#MeTooचं वादळ आता पूर्ण शमलं आहे. असं वाटत असताना आता पुन्हा एकदा हे वादळ घोंगावण्याची शक्यता आहे. गायिका .सोना महोपात्राने पुन्हा एकदा हा वाद समोर आणला असून तिने गायक सोनू निगमवर निशाणा साधला आहे. आता कुठे सगळं शांत झालं असताना सोना महोपात्राला हे मध्येच काय सुचलं असं तुम्हालाही नक्कीच वाटलं असेल तर जाणून घ्या यामागचे कारण
‘टकाटक’ या विनोदी चित्रपटानंतर प्रथमेश होणार ‘टल्ली
एका ट्विटमुळे पेटली सोना
ज्यावेळी सोनाने असे का केले? याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यावेळी तिचे हे ट्विट आम्ही नीट वाचले. एका युजरने सोशल मीडियावर एक ट्विट लिहिले होते.यामध्ये असे म्हटले होते की, अनु मलिकवर #Metooचा आरोप करण्यात आला पण काय झाले आता लवकरच ही व्यक्ती एका रिअॅलिटी शो ची जज म्हणून येणार आहे. अशाच पद्धतीने या क्षेत्रातील अनेक व्यक्तींवर आरोप करण्यात आले. पण सरते शेवटी झाले काय ? सगळ्या पुरुषांना यामध्ये क्लीनचीट मिळाली आहे. त्यामुळे महिलांचे सगळे श्रम वाया गेले आहेत. असे ट्विट करत त्या व्यक्तीने सोना महोपात्राला या पोस्टमध्ये टॅग केले आहे.
आणि म्हणून चिडली सोना महोपात्रा
आता चक्क एका सर्वसामान्य माणसाने अशा पद्धतीची पोस्ट लिहून सोना महोपात्राला टॅग केले म्हटल्यावर ती यावर विचार करणे साहजिकच आहे. तिने या पोस्टवर तिचा अनुभव शेअर केला आहे. ती म्हणाली की, ज्यावेळी मी कैलास खेर यांनी केलेल्या अन्यायाची वाच्यता केली त्यावेळी माझ्या नवऱ्याला सोनू निगमचा फोन आला. त्याने माझ्या नवऱ्याला धमकीच दिली असे म्हणायला हवे. कारण तो त्यावेळी माझ्या नवऱ्याला म्हणाला की, सोनाला आहे तिथे थांबायला सांग.याचाच अर्थ अन्यायाविरोधात बोलू नकोस नाहीतर तुझे काही बरे- वाईट होईल असाच होतो नाही का?
अनु मलिकच्या बाजूने सोनू निगम
अनु मलिकवर सोना महोपात्राने गंभीर आरोप लावले होते. या आरोपानंतर सोनू निगमने अनु मलिकची बाजू सावरली होती. अनु मलिकने असे काहीही केले नसल्याचा दाखला सोनू निगमने दिला होता. त्यामुळे झालं असं की, सोनू निगम अनु मलिकची पाठराखण केल्याचे सोना महोपात्राने म्हटले.
सोना महोपात्राने केले गंभीर आरोप
सोना महोपात्राने #MeToo च्या सगळ्या प्रकरणावेळी गायक कैलाश खेरवर गंभीर आरोप केले होते. संधी देण्यासाठी त्याने माझ्याशी असभ्य वर्तन केल्याचे तिने म्हटले होते. त्यामुळे या आरोप-प्रत्यारोपाच्या फेरीत आणखी एका व्यक्तीची भर पडली. पण यातून सिद्ध काहीच होऊ शकले नाही. ज्यावेळी ही मोहीम थंड पडली त्यानंतर काहीही झाले नाही. विशेष म्हणजे ज्या महिलांनी पुरुषांवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी कोणत्याही प्रकारे एफआयआर केल्या नव्हत्या. त्यामुळेच हे प्रकरण लवकर शमले.
युवा सिंगर एक नंबर मध्ये या पाच स्पर्धकांमध्ये रंगणार स्पर्धा
#MeTooचं वादळ
परदेशात ही चळवळ सुरु असताना अचानक तनुक्षी दत्ताच्या माध्यमातून #MeToo चं भूत देशात शिरलं. तिने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले. पण हे आरोप ती सिद्ध करु शकली नाही. तब्बल 10 वर्षांपूर्वीचे प्रकरण तिने यामध्ये उकरुन काढले होते. तिच्या या आरोपानंतर आणि मिळालेल्या पब्लिसिटीमुळे अनेक सेलिब्रिटींनी यामध्ये हात धुवून घेतले. त्यामुळे जर कोणी महिलांशी खरंच असभ्य वागले असेल तर त्यांना फायदा झाला कारण लोकांना हा एक स्टंट वाटू लागला.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje