DIY सौंदर्य

स्किन केअर रुटीनचा येत असेल कंटाळा, तर फॉलो करा या टिप्स

Trupti Paradkar  |  Feb 9, 2022
स्किन केअर रुटीनचा येत असेल कंटाळा, तर फॉलो करा या टिप्स

दिवसभर ऑफिसचे काम, घरातील कामं आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यातून महिलांना स्वतःकडे वेळ देणं नक्कीच कठीण असतं. ज्यामुळे महिला स्किन केअर रूटिन फॉलो करायचा कंटाळा करतात. काही जणी खूपच आळशी असतात त्यामुळे त्यांना दररोज स्किन केअर करणं जमत नाही. काही जणींना कमी मेहनत घेत त्वचेची निगा राखता येईल असे उपाय हवे असतात. यापैकी तुमची कोणतीही समस्या असली तरी तुम्ही दररोज फक्त दोन ते तीन छोट्याशा गोष्टी फॉलो केल्या तरी तुमची त्वचा सुंदर आणि निरोगी राहू शकते. यासाठी ही माहिती जरूर वाचा.

हिवाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी | Winter Makeup Tips In Marathi

दररोज हा नियम पाळा

स्किन केअरचा मुख्य नियम आहे सीटीएम. म्हणजे क्लिंझिंग, टोनिंग आणि मॉइच्सराइझिंग… त्यामुळे तुम्ही स्किन केअर साठी दररोज काही नाही केलं तरी या तीन स्टेप्स अवश्य फॉलो करा. रात्री झोपण्यापूर्वी एकदा जरी तुम्ही या तीन स्टेप्स फॉलो केल्या तरी तुमची त्वचा निरोगी राहिल. यासाठी एखाद्या चांगल्या क्लिंझर अथवा फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा, गुलाबपाणी अथवा टोनरने चेहरा टोन करा आणि चांगल्या दर्जाचे फेस क्रिम अथवा कोल्ड क्रिम चेहऱ्यावर लावून त्वचा हायड्रेट ठेवा.

हायड्रेटिंग फेशिअल करेल तुमची त्वचा परफेक्ट (Hydrating Facial For Skin In Marathi)

आठवड्यातून एकदा चांगला मास्क चेहऱ्यावर लावा

फेसमास्क त्वचेसाठी खूप महत्त्वाचा असतो. जर तुम्ही तुमच्या त्वचेसाठी क्ले मास्क वापरला तर तुमच्या त्वचेमधून धुळ, माती, प्रदूषण नक्कीच निघून जाईल. विशेष म्हणजे आजकाल बाजारात क्ले मास्क अथवा शीट मास्क विकत मिळतात. ते तुम्हाला फक्त दहा ते वीस मिनीटे चेहऱ्यावर लावायचे असतात. यासाठी जास्त मेहनत घेण्याची मुळीच गरज नसते. त्यामुळे तुमची दैनंदिन कामं करता करताही तुम्ही हे शीट मास्क अथवा क्ले मास्क चेहऱ्यावर लावू शकता. तुम्ही घरच्या घरी एखादा होममेड फेसमास्कही चेहऱ्यावर लावून तुमच्या त्वचेची निगा राखू शकता. 

सनस्क्रिन लावणे विसरू नका

स्किन केअरचा आणखी एक मुख्य नियम म्हणजे बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रिन लावणं विसरू नका. कारण जर तुम्ही सनस्क्रिन लावण्याचा कंटाळा केला तर तुम्हाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. उन्हात त्वचा डिहायड्रेट होते आणि सनटॅनमुळे काळवंडते. म्हणूनच चांगल्या दर्जाचे आणि जास्त एसपीफ असलेले सनस्क्रिन त्वचेसाठी निवडा. घरातून बाहेर पडताना सनस्क्रिन लावाच पण तुमच्या बॅगेतही सनक्रिन असायला हवं. कारण तुम्ही किती वेळ सूर्यप्रकाशात राहाल तितकं तुम्हाला त्वचा सनस्क्रिनने सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. याशिवाय घरात असतानाही तुम्ही जर सतत लाईट्स, मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपच्या संपर्कात असाल तर तुम्हाला सनस्क्रिन लावण्याची गरज आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य