मनोरंजन

श्रेयस तळपदे झळकणार ‘लखन’च्या भूमिकेत

Trupti Paradkar  |  Jan 2, 2019
श्रेयस तळपदे झळकणार ‘लखन’च्या भूमिकेत

बॉलीवूड अभिनेता ‘श्रेयस तळपदे’ पुन्हा छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला आहे. श्रेयस लवकरच ‘माय नेम इज लखन’ या हिंदी मालिकेत दिसणार आहे. श्रेयसने नुकताच त्यांच्या इन्स्टावर या मालिकेचा ट्रेलर शेअर केला आहे. “कोई अपन को डॉन बोलता है तो कोई बोलता है गुंडा…पर दिलसे अपन है एकदम रापचिक बंदा.आ रहेला है अपून एकदम कडक अवतार मै इन माय नेम इज लखन” अशा शब्दात या मालिकेतील आपल्या भूमिकेबद्दल भावना शेअर केल्या आहेत. या संवादांवरुन श्रेयसची भूमिका अगदी भन्नाट असणार आहे असं वाटत आहे.

‘माय नेम इज लखन’ची धमाल कॉमेडी

‘माय नेम इज लखन’ या मालिकेचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या मालिकेमध्ये श्रेयस एका हटके भूमिकेमध्ये दिसणार आहे. ट्रेलर आणि मालिकेच्या नावावरुनच ही मालिका कॉमेडी असणार असं दिसत आहे. श्रेयस या मालिकेत ‘लखन’ या पात्राच्या भूमिकेत दिसणार आहे. परमीत शेठी आणि अर्चना पूरनसिंग हे लखनच्या आई-वडीलांच्या भूमिकेत आहेत. या ट्रेलरमधील कलाकार आणि त्यांचे पोट धरुन हसायला लावणारे संवाद यावरुन हा कॉमेडी शो हीट ठरणार यात शंकाच नाही.


श्रेयस पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार

अभिनेता श्रेयस तळपदे आभाळमाया या मराठी मालिकेमधून लोकप्रिय झाला.आजवर त्याने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. त्याची ‘गोलमाल रिटर्न’मधील कॉमेडी भूमिकादेखील फारच लोकप्रिय झाली होती. हिंदी चित्रपटांमध्ये केलेल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे श्रेयसने फार लवकर बॉलीवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. चाकोरीबाहेरील विषयासह श्रेयस तळपदेची निर्मिती असलेला ‘पोस्टर बॉईज’ हा मराठी चित्रपटदेखील प्रंचड गाजला होता. मागील वर्षी ‘गुलमोहर’ या मराठी मालिकेमध्ये अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले सह श्रेयस दिसला होता. गुलमोहर ही छोट्या छोट्या ह्रदयस्पर्शी कथांवर आधारित मालिका होती.आता श्रेयसची ही नवी हिंदी मालिका आणि त्यामधील त्याची ही धमाल भूमिका प्रेक्षकांच्या नक्कीच पंसतीस उतरेल.

फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम

Read More From मनोरंजन