DIY लाईफ हॅक्स

उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स

Dipali Naphade  |  May 11, 2021
उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स

उन्हाळाचा हंगाम सुरू झालेला आहे. आपल्याला सर्वांना एअर-कंडिशन खोलीत राहायची, आईस्क्रीम खायची, फळांचा रस प्यायची, पातळ आणि हलके कपडे घालण्याची आणि बाहेर न जाता घरातच थांबण्याची तीव्र गरज वाटू लागली आहे. आपण आपली त्वचा आणि इतर गोष्टींची काळजी घेतो. पण हा विचार करत असताना आपण डोळे या अतिशय महत्त्वाच्या अवयवाकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष करतो. अनेक जण त्वचेची काळजी घेण्यासाठी पथ्ये कटाक्षाने पाळतात आणि उष्ण हवामानाला अनुसरून आहार घेण्याकडे लक्ष देतात, परंतु उन्हाळ्यामध्ये डोळ्यांचे रक्षण करण्याच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. तापमान अति वाढले तर विविध प्रकारचे आजार होऊ शकतात आणि त्यामुळे डोळ्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे ठरते, असे ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणतात. कॉन्जंक्टिव्हायटिसमुळे डोळ्यांचा संसर्ग अंदाजे 30% वाढत असल्याचे निरीक्षण आहे. याचसंदर्भात आम्ही अधिक जाणून घेतले डॉ. वामशिधर, फॅको रेफ्रॅक्टिव्ह सर्जन मॅक्सिव्हिजन आय हॉस्पिटल यांच्याकडून. डॉक्टरांनी दिलेल्या काही सोप्या टिप्स तुम्हाला डोळ्यांची काळजी घ्यायला फायदेशीर ठरतील.

डोळ्याची पापणी नक्की का फडफडते, जाणून घ्या कारणं

आढळणाऱ्या समस्या

सूर्यप्रकाशाशी थेट संपर्क येणे: सूर्यप्रकाशामध्ये अतिनिल किरणांचा समावेश असल्याने मोतिबिंदू होण्याचा धोका अधिक असतो, रेटिनाचे नुकसान होण्याची म्हणजे सोलार रेटिनोपॅथीची संभाव्य शक्यताही वाढते. सूर्यप्रकाशातील अतिनिल किरणांशी थेट संपर्क आला तर पेरिजिअम म्हणजे कॉर्नियाची अतिरिक्त वाढ करणारा आजार होऊ शकतो.

– उन्हाळ्यामध्ये अनेकांना डोळे कोरडे पडण्याचा त्रास होतो.

– उन्हाळ्याच्या दरम्यान, सूर्यप्रकाशाशी आणि अतिरिक्त उष्णतेशी संपर्क आल्याने डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो व त्यामुळे डोळ्यांतील टिअर फिल्मचे प्रमाण कमी होते.

– अॅलर्जिक कॉन्जंक्टिव्हायटिस व व्हायरल कॉन्जंक्टिव्हायटिस यामध्ये अचानक वाढ होत असल्याचेही आढळले आहे.

डोळ्यांचे विकारही यामुळे वाढीस लागतात. यासाठीच काही टिप्स विचारात घेणे आवश्यक आहे.

सुंदर डोळे दिसण्यासाठी घरगुती उपायांनी कमी करा अंडरआय बॅग (How To Reduce Under Eye Bags In Marathi)

उन्हाळ्यामध्ये डोळ्यांना संभावणारे वरील धोके विचारात घेता, उन्हाळ्यामध्ये डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी टिप्स

Shutterstock

– डोळ्यांना होणारे कोणतेही नुकसान रोखण्यासाठी युव्ही प्रोटेक्शन सनग्लासेस उपयुक्त ठरतात, तसेच त्यामुळे सूर्यप्रकाशाशी येणारा संपर्कही कमी होतो.

– उन्हाळ्यामध्ये डोळ्यांमध्ये कोरडेपणा येण्याचे प्रकार सर्रास घडतात. पुरेसे पाणी पिणे, परिपूर्ण आहार घेणे आणि पाणीदार फळे खाणे यामुळे डोळ्यांतील कोरडेपणा रोखण्यासाठी मदत होत असल्याने याद्वारे उन्हाळ्यामध्ये हायड्रेटेड राहावे. ही काळजी घेणे मुख्य आहे

– डोळ्यांचा नैसर्गिक ओलावा कायम राखण्यासाठी कृत्रिम अश्रू, ल्युब्रिकंट किंवा आय ड्रॉपसारख्या पर्यायी घटकांची मदत होते. उन्हाळ्यामध्ये त्यांचा वापर केला तर डोळ्यांचा कोरडेपणा रोखण्याबरोबरच कोणत्याही प्रकारचा संसर्ग रोखण्यासाठी ओलावा जतन करून ठेवणे शक्य होते.

– व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असलेल्या पदार्थांचे सेवन करा, जसे हिरव्या पालेभाज्या, गाजर, काकडी, पपई, इ.

– डोळे या आपल्या अत्यंत महत्त्वाच्या अवयवाची योग्य काळजी घेणयासाठी संतुलित आहार घेणे, पुरेसे पाणी पिणे आणि वर नमूद केलेल्या टिप्स अमलात आणणे गरजेचे आहे.

– तसंच तुम्ही आठवड्यातून एक ते दोन वेळा काकडीचा वापर करून डोळ्यांवर काकडी ठेऊ शकता. यामुळे डोळ्याला थंडावा मिळतो आणि तुम्हाला डोळ्याखाली काळी वर्तुळं आल्याचा त्रास असेल तर त्यावरही यामुळे इलाज होऊ शकतो. पण डोळ्यांकडे तुम्ही वेळेवर लक्ष द्या आणि दुर्लक्ष करू नका.

डोळे जळजळ उपाय, करा सोप्या पद्धतीने (Itchy Eyes Problem Solution In Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY लाईफ हॅक्स