सिंगापूरच्या मॅडम तुसाद म्युझियममध्ये पहिल्या फीमेल सुपरस्टार श्रीदेवीचा वॅक्स स्टॅच्यू ठेवण्यात येणार आहे. या पुतळ्याचं अनावरण बोनी कपूर, जान्हवी कपूर आणि खूशी कपूर यांनी केलं. त्यामुळे या तिघांसाठीही हा खूपच भावनिक क्षण आणि दिवस होता.
श्रीदेवीचा पुतळा पाहून भावूक झाली जान्हवी
या पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळचे काही फोटोज सध्या व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये जान्हवी आपल्या आईच्या पुतळ्यासमोर उभं राहून पाहते आहे. हा पुतळा इतका सुंदर आहे की, क्षणभर श्रीदेवीचं समोर उभी असल्याचा भास होत आहे. त्यामुळे कदाचित जान्हवी त्या पुतळ्याकडे एकटक पाहताना दिसते आहे.
कॉस्मेटिक स्टँड बद्दल देखील वाचा
बोनीने केलं भावनिक ट्वीट
फॅन्सच्या हृदयात आहे श्रीदेवी : बोनीने हे ट्वीट शेअर करत लिहीलं आहे की, श्रीदेवीने फक्त आमच्या हृदयात नाहीतर तर लाखो प्रेक्षकांच्या मनातही नेहमीसाठी जागा निर्माण केली आहे. 4 सप्टेंबरला या पुतळ्याचं मॅडम तुसाद सिंगापूरमध्ये अनावरण करण्यात आलं. श्रीदेवीच्या या वॅक्स स्टॅच्यूची झलक नुकतीच निर्माता-दिग्दर्शक आणि श्रीदेवीचा नवरा असलेल्या बोनी कपूरने सोशल मीडियावर शेअर केली. ज्यामध्ये हा वॅक्स स्टॅच्यू कसा तयार करण्यात आला ते दाखवलं आहे.
श्रीदेवीच्या पुतळ्याला देण्यात आला हा खास लुक
श्रीदेवीच्या पुतळ्याला तिच्या 1987 साली आलेल्या मि. इंडिया या चित्रपटातील हवाहवाई गाण्यातील लुक देण्यात आला आहे. या गाण्यामुळे श्रीदेवीला हवाहवाई गर्ल असं म्हटलं जायचं. हा पुतळा 20 लोकांच्या एक्सपर्ट टीमने तयार केला आहे. या आर्टिस्टनी श्रीदेवीच्या कुटुंबिय आणि मित्रपरिवाराशी बोलून तिची खास माहिती मिळवली. मग त्यातून साकारण्यात आला हा खास पुतळा. श्रीदेवीचे एक्सप्रेशन, मेकअप आणि कपड्यांना रीक्रिएट करण्यात आलं. तिच्या प्रसिद्ध हवाहवाई गाण्यातील लुकप्रमाणेच हूबेहूब स्टेच्यूचा लुक आहे. या लुकसाठी खास मेकअप, ज्वेलरी, क्राउन आणि ड्रेसला खास 3डी प्रिंट देण्यात आली आहे. अनेक टेस्ट केल्यानंतर हा लुक पास करण्यात आला आहे. पाहा या पुतळ्याला तयार करतानाचा खास व्हिडिओ –
श्रीदेवीचा हा पुतळा पाहून पुन्हा एकदा तिच्या फॅन्सच्या मनात तिच्या आठवणी नक्कीच जाग्या होतील. तुम्हाला आजही आठवते का श्रीदेवीची ती हवाहवाई गाण्यातील अदा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
हेही वाचा –
अभिनेत्री श्रीदेवीचे टॉप 10 चित्रपट, ज्यामुळे ती झाली सुपरस्टार
श्रीदेवीच्या ‘चालबाज’प्रमाणे जान्हवी कपूर ‘या’ चित्रपटात साकारणार डबलरोल
जेव्हा माधुरीने सांगितल्या श्रीदेवीसोबतच्या आठवणी
चांदनीच्या साडीचा लिलाव सुरु, किंमत ऐकाल तर थक्क व्हाल
#HappyBirthdaySridevi: आईच्या आठवणीने भावूक झाली जान्हवी
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje