लॉकडाऊनमध्ये सध्या अगदी गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वांनाच एक पातळीवर आणून सोडले आहे. सध्या सगळेच घरामध्ये आपली काळजी घेत आहेत. त्यामध्ये बॉलीवूडमधील कलाकारही मागे नाहीत. सगळेच आपापल्या घरी असून सध्या सगळीकडे चित्रीकरणही बंद आहे. कोरोनाग्रस्त व्यक्तींची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे आता 30 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. इतकंच नाही लॉकडाऊनदरम्यान शाळा, महाविद्यालय, ऑफिस सगळीकडेच सध्या बंद पुकारण्यात आला आहे. संपूर्ण फिल्म इंडस्ट्री पूर्ण तऱ्हेने बंद आहे. पण आता निर्माता विवेक अग्निहोत्रीने नव्या वादाला या परिस्थितीतही तोंड फोडले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंंटवरून विवेक अग्निहोत्रीने सोनाक्षी सिन्हा लॉकडाऊनच्या काळात शूटिंग करत आहे अशा स्वरूपाचा फोटो पोस्ट केला आहे. मात्र यावरून आता नव्या वादाची सुरूवात झाली आहे.
सोनाक्षीने केले उद्धव ठाकरे सरकारला टॅग
विवेक अग्निहोत्रीने आपल्या सोशल अकाऊंटवरून सोनाक्षीचा एक फोटो ट्विट केला आणि लिहिले, ‘अशा परिस्थितीत कोण चित्रीकरण करते?’ पण यावरून सोनाक्षीच्या रागाचा पारा चढला आणि तिने या ट्विटवर आक्षेप घेत सरळ पोलीस आणि उद्धव ठाकरे शासनाला टॅग करत यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोनाक्षीने आपल्या ट्विटमध्ये सडेतोड उत्तर देत म्हटले, ‘एक्स्क्यूज मी, मुंबई पोलीस आणि उद्धव ठाकरे, या अशा परिस्थितीत लोकांना अफवा आणि खोट्या गोष्टी पसरवण्यापासून रोखण्याची नक्की काय प्रक्रिया आहे? जबाबदार नागरीक म्हणून मी हा प्रश्न करत आहे. घरी बसून सोशल डिस्टन्सिंगची काळजी मी घेत आहे आणि कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण मी करत नाही.’
सेलिब्रिटीजमध्ये पांढऱ्या शर्टचा बोल्ड ट्रेंड
विवेक अग्निहोत्रीने याआधीदेखील केले होते भाष्य
विवेक अग्निहोत्रीने याआधीदेखील अतिशय संवेदनशील परिस्थितीमध्ये चुकीचे भाष्य केले होते. त्यावेळीदेखील विवेक अग्निहोत्रीवर अनेक लोकांनी टीका केली होती. विवेक अग्निहोत्रीने याआधी पंतप्रधान यांच्यावरही टीका केली होती. इतकंच नाही तर जेएनयुमध्ये दीपिका पादुकोण गेली असता तिने हा पब्लिसिटी स्टंट केला आहे अशीही टीका त्याने केली होती. त्यावेळी हा वाद खूपच वाढला होता. पण काही काळानंतर हा वाद थंड झाला. आता पुन्हा एकदा सोनाक्षी सिन्हाला विवेक अग्निहोत्रीने टारगेट केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये नक्की विवेक अग्निहोत्रीचा काय हेतू आहे हे अजूनही कळलेले नाही. या परिस्थितीमध्येही काही लोक आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी असा स्टंट करू शकतात का अशा चर्चांना आता उधाण आलं असून याची पडताळणी व्हायला हवी असेही सोनाक्षीचे चाहते आता म्हणत आहेत. वास्तविक यावर सोनाक्षीने विवेक अग्निहोत्रीला काहीही न ऐकवता सरळसोटपणे पोलीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मदत मागून विवेक अग्निहोत्रीवर निशाणा साधला आहे.
महानायकाच्या आणखी एका चित्रपटाचा रिमेक, आता रणवीर सिंह साकारणार ‘शहेनशाह’
प्रशासन पावलं उचलणार का?
हेट स्टोरी, ताश्कंद फाईल्स अशा अगदी संवेदनशील विषयाला हात घातलेल्या दिग्दर्शक आणि निर्मात्याकडून अशा वागण्याची अपेक्षा नसल्याचेही सध्या सोशल मीडियावर म्हटले जात आहे. खरे काय आणि खोटे काय हे लवकरच कळेल. पण तोपर्यंत एका नव्या वादाची सुरूवात झालेली दिसून येत आहे. आता यावर प्रशासन नक्की काय पावले उचलणार आणि सोनाक्षीला मदत करणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
एक देश एक आवाज’च्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांना कलाकारांची मानवंदना
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje