आरोग्य

झोपताना स्वतःला लावाल या सवयी तर आपोआप वजन होईल कमी

Trupti Paradkar  |  Feb 14, 2022
Sleep Habits That Can Help You Lose Weight in Marathi

वाढणारे वजन ही अनेकांसाठी सध्या डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारचा वर्कआऊट आणि डाएट फॉलो केलं जातं. व्यायाम आणि आहारावर नियंत्रण असेल तर वजन नक्कीच कमी होऊ शकतं. पण बऱ्याचजणांचे वजन कडक डाएट आणि व्यायामानेही कमी होत नाही. याला कारणीभूत त्यांची जीवनशैली असू शकते. कारण आजकालच्या आधूनिक जीवनशैलीत आपल्याला अशा अनेक सवयी लागल्या आहेत ज्यांचा परिणाम नकळत तुमच्या शरीर आणि आरोग्यावर होत असतो. निरोगी राहण्यासाठी कमीत कमी सहा ते आठ तासांची झोप घेणं गरजेचं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का तुमच्या झोपण्याच्या काही सवयींचाही तुमच्या वजनावर परिणाम होत असतो. तुमच्या झोपण्याच्या या सवयी बदलून तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

झोपण्यापूर्वी कॅफेनयुक्त पदार्थ घेऊ नका 

कॉफी अथवा कॅफेनयुक्त पदार्थ सेवन केल्यावर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर कमीत कमी सात ते आठ असतो. कॅफेनयुक्त पदार्थ उत्तेजित करणारे असतात त्यामुळे तुमची झोप उडते. जर तुम्हाला शांत झोप लागली नाही तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. अपुऱ्या झोपेमुळे तुमचे वजन वाढते. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी कॅफेनयुक्त पदार्थ कधीच घेऊ नका.

रात्री मद्यपान करू नका 

रात्री मद्पान करू नका याचा अर्थ दिवसा मद्यपान केलं तर चालेल असा होत नाही. कारण मुळातच मद्यपान करणं आरोग्यासाठी चांगलं नाहीच. मात्र रात्री मद्यपान केल्यामुळे तुमच्या झोपेवर वाईट परिणाम होतो. मद्यपानामुळे येणारी झोप नैसर्गिक नसल्यामुळे तुमच्या झोपेचे चक्र बदलते.  शिवाय आरोग्यावर दुष्परिणाम होतो आणि तुमचे वजन वाढू लागते. यासाठी वाचा दारू पिण्याचे दुष्परिणाम, का आहे दारू घातक (Side Effects Of Alcohol In Marathi) आणि यासोबतच दारू सोडण्याचे घरगुती उपाय (Daru Sodnyache Upay In Marathi)

रात्री उशीरा जेवू नका

आहाराचा तुमच्या शारीरिक रचनेवर परिणाम होत असतो. तुम्ही किती खाता यापेक्षा तुम्ही कधी खाता हे वजन वाढण्याचे मुख्य कारण असू शकते. जर रात्री झोपताना तुम्ही अती प्रमाणात खाल्लं तर रात्री ते अन्न व्यवस्थित पचत नाही. पोटात अन्न तसंच पडून राहिल्यामुळे तुमच्या पचनाच्या समस्या वाढतात आणि वजन वाढू लागते. 

रात्री झोपताना गॅझेटचा वापर करणे

आजच्या जीवनशैलीत मोबाईल ही अतिशय गरजेची गोष्ट झाली आहे. असं असलं तरी रात्री झोपण्यापू्र्वी कमीत कमी अर्धा तास फोन दूर ठेवायला हवा. कारण फोन अथवा इतर गॅझेटमधून येणाऱ्या ब्लू लाईट आणि रेडिएशनचा तुमच्या मेंदूवर परिणाम होतो. यामुळे तुम्हाला शांत झोप लागत नाहीच उलट तुमचं आरोग्य बिघडतं आणि वजन वाढू लागतं. 

निरोगी आरोग्यासाठी योगासनाचे प्रकार | Types of Yoga For Health In Marathi

Read More From आरोग्य