बॉलीवूड

कसं शूट केलं जातं पावसातील रोमॅंटिक गाणं, पाहा ‘बरसात का मौसम’चं मेकिंग ऑफ

Trupti Paradkar  |  Jul 7, 2022
Shoaib Ibrahim and Dipika Kakars song Barsaat Ka Mausam in Marathi

पडद्यावर नायक आणि नायिकाला पावसात भिजत रोमान्स करताना पाहणं हा प्रेक्षकांसाठी रोमांचक अनुभव असतो. पावसातला रोमान्स हा हिट फॉर्म्युला असल्यामुळे आजही अनेक चित्रपटात एखादं पावसातलं रोमॅंटिक गाणं असतंच. पाऊस पडू लागला की प्रेमी युगूलांना अशी गाणी आणखी रोमॅंटिक करतात. आजवर अशी अनेक गाणी चित्रपटांमध्ये सुपरहिट झाली आहेत. अमिताभ-मौसमीच्या ‘रिमझिम गिरे सावन’ पासून ते अगदी सूर्यवंशंममध्ये नव्या व्हर्जनमधील ‘टिप टिप बरसा पानी’पर्यंत अनेक गाण्याची लिस्ट या दिवसांत प्रत्येकाकडे अपडेट असते. पण पावसात असं रोमॅंटिक गाणं शूट करणं नायक आणि नायिकेसाठी रोमॅंटिक असतंच असं नाही. ऑनस्क्रीन आणि रिअल लाईफ पार्टनर शोएब अब्राहिम आणि दीपिका कक्कड यांचा नुकताच एक असा सिझलिंग केमिस्ट्री असलेला म्युजिक अल्बम प्रदर्शित झाला आहे. शोएबने या गाण्याचं शेअर केलेला मेकिंग ऑफ व्हिडिओ मात्र काही तरी वेगळीच स्टोरी सांगतोय…

बरसात का मौसम

दीपिका कक्कड आणि शोएब अब्राहिम ही टेलीव्हिजनवरील एक लोकप्रिय जोडी आहे. ‘ससुराल सीमर का’ या हिंदी मालिकेतून त्यांची केमिस्ट्री सुरू झाली. पुढे प्रेम आणि लग्न असा प्रवास सुरू झाला. नुकतंच या कपलचा ‘बरसात का मौसम’ हा म्युजिक अल्बम प्रदर्शित झाला आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा या जोडीला चाहत्यांना पडद्यावर रोमान्स करताना पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात प्रदर्शित झालेल्या या रोमॅंटिक गाण्यावर चाहत्यांनी भरभरून लाइक्स आणि कंमेट्सचा वर्षाव केला आहे. मात्र पाऊस म्हणजे रोमांन्स असं ज्यांना वाटतं त्यांनी या गाण्याचा मेकिंग ऑफ व्हिडिओ नक्की पाहायला हवा. कारण एक रोमॅंटिक गाणं तयार करण्यासाठी प्रॉडक्शन टीमला किती मेहनत घ्यावी लागते हे त्यात दिसतं. शोएबने त्याच्या युट्यूब चॅनलवर याचा मेकिंग व्हिडिओ शेअर केला आहे.

पावसात शूट करणं सोपं काम नाही

सिनेमा अथवा मालिकांसाठी शूट करण्यात येणारे पावसाचे सीन्स अथवा गाणी खऱ्या पावसात शूट केले जात नाहीत. सहाजिकच त्यासाठी कृत्रिम पाऊस तयार केला जातो. मोठमोठ्या पाईप्समधून तुषार सिंचन करत हा पाऊस पाडला जातो. पंख्याच्या वाऱ्यावर हवा आणि वादळाचा इफेक्ट दिला जातो. वीजेचा कडकडाट दाखवण्यासाठी सेटवर कृत्रिम लाईट्सचा मोठया प्रमाणावर वापर असतो. शिवाय परफेक्ट सीन शूट होण्यासाठी नायक आणि नायिकेला एकच अॅक्शन अथवा मूव्ह सतत करावी लागते. ज्यासाठी या खोट्या पावसात त्यांना पुन्हा पुन्हा भिजावं लागतं. अशा वेळी त्यांच्या नाकातोंडात पाणी जाण्याने त्रास होतो, खूप थंडी वाजते. अंगावर ओले कपडे तसेच ठेवत तासनतास हे शूट करावं लागतं. थोडक्यात प्रेक्षकांना पावसातील रोमान्स दाखवण्यासाठी प्रॉडक्शन टीम आणि कलाकारांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. पण असं असलं तरी ही सर्व भट्टी जेव्हा मस्त जुळून येते तेव्हाच एक छान रोमॅंटिक गाणंही तयार होतं. जे गाणं पुढे प्रत्येक पावसात तुमच्या आमच्या ओठांवर रूंजी घालत राहतं.   

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From बॉलीवूड