आरोग्य

अंग घासण्याच्या ब्रशचे हे दुष्पपरिणाम तुम्हाला माहीत आहेत का

Trupti Paradkar  |  Mar 16, 2020
अंग घासण्याच्या ब्रशचे हे दुष्पपरिणाम तुम्हाला माहीत आहेत का

दररोज दोन वेळा स्वच्छ अंघोळ केल्याने तुमची त्वचा निरोगी आणि  स्वच्छ राहण्यास मदत होते. अंघोळ करताना त्वचेवर साबण अथवा बॉडीवॉश व्यवस्थित लावण्यासाठी लुफा म्हणजे बॉडी ब्रशचा वापर केला जातो. ज्यामुळे त्वचेवरील डेड स्कीन निघून जाण्यास मदत होते. शॉवर जेल अथवा बॉडी वॉश वापरण्यासाठी लुफाचा वापर करणं गरजेचं असतं. ज्यामुळे त्वचा  स्वच्छ तर होतेच शिवाय त्वचेवर इन्स्टंट ग्लोही येतो. मात्र जर तुम्ही दररोज लुफाचा वापर करत असाल तर तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे. कारण वारंवार लुफा अथवा अंग घासण्याचा ब्रश वापरण्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. 

Shutterstock

त्वचेसाठी का हानिकारक आहे लुफा

बऱ्याचदा अंघोळ केल्यानंतर लुफा पाण्यामुळे तसाच ओेला राहतो. ओलसर लुफा तसाच ठेवला तर त्यात जीवजंतू निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण तयार होतं. अशा प्रकारे जीवजंतू निर्माण झालेला लुफा जर तुम्ही तुमच्या त्वचेवर वापरला तर तुमच्या त्वचेला इनफेक्शन होण्याची शक्यता अधिक असते.  जर तुमची त्वचा संवेदनशील अथवा कोरडी असेल तर तज्ञ्ज अंग घासण्याचा ब्रश न वापरण्याचा सल्ला देतात. कारण यामुळे तुमच्या त्वचेववर रॅशेस आणि इनफेक्शन होण्याची शक्यता जास्त प्रमाणात वाढते. अशा त्वचेला इनफेक्शनचा धोका अधिक असतो.  

Shutterstock

लुफा वापरण्याची योग्य पद्धत –

जर तुम्हाला लुफा वापरण्यास आवडत असेल तर काही गोष्टींबाबत सावध राहणं फार गरजेचं आहे.

Shutterstock

लुफा खरेदी करताना काय काळजी घ्यावी –

आजकाल बाजारात विविध प्रकारचे लुफा विकत मिळतात. बऱ्याचदा स्वस्त दरात विकण्यासाठी कमी दर्जाचे लुफा बाजारात विकले जातात. अशा लुफासाठी वापण्यात येणारे घटक हे गुणवत्ता कमी असलेले असतात. ज्यामुळे असे लुफा लवकर खराब होऊ शकतात. मात्र जर चांगल्या दर्जाचे लुफा तुम्ही विकत घेतले तर ते महिनाभर व्यवस्थित टिकतात. शिवाय ते स्वच्छ करणं सोपेदेखील असतं. नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले लुफा वापरणे हा त्वचेची काळजी घेण्याचा सर्वात उत्तम पर्याय आहे. दोडका अथवा अनेक भाज्या सुकवून त्यांच्या घटकांपासून लुफा तयार केले जातात. त्याचप्रमाणे वाळ्यापासून तयार केलेला लुफा वापरण्यामुळे तुमच्या त्वचेला इनफेक्शनचा धोका कमी असू शकतो. मात्र नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार केल्यामुळे असे लुफा जास्त दिवस टिकू शकत नाहीत. यासाठी योग्य वेळी ते बदलणं फार गरजेचं आहे. व्यवस्थित स्वच्छता राखून आणि दर महिन्याला नवीन लुफा वापरून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता. मात्र वारंवार तोच लुफा वापरणं तुमच्या त्वचेसाठी नक्कीच योग्य नाही हे कायम लक्षात ठेवा. 

 

 

 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

 

अधिक वाचा –

हात धुण्याची योग्य आणि अचूक पद्धत तुम्हाला माहीत आहे का

हाती जेवण जेवण्याचे फायदे करतील तुम्हाला थक्क

उडीद डाळीचे 5 फेसपॅक, तुमची त्वचा बनवतील अधिक चमकदार

Read More From आरोग्य