते. पुढे तिची आई कोरोना पॉझिटिव्ह झाली आणि सर्वांना स्वतःला आयसोलेशनसाठी खोलीत बंद केलं. या सर्वांमध्ये शिल्पाची टेस्टमात्र निगेटिव्ह आली होती. मात्र तिच्या घरातील दोन मदतनीसही कोरोना पॉझिटिव्ह झाले. ज्यामुळे सर्वांना त्वरीत कोरोनाचे उपचार सुरु करण्यात आले. आता देवाच्या कृपेने आणि  चाहत्यांच्या प्रार्थनेमुळे सर्व काही सुरळीत होत आहे असं तिने शेअर केलं आहे. यासाठी शिल्पाने देवाचे, चाहत्यांचे आणि बीएमसीचे आभार मानले आहेत. सध्या अनेकांच्या घरात संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह होताना दिसत आहेत. मात्र या काळात संयमाने आणि कठीण नियमांचे पालन केल्यास लवकरच सर्व जण बरेदेखील होत आहेत. सध्या कोरोनाचे दिसत असलेले चित्र पाहता लवकरात लवकर सर्वांनी कोविड लसीकरण करावं आणि कोरोनापासून मुक्त व्हावं असंच प्रत्येकाला वाटत आहे. 

फोटोसौजन्य –  इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

PUBG पुन्हा सुरु होणार, पण या नावाने

मोहित मलिक आणि आदिती शिरवाइकरने शेअर केलं बाळाचं नाव, जाणून घ्या अर्थ

कोरोनामुळे अजय देवगनचा ‘थॅंक गॉड’ धोक्यात, होणार कोटींचे नुकसान

Read More From बॉलीवूड